dhananjay munde  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: धनंजय मुंडेंची मोठी कोंडी? वाढणार डोकेदुखी? शरद पवार देणार परळीत पर्याय...तर बीआरएसला पडणार खिंडार

Political News: परळीच्या पंचायत समितीचे माजी सभापतीसह बीआरएसच्या अनेक नेत्यांचा बीडमध्ये उद्या होणाऱ्या जाहीर सभेत प्रवेश होणार असल्याचं निश्चित झालंय.

विनोद जिरे

Beed News: अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांची डोकेदुखी आता वाढणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट परळीत पर्याय उभा करायला हालचाली सुरू केल्या आहेत. परळीच्या पंचायत समितीचे माजी सभापतीसह बीआरएसच्या अनेक नेत्यांचा बीडमध्ये उद्या होणाऱ्या जाहीर सभेत प्रवेश होणार असल्याचं निश्चित झालंय. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यासोबत शिवराज बांगर यांच्यासह बबन गीते यांची बैठक झाल्याचे देखील समोर आलं आहे. (Latest Marathi News)

परळी मतदारसंघासह राज्यातील अनेक भागांमध्ये जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय काम करणारे पंचायत समितीचे माजी सभापती बबन गीते यांच्यासह बीआरएस पक्षाचे नेते शिवराज बांगर हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान शेकडो कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे बबन गीते यांचं परळी मतदारसंघात चांगलंच वर्चस्व आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून शरद पवार हे बबन गीते यांना ताकद देणार असल्याची माहिती आहे. तर धनंजय मुंडे यांच्यामुळेच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आणि मला जेलमध्ये घातलं. असा अनेकवेळा गंभीर आरोप करणारे बीआरएसचे नेते शिवराज बांगर यांना देखील शरद पवार हे ताकद देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, यामुळे आता धनंजय धनंजय मुंडे यांची मोठी कोंडी होणार असून डोकेदुखी देखील वाढणार आहे. त्यामुळे आता शरद पवार हे नेमकं काय काय करिष्मा मराठवाड्यातील पहिली सभा होणाऱ्या बीडमध्ये दाखवतात? आणि या सभेतून ते काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT