Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics News: बाळासाहेबांचं नाव घेता आणि मोदी-शहांकडे का जाता?; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जयश्री मोरे

Sanjay Raut: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून चर्चा झाली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यासाठी आम्हला कधीही दिल्लीला जावं लागलं नाही. पूर्वी आमचं कंट्रोलरूम इथेच होतं. आता इथेल निर्णय घ्यायला लोकांना दिल्लीला जावं लागत आहे. तुमच्याकडे खरी शिवसेना आहे असं बोलता ना?, मग दाखवा की हिंमत. ही नकली शिवसेना असून यांना प्रत्येक गोष्टीला परवानगी लागते, अशी टीका राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.

पुढे त्यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, बाळासाहेबांचं नाव घेता आणि मोदी-शाहांकडे का जाता? फडणवीसांचं मी समजू शकतो, त्याचं मक्का मदिना दिल्लीतच आहे. पण तुमचं काय?, असा प्रश्न राऊतांनी शिंदेंना विचारला आहे.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या दुर्घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून बोलताना राऊतांनी म्हटलं आहे की, "ट्रेन दुर्घटनेची सीबीआय चौकशी करून काय साध्य होणार? खोटं आश्वासन आणि मोठ्या बाता बंद करा. बुलेट ट्रेनची स्वप्न पूर्ण करण्याआधी आहेत त्या ट्रेन व्यवस्थित चालवा. आता म्हणत आहेत की हा घातपात होता, मग तुमची यंत्रणा काय करत होती? यामध्ये रेल्वे मंत्र्यांची जबाबदारी नाही का?, असा सवालही राऊतांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT