Sanjay Raut Latest Marathi News, Maharashtra Political Crisis Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत...; ललित पाटील प्रकरणी संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा

खासदार संजय राऊतांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांवर टीकास्त्र सोडलंय.

Ruchika Jadhav

Maharashtra Politics:

अंमली पदार्थांप्रकरणी ललित पाटीलला बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. "मी पळालो नाही मला पळवलं गेलंय... ",असं ललिलत म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळातही खळबळ उडालीये. खासदार संजय राऊतांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांवर टीकास्त्र सोडलंय. (Latest Marathi News)

दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत...

ललित पाटील प्रकरणी नाना पटोलेंसह काही प्रमुख नेत्यांनी दोन कॅबिनेट मंत्र्यांवर आरोप केलेत. ते दोन मंत्री कोण आहेत? याची फडणवीसांनी चौकशी करावी. त्यावर बोलावं, त्यासाठी चौकशी आयोग नेमावा आणि हिम्मत असेल तर त्या दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, असं आव्हान राऊतांनी फडवीसांना दिलं आहे.

उद्या शिवसेकडून (ठाकरे गट) अंमली पदार्थांविरोधात नाशिकमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. शुक्रवारी संपूर्ण नाशकात मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात येणारे अंमली पदार्थ गुजरातमधून येतात हे देवेंद्र फडणवीसांना माहितीये का?, असा प्रश्न संजय राऊतांनी फडणवीसांना विचारलाय.

महाराष्ट्राचा उडता पंजाब

याआधी गुजरातमधून सर्वाधिक अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आलेत. जे अंमली पदार्थ तिकडे सापडले नाहीत ते नाशकात पाठवण्यात आले. महाराष्ट्राचा उडता पंजाब करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील तरुणांना उद्धवस्त करण्याचं करस्थान सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांना जर हे समज नसेल तर त्यांनी खुशाल याचं राजकारण करावं आणि महाराष्ट्राला खड्ड्यात जाताना पहावं, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर आगपाखड केलीये.

गृहमंत्र्यांच्या प्रतिमेसा शोभेल असं वागा, उद्याचा शिवसेनेचा नाशिक मोर्चा हा इशारा मोर्चा आहे. कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, सामान्य जनता सर्वच उद्याच्या मोर्चात सहभागी होणार आहेत, असंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

SCROLL FOR NEXT