Saamana Editorial Saam TV
महाराष्ट्र

Saamana Editorial: महाराष्ट्र म्हणजे 'गंमत जंमत' नाही; शरद पवार - अजित पवार भेटीवरुन सामनातून टीकास्त्र; CM शिंदेंवरही निशाणा

Sharad Pawar Ajit Pawar Meeting: चार दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले आणि त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाल्याची गुप्त बातमी फुटल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांमधील भेटीमुळे राज्याच्या राजकारणात आणि सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या सर्वांवरुन सामनातून काका पुतण्यांना परखड शब्दांत ठणकावण्यात आलंय. (Latest Marathi News)

"अनेक आजारांनी सध्या महाराष्ट्र कृश आणि जर्जर झाला आहे. त्यात दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ले करीत आहेत. या सगळ्यातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहील. दोन पवारांची 'गंमतभेट' व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. महाराष्ट्र म्हणजे 'गंमत जंमत' नाही हे आम्ही येथे परखडपणे बजावत आहोत!", अशा शब्दांत सामनातून टीकास्त्र डागण्यात आलं आहे.

"राजकारणातील डिजीटल युगात गुप्त राहील असे काहीच नाही. चार दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले आणि त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाल्याची गुप्त बातमी फुटल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला.उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.", असं सामनात म्हटलंय.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनेकदा परखड विधाने करतात. त्यातही बऱ्याचदा गंमत असते. "अजित पवार हे 'मविआ'त परत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. अजितदादांना उपरती झाली असेल म्हणून ते शरद पवारांना भेटले असतील", असे नाना म्हणाले. त्याआधी नाना यांनी सांगितले की, "महाराष्ट्रातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राज्यातील सरकार हे 'गंमत जंमत' सरकार आहे." नानांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत असल्याचं देखील सामना अग्रलेखात म्हटलंय.

शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते

"पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे. नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झालेय. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही. अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळ्यात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे.", अशा शब्दांत सामनातून शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे.

पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली

"शिंदे हे 24 तास काम करतात म्हणून ते आजारी पडले, पण शिंदे 24 तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दृष्य स्वरूपात दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास 24 तास काम करणे असे म्हणता येत नाही. शिंदे यांची झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साताऱयातील त्यांच्या शेतावर आराम करतात. म्हणजे '24 तास काम व पुढचे 72 तास आराम' असे त्यांच्या जीवनाचे गणित दिसते व शिंदे यांच्या आजाराचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले जाते.", अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT