Chhatrapati Sambhajinagar News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत,भगवा कोणाचा फडकणार?

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे सेना आणि ठाकरे गटात तिहेरी लढत रंगली आहे. अंबादास दानवे यांच्या विधानानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत

  • भाजप २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष

  • अंबादास दानवे यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण

  • महायुतीतील अंतर्गत समीकरणांमुळे सत्ता संघर्ष चुरशीचा

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पेच आता अधिकच गडद झाला आहे. भाजप आणि शिंदे सेनेमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असतानाच, आता शिवसेना ठाकरे गटाने या शर्यतीत उडी घेतली आहे. यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. अंबादास दानवे यांनी मुंगीरीलालचे हसीन सपने पाहू नयेत, असा टोला भाजपने लगावला. मात्र जिल्हा परिषदेवर भगवा कोणाचा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद निकालात भाजप २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. याच संधीचा फायदा घेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खळबळजनक विधान केले आहे. दानवे म्हणाले, काही लोक आमच्या संपर्कात आहेत. जर कुणी पाठिंबा दिला तर आम्ही नक्कीच सत्ता स्थापनेचा विचार करू. दानवे यांच्या या विधानामुळे महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा रंगली आहे.

​मात्र, दानवेंच्या या विधानाला भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केणेकर यांनी टोला लगावत म्हटले की, अंबादास दानवे यांनी मुंगीरीलालचे हसीन सपने पाहू नयेत. सत्ता आमचीच येणार आहे. महायुतीकडे कागदावर स्पष्ट बहुमत दिसत असले तरी, ठाकरे गटाची वेट अँड वॉच ची भूमिका आणि अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्याचे प्रयत्न यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतल्या साकीनाका येथे गारमेंट गोदामाला आग

Maharashtra News: विहीर चोरीला गेली, तरुण शेतकऱ्याने शेतातच मृत्यूला कवटाळलं

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्यासह तब्बल २९ खाती; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणती मिळाली खाती?

कल्याण RTOची दमदार कामगिरी, ४०० कोटींहून अधिक महसूल जमा

धाड धाड...! विद्यार्थ्याकडून भर वर्गात गोळीबार; ४ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT