Sharad Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड, माजी आमदाराचा पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश; राष्टवादीला मोठं खिंडार

Nashik Politics: नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या माजी आमदार आणि त्यांच्या पत्नीने पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये आज प्रवेश केला. यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली.

Priya More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिक जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. माजी आमदार रामदास चारोस्कर आणि त्यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी पत्नी सुनीता चारोस्करांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात उपस्थिती या दोघांनी भाजपचे कमळ हाती घेतलं.सुनिता चरोस्कर यांनी नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुनीता चारोस्कर यांचा ४४,४०३ मतांनी पराभव झाला होता. त्यांना ९४,२१९ मते मिळाली होती.

रामदास चारोस्कर आणि सुनीता चारोस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नाशिकच्या दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या मतदारसंघात आता भाजपची ताकद वाढली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवलेले उदय सांगळे आणि दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर आणि पत्नी सुनीता चारोस्कर हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. ते भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात होते.

या तिघांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्यापूर्वीच शरद पवार गटाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. उदय सांगळे यांचा देखील आजच भाजपमध्ये पक्षप्रेवश होणार आहे. उदय सांगळे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना यामध्ये १ लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. या निवडणुकीत उदय सांगेळ यांनी महायुतीचे उमेदवार आणि आताचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT