Political leaders visiting Sanjay Raut to enquire about his health during his temporary break from active politics. Saam Tv
महाराष्ट्र

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Sanjay Raut Recovery Brings Rare: आजारपणामुळे राजकीय जीवनातून ब्रेक घेणाऱ्या राऊतांच्या तब्येची विचारपूस राजकीय नेत्यांकडून केली जातेय... राऊतांची भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये कोणा कोणाचा समावेश आहे? आणि या भेटीगाठीत नेमकं काय घडतयं?

Omkar Sonawane

ज्येष्ठ पत्रकार, खासदार आणि ठाकरेसेनेचा बुलंद आवाज असणारे आक्रमक नेते... म्हणून संजय राऊतांची राज्यात नेहमीच चर्चा असते.. एखाद्या मुद्यावरुन राऊतांनी राजकीय टिप्पणी किंवा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला नाही आणि त्याची बातमी झाली नाही, असं क्वचितच घडतं... मात्र आजारपणामुळे राऊतांनी सध्या ब्रेक घेतला आणि राजकीय नेत्यांनी आपुलकीनं राऊतांच्या तब्येतीची विचारपूस सुरु केली..

खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नात फडणवीस आणि राऊतांची भेट झाली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या चर्चेदरम्यान आशिष शेलारही उपस्थित होते

दुसरीकडे राज ठाकरेंनीही राऊतांची भांडूपमधील घरी जाऊन विचारपूस केलीय...यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चाही झाली...

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातलं राजकारणं पाहता ते बिहारच्या वळणावर चाललंय की काय अशी चर्चा अधूनमधून सुरू असते..राजकीय नेत्यांकडून एकमेंकांना जीवनातून संपवण्याची भाषा केली जातेय़.. तर दुसरीकडे तपास यंत्रणांचा दबाव आणि विरोधकांवरील व्यक्तीगत टीकाही खालच्या पातळीवर पोहचलीय. त्यामुळे सतत विरोधकांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृतपणा अजूनतरी पूर्णपणे हद्दपार झालेला नसून राज्याची राजकीय संस्कृती शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

50 हजार फॉलोअर्स असलेली रिलस्टार निघाली चोर, बॉयफ्रेंडच्या मदतीने करायची महिलांच्या पर्स लंपास

SCROLL FOR NEXT