CM Eknath Shinde maharashtra politics Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पालकमंत्रिपदावरून वादाची पहिली ठिणगी; अजित पवार गट विरूद्ध शिवसेना 'सामना' रंगण्याची शक्यता

Ajit Pawar NCP News: अजित पवार यांच्या सत्तेतील वाट्याने शिवसेनेमध्ये धुसफूस चांगलीच वाढली आहे.

Gangappa Pujari

सचिन कदम, प्रतिनिधी...

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत एन्ट्री घेतली.

मात्र अजित पवार यांच्या सत्तेतील वाट्याने शिवसेनेमध्ये धुसफूस चांगलीच वाढली आहे. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रीपदाला शिवसेनेसह भाजपकडून विरोध केला जात आहे. (Maharashtra Political News)

दादांच्या एन्ट्रीने वाढली धुसफूस....

याबाबत अधिक माहिती अशी की, आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना रायगडचे पालकमंत्री करायला शिवसेनेसह भाजपनेही विरोध केला आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेना- भाजपच्या सर्व आमदारांचा विरोध असल्याची माहिती आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अजित पवार गट विरुद्ध शिवसेना- भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झाली होती.

आदिती तटकरे यांच्याऐवजी भरत गोगावले यांनाच रायगडचं पालकमंत्री पद देण्यात यावं, अशी मागणी शिवसेना (Shivsena) आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच रायगडचे पालकमंत्रीपद हे शिवसेनेसाठी राखीव ठेवल्याचा दावाही भरत गोगावले यांनी केला आहे. त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा तटकरे विरूद्ध गोगावले असा सामना पाहायला मिळणार आहे.

आमदारांमध्येही वाद...

दरम्यान, अजित पवार यांच्या बंडाने राज्याच्या राजकारणाची समिकरणे बदलून गेली आहेत. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याला शिवसेना शिंदे- गटात नाराजी असून ती अनेक नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. इतकेच नव्हेतर मंत्रीपदावरुन शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये वाद झाल्याचेही सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT