Eknath Shinde Latest News Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde Vs Shivsena Live: उद्या सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार

मातोश्रीशी संपर्क करत उद्धव ठाकरेंकडे मध्यस्थीची मागणी केल्याची सुत्रांची माहिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उद्या सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार

उद्या सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. जस्टीस सूर्यकांत आणि जस्टीस पारडीवाला यांच्या बेंच समोर सुनावणी होणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना केलेल्या निलंबनाच्या आणि शिवसेनेनं नियुक्त केलेल्या गटनेत्या विरोधात याचिका दाखल केली आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उदय सामंत गुवाहाटीमध्ये पोहोचले

शिवसेनेतील ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केली आहे.आत मंत्री उदय सामंत हेही गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.

बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर भूमिका बदलतील: शरद पवार

शिवसेनेचे बंडखोर केलेले आमदार मुंबईत आल्यावर भूमिका बदलतील, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत केले.

हिंमत असेल तर आधी समोर या; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना इशारा

हिंमत असेल तर आधी समोर या असा इशारा, आदित्य ठाकरे यांनी आज दिला. मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारणीच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते.

मलाही ५० कोटीची ऑफर होती, कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांचा दावा

औरंगाबाद: शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. बंडखोरीमुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. यापार्श्वभूमीवर आता कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी ५० कोटींची ऑफर होती असा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले

गुवाहाटीच्या हॉटेल रेडिसन मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त एकनाथ शिंदे आणि सर्व आमदारांनी अभिवादन केलं.

आम्हाला बघून मोदी-शहा रस्ता बदलतात; संजय राऊतांचा भाजप, बंडखोर आमदारांवर हल्लाबोल

शिवसेनेला बंडखोर आमदारांनी दिलेल्या आव्हानानंतर शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून त्यांनी आता मुंबईसह राज्यभरातील शिवसैनिकांना प्रेरणा देण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. आज मुंबईतील दहीसर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना राऊत म्हणाले, ' आपण संपुर्ण मुंबईभर कार्यकर्ता मेळावे घेत आहेत. शहाजी पाटील यांच्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला, 'बंडखोर आसामचं कौतुक करत आहेत. मग महाराष्ट्र काय स्मशान आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दुसऱ्या पक्षात जाण्यावरुन बंडखोरांमध्ये मतभेद - सुत्र

दुसऱ्या पक्षात जाण्यावरून २० ते २५ बंडखोर आमदारांमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल या मुद्द्यावरुन हे मतभेद झाल्याचं विश्वसणीय सुत्रांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडी भक्कम राहील - शरद पवार

महाविकास आघाडी भक्कम राहील, कोर्टातही भूमिका व्यवस्थितीत राहील असा विश्वास शरद पवार यांनी सिल्व्हर ओक येथे आघाडीच्या नेत्यांसाबत पार पडलेल्या बैठकीत व्यक्त केला आहे.

काही आमदारांनी महाराष्ट्रात यायची इच्छा व्यक्त केली  - संजय राऊत

माझे काही आमदारांशी पाच मिनिटांपूर्वीच बोलणं झालं असून या आमदारांनी महाराष्ट्रात यायची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.

आज दुपारी एकनाथ शिंदे गटाची बैठक; पुढील रणनीती ठरविणार

शिवसेनेला कायदेशीर उत्तर देण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरविण्यासाठी आता आज दुपारी १२ वाजता एकनाथ शिंदे हे आपल्या बंडखोर आमदारांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'लाइफ इन अ मेट्रो'चा रेकॉर्ड ब्रेक, वाचा संडे कलेक्शन

SCROLL FOR NEXT