Maharashtra political crisis
Maharashtra political crisis  saam tv
महाराष्ट्र

Supreme Court Hearing on ShivSena: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षावरील निकाल उद्याच देणार

Chandrakant Jagtap

Maharashtra Political Crisis: आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्याच निकाल देणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळाला होती. त्याचा निकाला आता उद्या लागणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील याविषयी माहिती दिल्याचे लाईव्ह लॉने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकाल देणार आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, "उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे" यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. दिल्लीच्या राज्यपालांकडून वारंवार प्रशासकीय कामात हस्तक्षेप केला जात असल्याचं हे प्रकरण आहे, असं 'लाईव्ह लॉ' नं म्हटलं आहे.

निकाल आमच्याच बाजूने लागेल - शिरसाट

सर्व कायदेशीर बाजू तपासूनच आम्ही हा उठाव केला होता. त्यामुळे उद्याचा निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते (शिंदे गट) संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल जो असेल तो आम्हाला मान्य असेल पण निकाल आमचा बाजूने लागेल असा आमचा विश्वास आहे असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंची सावध प्रतिक्रिया

दरम्यान याबाबत शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. उद्या निकाल येणार आहे तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न विचारल्यानंतर अदित्य ठाकरे यांनी 24 तास थांबूया अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Political News)

निकालाच्या काय आहे शक्यता ?

-आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाईल

-आमदार अपात्र ठरल्यास मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, त्यामुळे सरकार पडेल.

- कोर्ट राज्यपालांची भूमिका चुकीची ठरवू शकतं

- जैसे थे परिस्थिती ठेवली तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तात्कालीन उपाध्यक्षांकडे जाईल

- 16 आमदार अपात्र ठरवले तर निवडणूक - आयोगाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो.

- असे झाले तर पक्षाचं नाव आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळू शकतं. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद

Beed Accident : चारचाकीची दुचाकी, बैलगाडीला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी; बैलांचेही मोडले पाय

Viral Video : आधी महिला भिडल्या मग पुरुषांमध्येही झाली कुटाकुटी; सिटवरून ट्रेनमध्ये तुफान राडा

Gardening करण्याचे आरोगदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT