Did Governor accept Uddhav Thackeray's resignation
Did Governor accept Uddhav Thackeray's resignationsaam tv

Uddhav Thackeray's resignation News: राज्यपालांनी उद्धव ठाकरेंचा राजीनामा स्विकारला होता का? राजभवनाने दिली धक्कादायक माहिती

Did Governor accept Uddhav Thackeray's resignation: उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे उपलब्ध आहे का अशी माहिती आयटीआयअंतर्गत मागवण्यात आली होती.

Uddhav Thackeray's resignation as Chief Minister: राज्यातील राजकीय वर्तुळाला सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा असताना राज्यपाल भवनाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत दिलेल्या धक्कादायक माहितीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे उपलब्ध आहे का अशी माहिती आयटीआयअंतर्गत मागवण्यात आली होती.

यावर राज्यपालांचे सचिवालय राजभवन कार्यालयाने सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने व राज्यपाल हे ही यात पक्षकार असल्याने याबाबत कोणतीही माहिती देता येणार नसल्याचा अजब दावा केला आहे. बारामती येथील आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रत मागवली होती. त्यावर राज्यपाल भवनाने हे उत्तर दिले आहे.

Did Governor accept Uddhav Thackeray's resignation
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?; शिंदे सरकारमधील मंत्री म्हणाले, मी अत्यंत जबाबदारीने...

राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त तोंडी आपली मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे ऐकिवात होते. हा राजीनामा राजभवन कार्यालयात राज्यपाल महोदयांकडे उपलब्ध आहे का,असल्यास त्याची साक्षांकित प्रत मिळावी याची मागणी मी माहिती अधिकारात केली होती.

राजभवनाने केलेलेल्या या दाव्यामुळे केवळ सत्तासंघर्षाचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण पुढे करत राजभवन कार्यालयाने या राजीनाम्याची प्रत उपलब्ध करून देणं टाळलं की खरंच त्यांच्याकडे असा कोणताही राजीनामा उपलब्धच नाही हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे, असे नितीन यादव यांनी म्हटले आहे. (Latest Pilitical News)

Did Governor accept Uddhav Thackeray's resignation
Patra Chawl Scam: संजय राऊत दिलासा; पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब

आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले की, यापुर्वी जेव्हा मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाबाबत मी माहिती अधिकारात माहिती मागविली होती, त्यावेळेस राज्य सरकाराने न्यायप्रविष्ठ बाब असताना देखील दोन्ही प्रकरणात मला माहिती उपलब्ध करून दिली होती. परंतु या प्रकरणात माहिती न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण पुढे करुन नाकारली जात आहे. हे नेमके कोणाच्या दबावामुळे होतंय की माहितीच उपलब्ध नाही हा चौकशीचा भाग आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

Edited By - Chandrakant Jagtap

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com