राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) जाहीर केली जाणार आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य पोलिस दलामध्ये पोलिस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
संजय लाटकर यांची पोलिस अधीक्षक सायबर, राजीव जैन पोलिस उप निरीक्षक राज्य राखीव पोलिस दल, अभिषेक त्रिमुखे अप्पर पोलिस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, प्रशांत कदम पोलिस अधीक्षक अनुसूचित जाती जमाती आयोग आणि हेमराज राजपूत पोलिस अधीक्षक सायबर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. कोणत्या अधिकाऱ्यांची कुठून कोणत्याठिकाणी बदली करण्यात आली आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
- शिवाज पाटील, पोलिस उप आयुक्त ठाणे शहर यांची बदली पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रधतबंधक विभाग, ठाणे याठिकाणी करण्यात आली आहे.
भरत तांगाडे, अप्पर पोलिस अधीक्षक वाशिम यांची बदली अप्पर पोलिस अधीक्षक, ठाणे इथे करण्यात आली आहे.
- संदीप भाजीभाकरे, पोलिस उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर यांची बदली पोलिस उप आयुक्त पुणे येथे करण्यात आली आहे.
- राजीव जैन, अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई यांची बदली पोलिस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलिस बल महाराष्ट्र राज्य, मुंबई याठिकाणी करण्यात आली आहे.
अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलिस आयुक्त, सशस्त्र पोलिस दल, मुंबई यांची बदली अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई इथे करण्यात आली आहे.
संजय लाटकर पोलिस उप आयुक्त बंदर परिमंडळ मुंबई यांची बदली पोलिस अधीक्षक सायबर, महाराष्ट्र राज्य मुंबई इथे करण्यात आली आहे.
प्रशांत कदम, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-४ मुंबई यांची बदली पोलिस अधीक्षक अनुसूचित जाती-जमाती आयोग, मुंबई इथे करण्यात आली आहे.
हेमराज राजपूत, पोलिस उप आयुक्त परिमंडळ- ६ बृहन्मुंबई यांची बदली पोलिस अधीक्षक सायबर महाराष्ट्र राज्य मुंबई याठिाकाणी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.