Ajit pawar
Ajit pawar  Saam TV
महाराष्ट्र

जनता ठरवेल मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कोणाला करायचं, अजित पवारांचा हल्लाबोल

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्याच्या राजकारणात वादळ उठवणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारवर (Maharashtra Government) मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विरोधी पक्षांकडून टीका-टीपण्णी केली जात आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) त्यांच्या स्वागत समारंभात व्यग्र आहेत, अशी टीका राजकीय वर्तुळातून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. नागरिकांमधून सरपंच करता, तसं जनतेतून मुख्यमंत्री निवडा. महाराष्ट्रातील जनता ठरवेल कोणाला मुख्यमंत्री करायचे. पंतप्रधानाची निवडणूकही जनतेतूनच करा. जनता ठरवेल कोणाला पंतप्रधान करायचे, अशा शब्दांत पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करता आलं नाही. खातेवाटप करता आले नाही. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाल्याने अडीअडचणी निर्माण झाल्या. नांदेड- हिंगोली नदीकाठच्या भागात अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. विदर्भातबी दयनीय अवस्था आहे. शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे.

खरीपाच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गोगलगायचा प्रादुर्भाव झाला आहे. मी विरोधी पक्षनेता म्हणून संपूर्ण भागाचा दौरा केला. तुम्ही सरकार म्हणून तिथे लक्ष घालून अडचणीत सापडलेल्या माणासाला बाहेर काढा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, हे कृतीतून दाखवा, असा सल्ला पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gondia News: अल्पवयीन मुलीचं सिनेस्टाईल अपहरण; सामूहिक अत्याचार करुन हत्या; चौघे पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar Lok Sabha: शरद पवार गटाविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण काय?

Shivsena News: शिवसेना ठाकरे गटाला एकाच दिवसात दोन मोठे धक्के; मढवी यांना अटक तर मोरेंवर तडीपारी...

Horoscope Today: शुक्र ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, मेष ते मीन राशींवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य...

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

SCROLL FOR NEXT