Flood-like situation in Maharashtra; CM Devendra Fadnavis reviews disaster preparedness as heavy rains continue. Saam tv
महाराष्ट्र

Wheather Alert: आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्टवर

Maharashtra on High Alert : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पुराचा धोका असल्याने सरकार आणि प्रशासनाला हाय अलर्ट देण्यात आला आहे. नुकसान कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती सज्जतेचा आढावा घेतला.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला.

  • सरकार आणि प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

  • आज-उद्याचा दिवस चिंताजनक असल्याचा हवामान खात्याचा इशारा.

महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून अनेक नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात सर्वत्र पाऊसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान आज आणि उद्याचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासन अलर्ट झाले आहे.

अतिवृष्टीचा इशारा, पुन्हा सुरू पाऊस आणि काही ठिकाणी कायम असलेली पूरस्थिती याचा आढावा आज देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत उद्याचा दिवस चिंताजनक असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. त्यानंतर कमी दाबाचा पट्टा जो तयार झाला आहे, तो कमी होत जाणार आहे. त्यानंतर परतीचा पाऊस असेल. पुढील दोन, तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल. अशा प्रकारची व्यवस्था करायला सांगितल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून चर्चा केली. सोलापूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांशीही चर्चा केली. मदत आणि पुनर्वसन यासंदर्भात ज्या उपाययोजना केलेल्या आहेत, त्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या लोकांना आपण पुनर्वसन केंद्रात हलवले आहे, त्यांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे, पिण्याचे पाणी असले पाहिजे. याचसोबत काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्यासंदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

दोन हजार कोटी रुपये वितरीत केले आहेत, त्याचे वाटप सुरू केलंय. यासोबत घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्यांना तातडीचे १० हजार रुपये देण्याची सुरुवात करण्यात आलीय. ठिकठिकाणी लोकांना रेशन कीट देण्यास सुरुवात झालेली आहे.

अन्न-धान्य देण्याची सुरुवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, खालची यंत्रणा योग्यप्रकारे काम करत आहे की नाही ते पाहावे. फिल्डवर राहा. मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्याचा अंदाज घेऊन धोकादायक ठिकाणी असलेल्या लोकांना पहिल्यांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार 200 कोटींचा पहिला हप्ता मंजूर

Maharashtra Weather: अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Monday Horoscope : महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर पडणार, धनलाभ होणार; ५ राशींच्या लोकांना कमाईचा नवा मार्ग मिळणार

IND Vs PAK : टीम इंडियात मोठे बदल! हार्दिक, अर्शदीप बाहेर; कोणाला मिळाली संधी? पाहा Playing XI

मुंबई - गोवा महामार्गावर, माणगावमध्ये वाहतूक कोंडी|VIDEO

SCROLL FOR NEXT