Maharashtra jail News saam news
महाराष्ट्र

Maharashtra Jail News: आता कारागृहातील वयोवृद्ध कैद्यांना लागणार चांगली झोप, अपर पोलीस महासंचालकांचा मोठा निर्णय

Maharashtra Jail News: राज्यातील कारागृह विभागातील अडीअडचणी दूर करण्यासाठी अमिताभ गुप्ता यांनी आढावा बैठक आयोजित केली होती.

सूरज सावंत

Maharashtra Jail News: महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांच्या दृष्टीकोणातून अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील कारागृहात असलेल्या ५० पेक्षा जास्त वयाच्या कैद्यांना आता बेड आणि उशी मिळणार आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांनी हा निर्णय घेतला आहे.

अमिताभ गुप्ता यांनी कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक आणि सर्व कारागृहांचे अधीक्षक यांच्यासोबत 15 फेब्रुवारी रोजी बैठक घेतली होती. यावेळी ५० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन कैद्यांना साधारणतः जाड बेड (अंथरून) तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कारागृह विभागातील अडीअडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी अमिताभ गुप्ता यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. कारागृहातील ५० वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेले बंदी आणि काही वयोवृद्ध बंदी आजारी असतात. अशा कैद्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान वयोवृद्ध कैद्यांना बेड आणि उशी आणण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्यासाठी तुरुंग प्रशासनाने काही निकष ठरवले आहेत. यासाठी तुरुंग प्रशासनाकडून बेडच्या उंची आणि रुंदीसाठी परिपत्रकही जारी केले आहे, जेणेकरून सर्व कैद्यांच्या बेडचा आकार समान असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक प्रकरणात रूपाली चाकणकरांची चूक नाही : कृषिमंत्री भरणे

Horoscope Friday: स्पष्ट बोलणं ठरेल फायद्याचं, ५ राशींना आर्थिक तंगीचा करावा लागेल सामना; वाचा शुक्रवारचे राशी

Dhurandhar 2: 'धुरंधर २'ची त्सुनामी! रणवीरने मोडले आमीर-शाहरुख-सलमानचे रेकॉर्ड, असा पराक्रम करणारा पहिलाच हिरो

Good Morning Messages: आपल्याला प्रियजनांना रोमँटिक संदेशासह म्हणा सुप्रभात; शेअर करा हिंदी, मराठी मेसेज

Chanakya Niti : तुम्हाला टिश्यू पेपरसारखे वापरलं जातेय, चाणक्यांनी सांगितलं थेट गुपित

SCROLL FOR NEXT