Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : बायको १०० फूट विहिरीत पडली, नवऱ्याने विचार न करात मारली उडी, मालेगावातील थरारक घटना

Nashik News : मालेगावमध्ये १०० फूट खोल विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी पतीने देखील उडी मारली. गावकऱ्यांच्या धाडसी मदतीने पती-पत्नी दोघांची सुखरूप सुटका झाली असून, दोघांची प्रकृती स्थिर आहे.

Alisha Khedekar

  • मालेगावमध्ये पाणी भरताना २५ वर्षीय महिला १०० फूट खोल विहिरीत पडली.

  • पत्नीला वाचवण्यासाठी पतीने धाडसी उडी मारली.

  • ग्रामस्थांनी खाट आणि दोरीच्या मदतीने पती-पत्नींची सुटका केली.

  • दोघांची प्रकृती स्थिर असून केवळ किरकोळ जखमा झाल्या आहेत.

अजय सोनावणे - नाशिक

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात एक हृदयाला भिडणारी घटना घडली आहे. मालेगाव नामपूर रस्त्यावरील एका १०० फूट खोल विहिरीवर पाणी भरत असताना २५ वर्षीय पूजा कैलास वाघ ही महिला अचानक तोल जाऊन थेट विहिरीत कोसळली. घटना घडताच आजूबाजूला उपस्थित लोकांमध्ये खळबळ उडाली. विहिरीत पडलेल्या महिलेला वाचवण्यासाठी तिच्या पतीने उडी मारली. सुदैवाने गावकऱ्यांच्या मदतीने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा कैलास वाघ या मालेगावातील रहिवाशी आहेत. नामपूर रस्त्यावरील यश गार्डनच्या पाठीमागे असलेल्या सुमारे १०० फूट खोल विहिरीवर त्या पाणी भरण्यासाठी गेल्या असता अचानक तोल जाऊन थेट विहिरीत कोसळल्या. घटना घडताच रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली. त्या क्षणीच पती कैलास वाघ यांनी क्षणाचाही विलंब न करता पत्नीला वाचवण्यासाठी धाडसी निर्णय घेत थेट विहिरीत उडी मारली.

दोघेही पाण्यात तडफडत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. खाट टाकून आणि दोरीच्या साहाय्याने ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न करत अखेर पती-पत्नी दोघांनाही सुरक्षित वर काढले. तात्काळ त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरित उपचार केले.

सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला असून दोघांचे जीव वाचले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी पतीच्या धाडसाचे आणि ग्रामस्थांच्या तात्काळ प्रतिसादाचे कौतुक केले आहे. ग्रामीण भागात अशा प्रसंगी दाखवलेली सामूहिक तत्परता आणि परस्पर मदतीची भावना हीच दोघांच्या जीव वाचविण्यास कारणीभूत ठरल्याचे सर्वत्र सांगितले जात आहे.

घटना कुठे घडली?

मालेगाव, नाशिक जिल्ह्यातील नामपूर रस्त्याजवळ यश गार्डन परिसरात.

नेमका अपघात कसा घडला?

पाणी भरताना पूजा कैलास वाघ यांचा तोल गेला आणि त्या १०० फूट खोल विहिरीत पडल्या.

पतीने काय केले?

पत्नीला वाचवण्यासाठी पती कैलास वाघ यांनी क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी मारली

दोघांची सुटका कशी झाली?

ग्रामस्थांनी खाट आणि दोरीच्या साहाय्याने बचावकार्य करून दोघांना सुखरूप वर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी

Manoj Jarange: मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Maharashtra Tourism: अमरावतीजवळ असलेल्या 'या' 7 ठिकाणांना नक्की फिरून या; हिल स्टेशन पाहून भरेल मन

Shocking: पोटचा मुलगा दारूच्या नशेत आईवरच करायचा बलात्कार, नेहमीच्या त्रासाला कंटाळून केला भयंकर शेवट

Pune Accident : पंढरीतील विठुरायाचा गजर, पिकअपमध्ये भक्तीमय वातावरण; खेडमधील अपघाताआधीचा शेवटचा व्हिडिओ समोर,VIDEO

SCROLL FOR NEXT