ncp crisis Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादी कोणाची? आजच्या सुनावणीत मोठी घडामोड; शरद पवार गटाला दिलासा

Gangappa Pujari

NCP Party And Symbol Hearing:

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाची बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याची मुदत दिली आहे. तसेच निवडणुकांपर्यंत राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेऊन एका आठवड्यात नवे चिन्ह देण्याचे आदेश दिले आहेत.

आजच्या सुनावणीत काय घडलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवारांच्या बाजूने दिल्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह तसेच शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत.

शरद पवार गटाला नवे चिन्ह देण्याचे निर्देश..

सर्वप्रथम, शरद पवार (Sharad Pawar) गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाला मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवण्याची विनंती केली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करण्याची असल्याने हेच नाव द्यावे, असे मनु सिंघवी म्हणाले. या मागणीनुसार शरद पवार गटाने चिन्ह मागितल्यावर एका आठवड्याच्या आत चिन्ह द्यावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार गटाला २ आठवड्यात उत्तर द्यावे लागणार

त्याचबरोबर निवडणुक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार (Ajit Pawar) गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यांनी होणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : अंतरवाली सराटी फाट्यावरील वडीगोद्री येथे तणावाचं वातावरण, ओबीसी- मराठा समाज आमनेसामने

Dhule Crime : प्रेयसीच्या कुटुंबाची मारहाण, प्रियकराचा मृत्यू; धुळे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Manoj Jarange : वडीगोद्री प्रकरणी जरांगेंचं मोठं वक्तव्य !

एलियन की आणखी काही? एरिया ५१ चं रहस्य नेमकं काय?

Nitin Gadkari : घराणेशाहीवर गडकारींचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT