Nandurbar News Saam Tv
महाराष्ट्र

Mission Moolvaat : रोजगारासाठीचं स्थलांतर थांबवण्यासाठी 'मूळवाट' मिशन सुरु, जाणून घ्या सविस्तर

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतराचा कलंक पुसण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने ‘मूळवाट’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत रोजगार गावातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे स्थलांतराचे प्रमाण घटण्यास मदत होईल.

Alisha Khedekar

  • नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतर रोखण्यासाठी ‘मूळवाट’ उपक्रमाची सुरुवात.

  • जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मिती.

  • स्थलांतरित कुटुंबांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

  • या उपक्रमाअंतर्गत नागरिकांसाठी हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

सागर निकवडे, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात लागलेल्या स्थलांतरांचा कलंक पुसण्यासाठी जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे. नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव इतर जिल्ह्यात आणि राज्यात रोजगारासाठी स्थलांतर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थलांतराचे प्रमाण रोखण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली असून जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी 'मूळवाट' हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. स्थलांतर, गरीबी आणि रोजगाराच्या कमतरतेमुळे गाव सोडून दूरवर जाणाऱ्या हजारो कुटुंबांच्या समस्या आता स्थानिक पातळीवरच सोडवल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला 'मूळवाट' हा उपक्रम ग्रामीण सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

हंगामी स्थलांतरामुळे अनेकदा महिलांना आणि बालकांना आरोग्य आणि पोषणाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु जर रोजगार आपल्या गावातच उपलब्ध झाला तर कोणालाही आपलं घर सोडावं लागणार नाही. यासाठी प्रशासनाने पुढील सहा महिन्यांसाठी मनरेगा अंतर्गत नियोजनबद्ध कामांची रूपरेषा तयार केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे कामाची उपलब्धता निश्चित करण्यात आली असून, कामाच्या अभावामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तरीही स्थलांतर झाल्यास, नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी कार्यालयात मुखादमाचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नोंदवावे. यामुळे स्थलांतराच्या ठिकाणी अडचण आल्यास प्रशासनाला तत्काळ मदत करता येईल. प्रशासनाने कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या अडचणींसाठी दोन हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत: मजदूर हेल्पलाईन: 1800 120 11211, महिला व बालक हेल्पलाईन: 1800 3000 2852 या क्रमांकावर संपर्क साधून रोजगार, रेशन, आरोग्य सेवा किंवा अंगणवाडी सेवांशी संबंधित कोणतीही समस्या सोडवली जाणार असे सांगण्यात आले आहे.

तसेच, ग्रामपंचायतीकडे काम उपलब्ध नसल्यास, कोणतीही सामाजिक संस्था किंवा शुभचिंतक थेट या हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात.मूळवाट हा उपक्रम नंदुरबारच्या प्रत्येक नागरिकासाठी सशक्त भविष्याचा मार्ग आहे. प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आज ग्रामीण भागात रोजगार निर्माण होऊन गावोगावी आत्मनिर्भरतेचा नवा प्रवास सुरू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

Cricketer Death : पहिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या महान क्रिकेटपटूचे निधन

Thane Water Supply : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; मुंबई महापालिकेकडून शहरात १० टक्के पाणी कपात

Election: नगरपालिका, नगरपंचायतींवर यंदा 'लाडकी'ची सत्ता, कोणकोणत्या ठिकाणी असणार महिलाराज? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra News : निवडणुकीआधी ‘गुलाबी पंचा’मुळे पुन्हा चर्चा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा लूक आला समोर

SCROLL FOR NEXT