Former Dhule Mayor Kalpana Mahale joins BJP in the presence of Guardian Minister Jaykumar Rawal. Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: निवडणुका जाहीर होताच शरद पवार गटाला भाजपचा दे धक्का; बड्या महिला नेत्यानं सोडली साथ

Dhule Politics : महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच भाजप कामाला लागलीय. धुळ्यात जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या माजी महापौरांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

Bharat Jadhav

  • भाजप धुळे महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता मिळवणार, मंत्री जयकुमार रावल यांचा दावा.

  • महापालिकेतही सत्ता मिळवण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू

  • महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार

भूषण अहिरे, साम प्रतिनिधी

राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजप कामाला लागलीय.पुण्यात अजित पवार यांना आव्हान देणाऱ्या भाजपनं धुळ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का दिलाय. धुळ्यातील माजी महापौर कल्पना महाले यांचा भाजप प्रवेश झालाय. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कल्पना महाले भाजपमध्ये प्रवेश केलाय.

मुंबई, ठाणे, पुण्यासह २९ महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू झालीय. महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर दुसऱ्या दिवशीच निकाल जाहीर होणार आहे. निवडणुका जाहीर होताच भाजप नेते सक्रिय झाले असून निवडणुकीच्या तयारीला लागलेत. पक्षाच्या मोर्चबांधणीसाठी इतर पक्षातील नाराज आणि माजी नेत्यांना आपल्या गोटात ओढून आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काम करत धुळ्यात भाजपनं मोठा डाव खेळत शरद पवार गटाला जबर धक्का दिलाय.

आज पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत धुळ्याच्या माजी महापौर कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेत जयकुमार रावल यांनी कमाल करत एकहाती सत्ता मिळवली होती. तेथे बिनविरोध निवडणूक घडवून आणली हाती. आता महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच जयकुमार रावल कामाला लागलेत. नगरपरिषदेप्रमाणे महापालिकेतही सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय.

महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता मिळवून भाजपचाच महापौर धुळे महानगरपालिके वरती बसवणार असा विश्वास व्यक्त केला आहे. मंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेचे उदाहरण देत, ज्याप्रकारे दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेवरती बिनविरोध सत्ता मिळविली.

त्याचप्रकारे धुळे महानगरपालिकेवर देखील एक हाती सत्ता मिळवत धुळे महानगरपालिका काबीज करणार, असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील शतप्रतिशत भाजपा असाच निकाल महाराष्ट्राचा लागणार, असा देखील विश्वास यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT