eknath shinde x
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि माजी महापौर सुरेश पवार यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याने लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Bharat Jadhav

  • उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

  • माजी महापौर सुरेश पवार यांनीही धनुष्यबाण हाती घेतलं आहे.

  • लातूर जिल्ह्यात आगामी निवडणुकांसाठी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच नेते मंडळींना पक्ष बदलाचे वारे लागले. आगामी काळातील संधी लक्षात घेता अनेक नेते मंडळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनीही भावी संधी आपल्याला मिळेल या आशेनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात शेकडो सहकाऱ्यांसह प्रवेश केलाय. लातूर शहराचे माजी महापौर सुरेश पवार यांनीही धनुष्यबाण हाती घेतलंय. दोन्ही प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला.

शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. बीड, पुणे, बारामती अशा विविध भागांतील राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला. सुधाकर भालेराव २००९ आणि २०१४ साली उदगीर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार होते.

राष्ट्रवादीचे नेते संजय बनसोडे यांनी २०१९ मध्ये भालेराव यांचा पराभव केला. २०२४ साली भाजपने सुधाकर भालेराव यांना तिकीट नाकारल्याने विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. मात्र त्या निवडणुकीतही जनतेने त्यांना नाकारले. त्यानंतर आता ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. तर लातूर शहराचे माजी महापौर सुरेश पवार ६ वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांनीही भालेराव यांच्यासोबत शिवसेना पक्षात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'वंदे भारत'बाबत रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय, PM मोदींनी ट्रेनला दाखवला होता हिरवा झेंडा

Gayatri Datar Wedding: 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार अडकली लग्नबंधनात! थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पाऊस, कांद्याचं झालं नुकसान

Thane Tourism : शाळेला सुट्टी पडली; लाडक्या मुलांसोबत प्लान करा फॅमिली ट्रिप, फिरा ठाण्यातील 'ही' २ सुंदर हिल स्टेशन्स

Jaljeera Benefits: उन्हळ्यात थंडगार जलजीरा प्यायल्याने शरीराला मिळतात हे ७ फायदे

SCROLL FOR NEXT