Maharashtra Municipal Elections Result Live Update Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra Elections Result Live Update : महापालिकांचा कारभारी कोण? मुंबईत भाजप-ठाकरेंमध्ये काटे की टक्कर, वाचा

Maharashtra Mahanagarpalika Elections Result Live Update : राज्यातील २९ महापालिकांवर कुणाची सत्ता येणार? भाजपला किती जागा मिळणार, कोणत्या पक्षाची कुठे सत्ता येणार? निकालाचे सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट इथे वाचा

Namdeo Kumbhar

Solapur nivadnuk nikal LIVE : सोलापूरमध्ये भाजपची लाट, २२ जागांवर आघाडीवर

सोलापुरात भाजपची 22 जागांवर आघाडी

शिवसेना 3 व काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर

सोलापूर महापालिकेतील प्रभाग 1 मधील भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर

भाजपचे उमेदवार गौतम कबसे, राजश्री कणके, पूनम काशीद, अविनाश पाटील हे आघाडीवर

Latur 2026 election Vote counting LIVE : लातूरमध्ये काँग्रेसला मोठी आघाडी

Mahanagarpalika Elections Result Live- अकोल्यात भाजपचा १० का दम, वाचा 

अकोल्यात पोस्टल मतमोजणीत भाजप 10 जागांवर आघाडीवर तर 3 जागांवर काँग्रेस आघाडीवर. तर शिवसेना उबाठा एका ठिकाणी आघाडीवर.

अकोला महापालिका एकूण जागा : 80

आघाडी कोण?.

भाजप : 10

काँग्रेस : 3

उबाठा : 1

अजित राष्ट्रवादी :

शरद राष्ट्रवादी :

वंचित :

एमआयएम :

मनसे :

अकोला विकास समिती :

अपक्ष :

jalgaon : जळगाव महापालिका पहिल्या फेरीत 5 अ शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे 140 मतांनी आघाडीवर विष्णू भंगाळे -746/पियुष पाटील 735

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची दमदार सुरूवात

एकूण जागा - 128

भाजप - 08

शिवसेना - 01

राष्ट्रवादी - 06

काँग्रेस -

शिवसेना (उद्धव ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार) - 02

महाराष्ट्र नवनिर्माण सेना -

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) -

Akola News : अकोल्यात भाजपची आघाडी

अकोला महापालिका एकूण जागा : 80

आघाडी कोण?.

भाजप : 7

काँग्रेस : 2

उबाठा :

अजित राष्ट्रवादी :

शरद राष्ट्रवादी :

वंचित :

एमआयएम :

मनसे :

अकोला विकास समिती :

अपक्ष :

BMC 2026 election result LIVE : मुंबईमध्ये काटें की टक्कर

BMC 2026 election result LIVE : मुंबईमध्ये काटें की टक्कर सुरू असल्याचे चित्र आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना ५० जागांवर आघाडीवर आह. तर ठाकरे बंधूं ३० जागांवर पुढे आहेत. काँग्रेसला १० जागांवर आघाडीवर आहे

Akola election result LIVE  : अकोल्यात पोस्टल मतमोजणीत भाजप 7 जागांवर आघाडीवर तर 2 जागांवर काँग्रेस आघाडीवर.

municipal corporation election result live : संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची मुसंडी, ८ उमेदवार आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर निकाल

टपाल मोजणी कल

आघाडी

भाजप १२

शिवसेना ८

शिवसेना UBT ८

एमआयएम ४

काँग्रेस

राष्ट्रवादी 00

राष्ट्रवादी SP 00

BMC election result LIVE  : मुंबईत ठाकरेंची गाडी सुसाट, १६ जागांवर आघाडीवर

मुंबईत ठाकरेंची गाडी सुसाट, १६ जागांवर आघाडीवर

मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी १२ उमेदवार आघाडीवर आहेत. शिंदेंची शिवसेना ८ तर मनसे ४ जागांवर आघाडीवर आहेत.

भाजप + शिवसेना २०

ठाकरे बंधू १६

काँग्रेस -५

अपक्ष - ५

municipal corporation election result live :  पोस्टल मतांमध्ये भाजप सोलापूरमध्ये १६ जागांवर आघाडीवर आहे. पुण्यात भाजप २४ जागांवर आघाडीवर आहे.

Mumbai BMC election Vote counting LIVE : मुंबईमध्ये भाजपची घौडदौड, भाजपचे २२ उमेदवार आघाडीवर, ठाकरेसेना १० जागांवर पुढे

nagpur election result LIVE : नागपूरमध्ये भाजपचे १९ उमेदवार आघाडीवर,काँग्रेसला ३ जागांवर आघाडी

Mahanagarpalika Elections Result Live :  पिंपरी चिंचवड मतमोजणीला सुरुवात, भाजप आघाडीवर

पोस्टल मतमोजणीत भोसरी विधानसभेत भाजप आघाडीवर

पोस्टल मतमोजणीत पिंपरी विधानसभेत अजित पवार राष्ट्रवादी आघाडीवर.

पोस्टल मतमोजणीत चिंचवड विधानसभेत भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीत काटे की टक्कर

panvel election Vote counting LIVE : पनवेलमध्ये भाजपने खाते उघडले, टपाल मते भाजपच्या पारड्यात

पनवेल महानगरपालिकेचे सात उमेदवार हे बिनविरोध झाले होते

निवडणूक आयोगाने त्यांना आता लगेच बिनविरोध झाले घोषणा करायला आदेश देण्यात आलेले आहे

यामध्ये भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध झाले होते तर एक अपक्ष उमेदवार महिला बिनविरोध झाली आहे

राज्य निवडणूक आयोगाने सात उमेदवारांना बिनविरोध म्हणून घोषणा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या प्रशासनाला पनवेल महानगरपालिकेला दिले आहेत

BMC election result LIVE : टपाल मतांमध्ये भाजपची आघाडी, १२ उमेदवार आघाडीवर

BMC election result LIVE : टपाल मतमोजणीत ठाकरेंनी खाते उघडले, मनसे आणि शिवसेनेचे प्रत्येकी २ उमेदवार आघाडीवर

Thane election result LIVE : ठाण्याचा पहिला कल हाती, भाजपला आघाडी

Maharashtra Elections Result Live Update : महापालिकांचा कारभारी कोण? पोस्टल मतमोजणीला सुरूवात

२९ महापालिकांसाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सर्वात आधी टपाल मते मोजली जाणार आहे. महापालिकांमध्ये कुणाची सत्ता येणार? थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. काही क्षणात पहिला कल हातात येणार आहे.

Sangli 2026 nivadnuk LIVE : स्ट्रॉन रूम आले उघडले , मतमोजणीसाठी ईव्हीएम मशीन टेबलवर पोहचले.

सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मतमोजणीला आता काही वेळात सुरुवात होता आहे,सांगली महापालिकेसाठी 61.3% इतकं मतदान झालं असून प्रत्यक्ष मतमोजणी आता सुरू होणार आहे. स्ट्रॉग रूम उघडून ईव्हीएम मशीन आता मतमोजणीसाठी टेबलवर पोहचत आहे.मिरजेतील सांगली-मिरज रोडवरील वेअर हाऊस या ठिकाणी मतमोजणी पार पडत आहे.निवडणूक प्रशासनाकडून या ठिकाणी मतमोजणीची जयत तयारी करण्यात आली आहे. सांगली महापालिका निवडणुकीसाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत एक टक्क्यांनी घट झाली आहे, त्यामुळे कमी झालेला टक्का कोणाला धक्का देणार याबाबत धाकधुक लागून राहिली आहे.

nagpur nivadnuk nikal LIVE : नागपुरात कोणाची सत्ता येणार, काही तासात होणार स्पस्ट

- साडे नऊ वाजता उघडले जाणार स्ट्रॉंग रूम

- दहा वाजता मतमोजणीला होणार सुरवात

- सुरवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी होणार

- नागपूर शहरात दहा ठिकाणी मतमोजणी

- मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त

- मतमोजणी प्रतिनिधी यायला सुरवात

- दहा वाजतापासून कल यायला होणार सुरवात

- नागपुरात भाजपा आणी काँग्रेस मध्ये लढत

- काँग्रेसने यंदा युवकांना संधी दिल्याने जागा वाढण्याची शक्यता

Solapur election Vote counting LIVE : सोलापुरात स्ट्रॉंग रूम उघडली, मतमोजणी केंद्र क्रमांक 6 मधील स्ट्रॉंग उघडली

सोलापुराच्या 26 प्रभागातील 102 जागासाठी 7 ठिकाणी होणार आहे मतमोजणी

सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, त्यापूर्वी उमेदवार प्रतिनिधीच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली

सोलापुरात 53.02 टक्के मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे

मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाल्यानंतर काल ह्या evm स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या

मतमोजणीसाठी हे स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेत, काही वेळात मतमोजणीला होणार सुरुवात

Mahanagar Palika Nivadnuk nikal LIVE : पिंपरी चिंचवडचा गड अजित पवार राखणार का...?

Maharashtra mahanagarpalika Elections Result Live Update : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीला काहीच वेळात सुरुवात होत असुन सुरवातीला पोस्टल मतमोजणी होईल त्यानंतर बँलेट युनिट मतमोजणी होईल यासाठीची मतमोजणी तयारी पुर्ण झालीय

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीत भष्ट्राचारासोबत दहशत गुंडगिरी अशा विविध मुद्द्यांवर निवडणूक केंद्रीत होती यामध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असाही सामना रंगाला त्यामुळे भाजपाच्या ताब्यातली पिंपरी चिंचवड महापालिका अजित पवार खेचुन आणणार का हेच पहावं लागणार आहे

Pune 2026 election result LIVE : एक्झिट पोलपेक्षा भाजपच्या  ३० टक्के जास्त जागा निवडून येतील - चंद्रकांत पाटील

आम्हाला कुठला ही अहंकार नाही. पुण्यात ११५ जागांवर आमचा विश्वास आहे. आमचा सर्व्हे हा १०६ हा आकडा आहे पण ११५ जागा आम्ही जिंकू असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Maharashtra Elections Result Live Update : महापालिकांचा कारभारी कोण? थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

थोड्याच वेळात राज्यातील २९ महापालिकांसाठी मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कोणत्या महापालिकेवर कुणाची सत्ता येणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय. एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जातोय.

Nanded Municipal Corporation Election : नांदेड महानगरपालिकेसाठी थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील एकूण 81 जागेसाठी 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. काल मतदानाची प्रक्रिया पार पडली जवळपास 61 टक्के मतदान नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेला आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. कुठलाही अनुचित अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे

Pune Municipal Corporation Election: पुणे महापालिका निवडणूक निकाल आज, प्रशांत जगताप यांना विजयाचा विश्वास

निवडणुकीच्या अगोदर काही दिवस काँग्रेस प्रवेश केलेले प्रशांत जगताप यांना विजयाचा विश्वास

मला माझ्या जुन्या पक्षातून पाडण्याचा प्रयत्न केला पण आज विजय होणार

काँग्रेस पक्षाचे आभार

प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप आणि प्रशांत जगताप दोघेही निवडणूक रिंगणात आहेत

मुलाला जनतेने खूप काही दिलाय त्यामुळे आमच्या दोघांचा विजय नक्की आहे

आज आईने प्रशांत जगताप यांना औक्षण केले

Nagpur: नागपूर महानगर पालिकेच्या मतमोजणीकरीता प्रशासन सज्ज

नागपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक काल पार पडल्यानंतर प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज आहे. आज सकाळी १० वाजता या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. निकालाचा प्राथमिक कल दुपारी १ वाजेपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. मतमोजणी प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून निवडणूक कामकाजासाठी ३,५७९ कर्मचारी केंद्राध्यक्ष म्हणून, तर १०,७३७ कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ३८ प्रभागांतून रिंगणात असलेल्या ९९३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज होणार आहे. त्यामुळे पोस्टल बॅलेटमध्ये कोण पुढे, तर ईव्हीएम कुणाला तारणार याची उत्सुकता आता मतदारांना लागली आहे.

Prashant Jagtap: प्रशांत जगताप यांचे त्यांच्या आईकडून औक्षण

प्रशांत जगताप यांना त्यांच्या मातोश्री यांनी केले औक्षण

राष्ट्रवादीला सोडून प्रशांत जगताप यांनी केला प्रवेश

प्रभाग १८ वानवडी साळुंखे विहार मधून प्रशांत जगताप महापालिका निवडणूक लढवत आहेत

Gajanan Shelar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलारांचा राजीनामा

गजानन शेलारांची पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची होती चर्चा

निवडणूक काळात पक्षाच्या बड्या नेत्यांनी नाशकात सभा न घेतल्याचा आरोप

शेलारांच्या निवडणूक काळातील कामगीरीवर पक्षाचे वरीष्ठ नेते होते नाराज

गजानन शेलार यांनी पुतण्यासाठी भाजपचा प्रचार केल्याचीही चर्चा

शेलार यांचा पुतण्या राहुल शेलार भाजपकडून प्रभाग 13 मध्ये आहे रिंगणात

Sangli Municipal Corporation: सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी 61.3 टक्के मतदान

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी एकूण 61.3 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत केवळ 41.79 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची मतदानाची एकूण टक्केवारी हाती आली असून 61.3 टक्के मतदान झाल आहे . तर 2018 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 62.17 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घटल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या 151 नगरसेवकांचा आज निकाल

नागपूर महानगरपालिकेच्या 151 नगरसेवकांचा आज होणार फैसला

नागपूर शहरातील मनपाच्या झोननुसार 10 ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे मतमोजणी केंद्र

सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार मतमोजणी

एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ईव्हीएमसाठी 20 आणि टपाल मतदानासाठी 4 टेबल ठेवण्यात आले आहेत

प्रत्येक टेबलावर एक पर्यवेक्षक आणि एक सहायकाची नियुक्ती करण्यात आली आहे

प्रभागाच्या क्रमवारीनुसार एकएक प्रभागाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे

ज्यामुळे निकाल स्पष्ट होण्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे

मनपाच्या एकूण 38 पैकी 37 प्रभाग चार सदस्यीय आणि एक प्रभाग तीन सदस्यीय आहे

BJP: महापालिका निवडणुकीनंतर भाजप जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला

महापालिका निवडणुकीनंतर भाजप जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आज भाजपची पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक

मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप शहर कार्यालयात पार पडणार बैठक

यावेळी पुणे जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार

आज सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन

Nashik Municipal Election Result Live: नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचा आज निकाल

नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी अटीतटीची लढत झाल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. त्यानंतर नाशिक कोणाचे ? याचा फैसला होणार आहे. शंभर प्लसची घोषणा करणारी भारतीय जनता पक्ष, की त्यांना मात देणारी शिंदेची शिवसेनासेना- अजित पवारांची राष्ट्रवादीराची युती अथवा महाविकास आघाडी याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे. नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडल्यानंतर सायंकाळी सील केलेले ईव्हीएम आणि अन्य सर्व साहित्य स्ट्राँगरूममध्ये पोहोचवण्यात आले आहे. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी होणार आहे. पहिला निकाल साधारण दीड तासात लागणे अपेक्षीत आहे. ६०० निवडणूक कर्मचारी आणि ३००० पोलीस कर्मचारी या दरम्यान कर्तव्यावर असणार आहे, तर कुठल्याही उमेदवाराला विजयी झाल्यानंतर प्रभागातून मिरवणूक काढता येणार नाही, त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Election: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठा बंदोबस्त

शहरात मतमोजणीचे चार केंद्र आहेत त्या चारही केंद्राच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे.

मतमोजणी वेळी गोंधळ टाळण्यासाठी 200 ते 300 मीटर अंतरावर बॅरिगेट्स करण्यात आली आहे.

मतमोजणी वेळी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने मतमोजणी केंद्रापासून 200 ते 300 मीटर अंतरावर बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले.

Maharashtra elections result 2026 live:  पुणेकरांचा कौल कोणाला? पुणे शहरात ५२.४२ टक्के मतदान

पुणे शहरात ४१ प्रभागातील १६३ नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न

१८ लाख ६२ हजार पुणेकरांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी मात्र संध्याकाळी मोठ्या संख्येने पुणेकर पडले बाहेर

एकूण मतदार: १८ लाख ६२ हजार ४०८

पुरुष मतदार: ९ लाख ७३ हजार ५०३

महिला मतदार: ८ लाख ८८ हजार ८०९

इतर मतदार: ९६

सर्वाधिक मतदान झालेला प्रभाग: शिवणे खडकवासला प्रभाग ३३ (५८ टक्के)

सर्वात कमी मतदान झालेला प्रभाग: औंध बोपोडी, प्रभाग ८ (४५ टक्के)

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 55.59 टक्के मतदान..

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 55.59 टक्के मतदान झाले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये 8 लाख 63 हजार 879 पुरूष, 7 लाख 85 हजार 831 महिला आणि 159 इतर असे एकूण 16 लाख 49 हजार 869 मतदार होते. त्यापैकी 483698 पुरूष , 433385 स्त्री आणि 40 इतर असे एकूण 917123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या मतदान प्रक्रियेत सुमारे ५७.७१ टक्के मतदानाची नोंद

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून सुमारे सरासरी ५७.७१ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

मतदारसंघातील दर दोन तासांची सरासरी मतदान टक्केवारी

८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयअंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.५६ टक्के मतदान झाले. तर सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात वाढ होऊन ते १६.३ टक्के इतके झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २८.१५ टक्के इतके झाले. त्यानंतर दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४०.५ टक्के मतदान पार पडले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५७.७१ टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते.

प्रभागनिहाय मतदान टक्केवारी -

प्रभाग क्र. १ – ६०.६१ टक्के

प्रभाग क्र. २ – ६४.९१ टक्के

प्रभाग क्र. ३ – ६०.९७ टक्के

प्रभाग क्र. ४ – ५७.०८ टक्के

प्रभाग क्र. ५ – ६१.५८ टक्के

प्रभाग क्र. ६ – ५५.७२ टक्के

प्रभाग क्र. ७ – ५८.३७ टक्के

प्रभाग क्र. ८ – ६०.१९ टक्के

प्रभाग क्र. ९ – ५६.९१ टक्के

प्रभाग क्र. १० – ४९.५४ टक्के

प्रभाग क्र. ११ – ५४.७१ टक्के

प्रभाग क्र. १२ – ६५.१४ टक्के

प्रभाग क्र. १३ – ५४.२७ टक्के

प्रभाग क्र. १४ – ५३.४४ टक्के

प्रभाग क्र. १५ – ५५.५६ टक्के

प्रभाग क्र. १६ – ६२.४५ टक्के

प्रभाग क्र. १७ – ६०.०४ टक्के

प्रभाग क्र. १८ – ५६.१८ टक्के

प्रभाग क्र. १९ – ४९.२२ टक्के

प्रभाग क्र. २० – ५५.४२ टक्के

प्रभाग क्र. २१ – ५६.७६ टक्के

प्रभाग क्र. २२ – ६०.२८ टक्के

प्रभाग क्र. २३ – ६३.३७ टक्के

प्रभाग क्र. २४ – ६१.७२ टक्के

प्रभाग क्र. २५ – ६०.४८ टक्के

प्रभाग क्र. २६ – ५५.३० टक्के

प्रभाग क्र. २७ – ६१.०१ टक्के

प्रभाग क्र. २८ – ५४.८८ टक्के

प्रभाग क्र. २९ – ५४.५९ टक्के

प्रभाग क्र. ३० – ५४.२२ टक्के

प्रभाग क्र. ३१ – ५२.०० टक्के

प्रभाग क्र. ३२ – ५७.५९ टक्के

Maharashtra Elections Result Live Update : २९ महापालिकांत कौल कोणाला? कोणाची सत्ता, कोणाला धक्का? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह प्रमुख शहरांमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईत कुणाची सत्ता येणार? पुणे-पिंपरीत काय होणार? नाशिकमध्ये कोण बाजी मारणार.. याकडे राज्याचे लक्ष लागलेय. आज सकाळी १० वाजेपासून निकालांचे कल समोर येण्यास सुरुवात होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक ठिकाणी अटीतटीची लढत असल्याने प्रत्येक फेरीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections: मतमोजणी सुरु होताच भाजपचे ६ उमेदवार विषयी घोषित; पाहा कुठे लागला निकाल

Gold Price Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर किती?

Todays Horoscope: या राशींच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात; वाचा आजचं राशीभविष्य

Mumbai Travel: मुंबईतील या 5 ठिकाणांना भेट दिली नाही, म्हणजे मुंबई पाहिलीच नाही

Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीसमोर आलं नागराजचं सत्य; मालिका घेणार 'हे' धक्कादायक वळण, सुमन काकूचं काय होणार? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT