शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान'चे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त विधानाचे विधानपरिषदेतही पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.
संभाजी भिडेंवर कारवाई करण्याबाबत विरोधक आक्रमक झाले होते. आज पावसाळी अधिवेशनाच्या ११ व्या दिवशी विधामंडळाच्या बाहेर यावरून जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली.
विरोधक आक्रमक..
संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वक्तव्याने विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कॉंग्रेससह राष्ट्रवादीनेही भिडेंविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. "मनोहर भिडे महात्मा गांधी अपमान करतात. त्यांना सरकार प्रोटेक्शन देत आहे. महापुरुष अवमान करायचे आणि सरकारी संरक्षणमध्ये राहतात हे काढा.." अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
सख्खा भाऊ असला तरी कारवाई करणार...
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांना कोणतेही प्रोटेक्शन नसून ही माहिती चूकीची असल्याचे स्पष्ट केले. तसेच "संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वाकरता काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांशी बहुजन समाजाला जोडतात. तरीही त्यांना महापुरुषांवर असं वक्तव्य करण्याचा कुणीच अधिकार दिलेला नाही. तसा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळे असं करणाऱ्यांवर कारवाई होईल..." असेही ते यावेळी म्हणाले.
यशोमती ठाकूर यांना संरक्षण देणार...
दरम्यान, संभाजी भिडे यांच्याविरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर कॉंग्रेस (Congress) आमदार यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यशोमती ठाकूर यांना सुरक्षा देणार असल्याचं सांगितले आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.