Maharashtra Monsoon Session: रायगड जिल्ह्यात २११ दरडप्रवण गावे; राज्य सरकारने विधानपरिषदेत दिली माहिती

Raigad Villages With Landslide Risk: आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी विचारलेल्या प्रश्नावर मदत व पुनर्वसन विभागाने ही लेखी माहिती सादर केली आहे.
Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon SessionSaamtvnews
Published On

Raigad News:

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी येथे भूस्खलनाची घटना घडली होती. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला तर ७८ जणांना बेपत्ता घोषित करण्यात आले.

या दुर्देवी घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील दरड प्रवणक्षेत्रांचा मुद्दा चर्चेत आला होता. याबद्दल आता मोठी बातमी समोर आली असून रायगड जिल्ह्यात २११ गावे दरडप्रवण असल्याचे सांगण्यात आले आहे.

Maharashtra Monsoon Session
BJP Pappu Chavan Case : माझे राजकीय अस्तित्व त्यांना खूपतयं... शिवसेना आमदाराने खूनाची सुपारी दिल्याचा आराेप, दाेघे अटकेत

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) रायगड (Raigad) जिल्ह्यातील २११ गावे दरड प्रवण असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी विचारलेल्या प्रश्नावर मदत व पुनर्वसन विभागाने ही लेखी माहिती सादर केली आहे.

रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळे पूर आणि भुस्खलनाच्या घटना जिल्ह्यात सातत्याने घडतात. त्यामुळे रायगड जिल्हा हायअलर्ट मोडवर असून इर्शाळवाडी सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.

Maharashtra Monsoon Session
ACB Trap : महसूलदिनीच नायब तहसीलदारावर एसीबीचा ट्रॅप; शेतकऱ्याकडून स्विकारली तीन हजाराची लाच

समोर आलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात ६, मुरुड ६, पेण १०, पनवेल ३, उरण १, कर्जत ४, खालापूर ८, रोहा १६, सुधागड ३, माणगाव ७, श्रेवर्धन ७, म्हसळा ६, महाड ७५, पोलादपूरमध्ये ५९ गावे दरडप्रवण आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास या गावांना दरड कोसळण्याचा धोका आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com