Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: '...मेटेंच्या कारचा अपघात कसा झाला?'; देवेंद्र फडणवीसांनी नेमकं कारण सांगितलं!

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी वर्षा गायकवाड यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. १७ आणि १८ ऑगस्ट रोजी दोन दिवस सभागृहाचं कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांचा मुद्दा उपस्थित केला.

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघाताची सरकारने चौकशी लावली आहे, मात्र इतर महामार्गावरही अपघात होत आहेत. अनेक अपघात हे खड्ड्यांमुळे होतात. कोकणातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. माझ्या डोळ्यांसमोर त्या दिवशी खड्ड्यांमुळे एक अपघात झाला. याबाबत शासन काय धोरणात्मक निर्णय घेणार आहे, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.

चालकाच्या चुकीमुळे मेटेंच्या कारला अपघात - फडणवीस

वर्षा गायकवाड यांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मेटेंच्या अपघाती निधनाबाबत अनेक गोष्टी कार्यकर्ते व त्याच्या पत्नींनी माझ्यााजवळ उपस्थित केल्या आहेत. मेटेंच्या चालकाने ओव्हरटेक केल्यामुळे अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली. याबाबत विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलता येईल. मात्र गंभीर बाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही असे म्हटले गेले.

हे देखील पाहा -

मात्र चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई व रायगड पोलीस त्यांचा रस्त्यात शोध घेत होते. मात्र एक प्रवासी मदतीसाठी थांबला. त्याने IRB कडे मदत मागितल्यावर ७ मिनिटांत मदत मिळाली. मात्र ही यंत्रणा चुकीची आहे.

अशा वेळी अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होते, अशी यंत्रणा उभी करण्यावर आम्ही भर देणार आहोत. मार्गिका सोडून चालणाऱ्या ट्रेलरवर कारवाई करणार असून मार्गिका सोडून जाणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई करता येईल अशी यंत्रणा उभी करणे गरजेचे असून त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलाॅजीचा वापर करणार आहोत, असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

आपण रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे. मी सभागृहात सांगतो की हा प्रवास टाळला पाहिजे. मीही रात्री प्रवास करतो. त्यामुळे आपण सर्वांनी रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे. कारण अपघात होण्याची शक्यता असते. विनायक मेटे यांच्या पत्नी म्हणाल्या की, मी त्यांना रात्री प्रवास करु नका असं सांगितलं होतं, मात्र त्यांनी ऐकलं नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Meenatai Thackeray Statue: हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे संतापले

Dharashiv : मुसळधार पावसाने नद्यांना महापूर; चांदणी नदीच्या पुरात तरुण वाहिला, पोलिसांना वाचविण्यात यश

Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Narendra Modi: सामान्य चहावाला ते देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदींचे हे फोटो पाहिलेच नसतील

Pratapgad Fort History: शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आणि ऐतिहासिक महत्त्व, प्रतापगड किल्ल्याचा इतिहास

SCROLL FOR NEXT