Uddhav Thackeray and Ambadas Danve during a political event as MVA finalizes its candidate for MLC elections. Saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; 'या' निष्ठावंताला दिली संधी

MLC Elections: महाविकास पक्षाने अंबादास दानवे यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवणार नाहीत आणि यामुळे महाराष्ट्राचे राजकीय चित्र पालटले आहे.

Bharat Jadhav

विधान परिषदेच्या उमेदवारीवरून सुरू असलेला मविआचा सस्पेन्स आज संपला आहे. विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी ठाकरे गट आग्रही होते, दुसरीकडे काँग्रेसनं ठाकरे गटाला पाठिंबा देताना अट ठेवली होती. त्यामुळे विधान परिषदेत उद्धव ठाकरे जाणार का इतर कोणी उमेदवार निवडणुक लढवणार हा याची गुढता दिवसेंदिवस वाढत होती. आज मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाआधीच ठाकरे गटाने उमेदवारील सस्पेन्स दूर केला.

ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार नाहीत. याआधी चर्चा होती की, विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार. परंतु ऐनवेळी ठाकरे गटाने आपला डाव खेळत अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे. जर उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवणार असतील तरच काँग्रेस त्यांना पाठिंबा देईल अशी भूमिका विजय वडेवट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली होती. आता अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्याने काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर दानवे यांनी साम टीव्ही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाष्य केलं. मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), सपा यांसह इतर घटकपक्षांचा मी उमेदवार आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.

दरम्यान विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० एप्रिल असून त्याआधीच ठाकरे गटाने उमेदवारीचा पत्ता फेकला. ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे हे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. त्याच्या ऐवजी ते अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी त्यांची आधीपासून इच्छा होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे भाव वाढले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहोचले; जाणून घ्या 24k, 22k,18k चे दर

Maharashtra News Live Update : शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात छात्र भारतीचा मोर्चा

8th Pay Commission: मोठी बातमी! ₹45 हजार किमान पेन्शन, वर्षातून 4 वेळा DA वाढीची मागणी

FSSAI pan masala rules: पान मसाल्याचे प्लास्टिक पाउच होणार बंद; FSSAIचा मोठा निर्णय

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

SCROLL FOR NEXT