Maharashtra MLC Election Saam tv
महाराष्ट्र

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Maharashtra MLC Election: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. कुणाला कोणती जागा मिळाली ते घ्या जाणून...

Priya More
  • महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत मोठी अपडेट

  • निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

  • पुणे शिक्षक मतदारसंघासाठी सचिन सानप यांच्या नावाची चर्चा

  • पुणे शिक्षक जागेवर भाजप आणि शिवसेनामध्ये रस्सीखेच सुरू

गणेश कवडे, मुंबई

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील आगामी निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. विधानपरिषद जागेचा महायुतीचा अंतिम फॉर्मूला जवळपास निश्चित झाला आहे. पुणे शिक्षक जागेवर भाजप आणि शिवसेनामध्ये रस्सीखेच सुरू आहे. संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाकडे, नागपूर पदवीधर मतदारसंगाची जागा भाजपकडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी देखील माहिती समोर आली आहे की, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र जागावाटपावरून अद्याप एका जागेवर तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच कायम आहे. त्यात पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा कोणाच्या वाट्याला जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात सध्या काँग्रेसचे जयंत आसगावकर आमदार आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीसाठी महत्त्वाची मानली जात असून महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या जागेवरून शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी गेल्या काही काळापासून शिक्षक संघटनांशी संपर्क वाढवत निवडणुकीची तयारी केली आहे. दुसरीकडे भाजपकडूनही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा नेमकी भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे, यावर महायुतीतील चर्चांना वेग आला आहे.

पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पुण्याची शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी शिंदेसेनेचे दोन नेते प्रचंड आग्रही असून दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. उदय सामंत यांचे निकटवर्तीय सानप आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे पुण्याच्या जागेसाठी आग्रही आहेत. मात्र ही जागा भाजप दोघांनाही देणार नसल्याची सुत्रांची माहिती आहे. तरीदेखील शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे. एकनाथ शिंदे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयी आज चर्चा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

Asia Cup Final : पाकिस्तान चारमुंड्या चित, भारतानं आशिया चषकावर कोरलं नाव, शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय

BJP MLA Video: खांद्यावर kiss केलं नंतर दातात कान पकडला! भाजप आमदाराच्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ

मनसेचा छटपूजेला विरोध, मात्र पक्षाच्याच नगरसेविकेकडून आयोजन|VIDEO

SCROLL FOR NEXT