स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या विधानपरिषदेच्या 17 जागांसाठीच्या निवडणुकीने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन उमेदवारांसह महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र या निवडीत मोठा घोडेबाजार झाल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. एवढंच नव्हे तर हा घोडेबाजार रोखण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडणार असून याचे पुरावेही असल्याचा दावा त्यांनी केलाय. तर माणसं पैशाने नव्हे, तर प्रेमाने जिंकता येतात, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.
दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत सहा उमेदवारांनी माघारी घेतल्याने काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे. यावरुनच काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी स्वपक्षीय नेत्यांवरच पैसे वाटल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत. विधान परीषद निवडणुकीत नेहमीच धनशक्ती काम करते, असा सूर सर्वत्र उमटतोय. यंदाही तेच चित्र कायम असल्याचं दिसतंय. अनेक उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील कोट्यवधीच्या संपत्तीचे आकडे पाहून ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याची नाही. आता सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते घोडेबाजाराचा मुद्दा कसा लावून धरणार? आव्हान दिल्याप्रमाणे खरचं पैसे दिल्याचे पुरावे देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.