Prakash Ambedkar On BJP  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: योगेश कदमांनी केलेल्या विधानावरून प्रकाश आंबेडकर संतापले, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

Prakash Ambedkar Demands Resignation: योगेश कदम यांनी केलेल्या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कदम यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Bhagyashree Kamble

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यातील वातावरण तापलंय. नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केलाय. मात्र, या प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी असंवेदनशील विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या विधानानंतर विरोधकांनी टीकेची राळ उठवली.

कदम यांनी केलेल्या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातल्या राजकरणाला सध्या लकवा मारलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्री कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय? असं आंबेडकर म्हणाले आहेत.

कदम यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलेली दिरंगाई पुणे पोलिसांच्या अपयश आहे, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.

दीड हजार पानांच्या आरोप पत्रावर टीका

प्रकाश आंबेडकर यांनी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात, बीड पोलिसांनी दाखल केलेल्या दीड हजार पानांच्या आरोप पत्रावर जोरदार टीका केलीये. बीड पोलिसांनी दाखल केलेल्या दीड हजार पानांचे आरोपपत्र खूप मोठे आहे. हे आरोपपत्र आहे की पीएचडीचा प्रबंध? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

दीड हजार पानांच्या आरोपपत्रातून गोंधळ निर्माण होऊ शकतो. तसेच याचा फायदा आरोपींना होऊ शकतो, अशी शंका आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल करणाऱ्या पोलिसांची कीव करावीशी वाटतेय, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

SCROLL FOR NEXT