Maharashtra Rain Alert Weather Updates Paus Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाने आता कधी, कुठे दिला पावसाचा अलर्ट?

Maharashtra Rain Update: भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Rain Update:

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील काही महत्त्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे :-

हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ६८९ क्यूमेक्स विसर्ग

इरई (चंद्रपूर) (एकूण क्षमता १५२.४० दलघमी) आत्तापर्यंत ३६.३८ क्यूमेक्स विसर्ग

गोसीखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत १८६८.९३ क्यूमेक्स विसर्ग

भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत २३.२२ क्यूमेक्स विसर्ग

दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४ दलघमी) आत्तापर्यंत ११.३३ क्यूमेक्स विसर्ग

ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत १२६ क्यूमेक्स विसर्ग

निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत ७६.८४ क्यूमेक्स विसर्ग

नीरा-देवघर (पुणे) (एकूण क्षमता १५२.४० दलघमी) आत्तापर्यंत १७ क्यूमेक्स विसर्ग

बेंबळा (पुणे) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्यूमेक्स विसर्ग

दरम्यान, पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी सकाळी ०३:४६ आणि दुपारी ०३:३२ वाजता भरतीची वेळ देण्यात आली आहे. तसेच सकाळी ३.६ मीटर आणि दुपारी ३.७ मीटरपर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

वीज कोसळण्याची शक्यता असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते. नागरिकांनी आपत्तींचा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

SCROLL FOR NEXT