Maharashtra Breaking Live Marathi news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live Update: पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप चंद्रन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 06 March 2025: आज गुरुवार दिनांक ०६ मार्च २०२५ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकीय घडामोडी, स्वारगेट एसटी डेपो अत्याचार प्रकरण, दत्ता गाडे, धनंजय मुंडे राजीनामा प्रकरण, अर्थसंकल्पीय अधिवेशन, संतोष देशमुख हत्या प्रकरण, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Dhanshri Shintre

Pune : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप चंद्रन

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद गेल्या ११ महिन्यांपासून रिक्त होते. याठिकाणी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

 Raigad : रायगड जिल्‍ह्यात वणव्‍यामुळे घरांची राखरांगोळी

० रायगड जिल्‍ह्यात वणव्‍यामुळे घरांची राखरांगोळी झाली आहे.

० जंगलात लागलेल्‍या आगीत 25 ते 30 घरे जळून खाक झाल्याल्‍याची प्राथमिक माहिती, आकडा वाढण्याची शक्यता

० रोहा तालुक्‍यातील इंदरदेव धनगर वाडी येथील घटना

० संध्याकाळी 5 वाजण्‍याच्‍या सुमारास लागली आग

० आगीत कुठलीही जीवीत हानी झाली नसलीतरी मालमत्‍तेचे लाखो रूपयांचे नुकसान

० रोहा नगर पालिका व इतर कंपन्‍यांची फायर ब्रिगेड यंत्रणा घटनास्‍थळी

० बचाव पथकांचे मोठे सहकार्य आगीवर नियंत्रण मिळवण्‍यात यश

० डोंगरावर शेतघरे असल्‍याने गावात तेथे कुणीच नव्‍हते त्‍यामुळे आगीची माहिती मिळण्‍यास उशीर झाला

तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाच्या कामावर संभाजीराजेंचा आक्षेप

चुकीच्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिराचे संवर्धनाचं काम होत असल्याचा संभाजी महाराजांचे मत

मंदिर संवर्धन करत असताना भिंतीवर केलेले ब्लास्टिंग चुकीचे , संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी

तुळजाभवानी देवीच्या शिखराच्या पुनर्बांधणीच्या कामाला ही विरोध, केंद्रीय पुरातत्व खात्याचे मत घेऊनच पुढचा निर्णय घ्या

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांचा शिवसेनेत प्रवेश.

थोड्याच वेळात मुंबईतील मलबार हील येथे घेणार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

विजय अंभोरे यांनी गेल्याच आठवड्यात दिला होता काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा व काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या स्वजिल्ह्यातच मोठा धक्का.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील ॲड असीम सरोदे यांनी केलेली याचिका कोर्टाने फेटाळली

स्वारगेट अत्याचार प्रकरणांमध्ये महिलेची बदनामी करणारे वक्तव्य आणि बातम्या येत असल्याने दाखल केली होती याचिका

सदरची याचिका आम्ही फेटाळत असल्याचं कोर्टाने आदेशात म्हटलेलं आहे

सूचना देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे असल्याचं कोर्टाच निरीक्षण नोंदवले

त्यामुळे असिम सरोदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला दाखल

सतीश भोसलेच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपी सतीश भोसले ने दोन दिवसांपूर्वी ढाकणे कुटुंबीयांना बेदम मारहाण केली होती.

यामध्ये दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या दोघांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती याचे व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाले.

दिलीप ढाकणे महेश ढाकणे यांच्या फिर्यादीवरून सतीश भोसले वरती शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एफ आय आर

Nanded :  मराठा समाजाने कराड, मुंडे आणि अजित पवार यांच्या प्रतिमेचे दहन करत नोंदवला निषेध

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद आता नांदेड जिल्ह्यात देखील उमटत आहेत.नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने वाल्मिक कराड,धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्य भरात संतापाची लाट निर्माण झालीय.तामसा येथे सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.कराड,मुंडे, आणि अजित पवार यांच्या प्रतिमेचे दहन करत दोषींना फाशी देण्याची मागणी करण्यात आलीय.

Solapur : सोलापुरात वैरागच्या संतनाथ सहकारी साखर कारखान्याला लागली भीषण आग

- बार्शी तालुक्यातील वैरागच्या संतनाथ सहकारी साखत कारखान्यात लागली भीषण आग

- मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे कारखाना परिसरात पसरले धुरांचे लोट

- गेल्या अनेक दिवसांपासून कारखाना बंद अवस्थेत असल्याने कुठल्याही पद्धतीची जीवितहानी नाही.

- मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात कारखान्याची साधनसामग्री जळून गेल्याने झाले आर्थिक नुकसान

- आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट,आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांचे प्रयत्न सुरु

Pune : पुणे महापालिका इमारतीसमोर मनसेचे अनोखं आंदोलन

- शहरात मुलांना खेळण्यासाठी मनापाचे क्रिडांगणा सुरु व्हावे या मागणीसाठी पुणे मनपा इमारती समोर क्रिकेट खेळून निषेधार्थ मनसे आंदोलन करणार.

- शहरातील मैदान खेळण्यासाठी मोकळी करावी या मागणीसाठी मनसे आंदोलन करत आहेत.

- मनपा इमारतीसमोर क्रिकेट खेळत आंदोलन करत आहेत.

- शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जातं आहे.

नाशिकमध्ये दोन बेकायदेशीर महिला सावकारांवर गुन्हा दाखल

- पंचवटी आणि सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ

- पंचवटीत स्वाती रामराजे आणि सातपूरमध्ये माधुरी गांगुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल

- महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल

- सहकार विभागातील शैलेश पोद्दार आणि प्रदीप महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

- नाशकात सावकारी जाचात महिलांचाही समावेश आढळून आल्यानं खळबळ

कल्याणमध्ये सराईत रिक्षा चोरट्याला ठोकल्या बेड्या, चार रिक्षा केल्या जप्त

कोळशेवाडी पोलिसांनी एका सराईत रिक्षा चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत .राजेंद्र जाधव असे चोरट्याचं नाव असून तो डोंबिवली येथे राहणारा आहे. कल्याण डोंबिवलीत रिक्षा चोरून कर्जत परिसरात विकत होता. राजेश जाधव विरोधात या आधी देखील डोंबिवली ,मानपाडा, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजेशकडून चोरी केलेल्या चार रिक्षा कोळशेवाडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत

वाढत्या तापमानामुळे उन्हाळी मिरचीवर मावा, फुलकिड्यांचा प्रादुर्भाव

उन्हाळ्यात लाल मिरचीला मोठी मागणी असते, त्यामुळे शेतकरी उन्हाळी मिरचीची अधिक लागवड करतात, त्यासाठी योग्य जमिनीची निवड, हवामान, बियाणांची निवड, खत, पाणी व्यवस्थापन, रोग कीड नियंत्रण आदी बाबी महत्त्वाच्या असुन, दर चांगला असला तरी सध्या फुलकिडीमुळे मिरचीचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, उष्णतेमुळे मावा, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव जास्त होतो, फुलकिडीचे पिले आणि प्रौढ पानाच्या व वरच्या बाजूस राहतात ही कीड पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याने मिर्ची उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात ऑनलाईन बॅटिंगचा सुरसुराट

नंदुरबार जिल्ह्यात ऑनलाईन बॅटिंगचा सुरसुराट

विदेशी ॲपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना लाखोंचा गंडा

ऑनलाइन जुगार खेळणे अनेक तरुणांना पडलं महागात

एका विदेशी ॲपच्या माध्यमातून विविध पद्धतीने ऑनलाईन पैसे लावून त्याचे डबल बनवण्याचा नादात अनेक तरुणांचे पैसे बुडाल्याची माहिती

ऑनलाइन जुगार संदर्भात पोलीस ठाण्यात अद्यापही कोणतीही तक्रार दाखल नाही

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या विदेशी एप्लीकेशनच्या लिंक्स फॉरवर्ड केल्या जात आहेत

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दिंडोरी येथे सर्व पक्षीय रास्ता रोको

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटत असून आज नाशिकच्या दिंडोरी येथे सर्वपक्षीय नेते,सामाजिक संघटना यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,ज्या नराधमांनी त्यांना मारले त्यांना फाशी द्यावी अशी मागणी करत संशयित आरोपींच्या पोस्टारला जोडे मारत निषेध व्यक्त केला,यावेळी लवकरात लवकर हत्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदन देण्यात आले

Vasant More: संतोष देशमुख यांच्या हत्यावरून वसंत मोरे आक्रमक

संतोष देशमुख यांच्या आरोपींचे पुतळे बनवून कात्रज चौकात दिली फाशी...

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बघून वसंत मोरे संतापले

कात्रज चौकात संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींचे पुतळे लटकवून त्यांना एकत्रित फाशी देण्यात आली..

यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही केली..

अजित पवार एवढे दिवस झोपले होते का वसंत मोरे यांचा सवाल...

राज्यात चौका चौकात आरोपींचे पुतळे लटकवून त्यांना फाशी द्या...

वसंत मोरे यांचं आवाहन

संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा -  संभाजी ब्रिगेड

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संदर्भाची लाट पसरली आहे. याचे तीव्र पडसाद नाशिक मध्ये देखील उमटायला सुरुवात झाली असून नाशिक मध्ये आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुलभ सौचालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आल आहे धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे फोटो शौचालयात लावण्यात आले असून मूत्रविसर्जन आंदोलन केलय... दरम्यान वाल्मीक कराड आणि संतोष देशमुख यांचे फोटो शौचालयाच्या बाहेर फाडून निषेध नोंदवलाय . तसेच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Yavatmal: सरपंच देशमुख हत्याप्रकरणी उमरखेड शहर सकल मराठा समाजाकडून बंद

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ यवतमाळच्या उमरखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले असून सकल मराठा समाजासह सामाजिक संघटनांकडून हा बंद पुकारण्यात आला आहे.

बीड येथे घडलेल्या सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच या हत्येला कारणीभूत असणाऱ्या सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी व कठोर शासन व्हावे यासाठी उमरखेड शहर बंद पुकारण्यात आले आहेत.

Pune: पुणे पोलीस दलात लवकरच अतिरिक्त आयुक्तांसह सहा पोलीस उपायुक्त

पुणे शहराची लोकसंख्या आणि कार्यक्षेत्र विस्तार वाढला असून,

या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेसाठी एक स्वतंत्र अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह इतर सहा पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

मान्यता मिळाल्यास लवकरच पुण्याला अतिरिक्त आयुक्तांसह पोलीस उपायुक्त मिळणार आहेत.

दोन सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून दररोज नागरिकांची लाख रुपयांचे फसवणूक होत आहे.

सायबर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी यंत्रणापुरी पडत असून,

पूर्व आणि पश्चिम प्रादेशिक विभागानुसार शहरात आणखी दोन सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात बाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

Maharashtra Politics: सतीश भोसले प्रकरणावरून लक्ष्मण हाके यांची सुरेश धस यांच्यावर टीका

खोक्या भोसले हा सुरेश धस यांचा एकदम खास कार्यकर्ता

भोसले हा धसांच्या पहिल्या पाच कार्यकर्त्यांमध्ये

लक्ष्मण हाके यांचा आरोप

सुरेश धस निवडणुकीला उभे असताना दीडशे गाड्यांचा ताफा घेऊन हा भोसले येत असत

सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आका हा शब्द दिला , सुरेश धस यांनी आता आता हा शब्द आपल्याला लावून घ्यावा या खोक्या भोसलेचा आका  नेमका कोण आहे

Pune: निवडणूक रखडल्याचा महापालिकेला फटका, पुणे महापालिकेचे 240 कोटी बुडणार

१५ व्या वित्त आयोगाचे पैसे देण्यास केंद्राचा नकार

महापालिकेत १५ व्या वित्त आयोग अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत मंजूर झालेल्या निधीतील शेवटचा हप्ता देण्यास केंद्रशासनाने दिला नकार

हा निधी देण्यासाठी महापालिकेत लोकनियुक्त सदस्य असणे बंधनकारक आहे

मात्र तीन वर्षापासून महापालिकेच्या निवडणुकाच न झालेले ही अट महापालिकेस पूर्ण करणे शक्य नाही

त्यामुळे केंद्राची मंजुरी असतानाही महापालिकेला निधीवर पाणी सोडावा लागणार.

Metro: मेट्रोच्या गोदामातून सहा लाख २८ हजारांचे साहित्य चोरून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक

खडकी परिसरात ही घटना घडली

वरुण भूपेंद्र नायडू (वय २२), सैबन्ना बसवराज पुजारी (वय २३, दोघे रा. आदर्शनगर, बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे

याबाबत मेट्रोचे प्रकल्प व्यवस्थापक जिओजॉन्सन एझेर यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती

खडकी मेट्रो स्थानक परिसरात मेट्रोचे गोदाम आहे. गोदामात मेट्रोने वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ठेवले होते

आरोपींनी मेट्रोच्या गोदामाचे कुलूप तोडून सहा लाख २८ हजार रुपयांचे साहित्य चोरले

दोघे जण पुन्हा साहित्य चोरण्यासाठी गोदामाच्या परिसरात आले. तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

पंढरपुरात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी, सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज पंढरपुरात आंदोलन करण्यात आले.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे अशी मागणी केली जात आहे.

या मागणी आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी धनंजय मुंडे, वाल्मीक कराड सह इतर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन या घटनेचा निषेध ही केला.

धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

Pandharpur: फलटण रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू; 45 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

ब्रिटिश काळापासून रखडलेल्या पंढरपूर ते फलटण रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण सुरू झाले आहे.

१९२३ साली रेल्वे मार्गासाठी पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील १८ गावांमध्ये झालेल्या भूसंपादन जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी महसूल विभागातील तलाठी, अभिलेख अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी संयुक्तपणे सर्व्हे करून पुढील ४५ दिवसात सोलापूर रेल्वे विभागाला अहवाल सादर करणार आहेत.

ब्रिटिश काळात आखणी झालेल्या या मार्गावर रेल्वेने ब्रॉडगेज लाइन मंजूर केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या संपूर्ण जागेची मागणी रेल्वेने केली आहे

Beed: बीडच्या वडवणी शहरातील पतंगे ट्रेडर्सला शॉर्टसर्किटने आग लागून लाखोंचे नुकसान

वडवणी शहरातील पतंगे ट्रेडर्स या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळत आहे.

या ठिकाणी अग्निशामक दल पाचरण करण्यात आले.

ही आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे.

मात्र यामध्ये या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची माहिती समोर आली आहे.

या आगीमध्ये व्यवसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Nanded: गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग, मशिनच्या सहाय्याने गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल

जिल्ह्यात गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे.

त्यासाठी हार्वेस्टर मशिनला प्राधान्य दिले जात आहे.

एकीकडे हरभरा काढणी सुरु आहे. तर दुसरीकडे हार्वेस्टर मशिनने कमी वेळात गहू काढणी होत आहे.

अर्ध्या तासात एक एकर गहू काढला जात असल्याने हार्वेस्टर मशिनला मागणी वाढली आहे.

पुष्पा स्टाईलने दारूची छुपी चोरी, जव्हारमध्ये बनावटी दारूचा साठा पकडला

जव्हार तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केंद्रशासित प्रदेश दमण - सेलवास येथून पुष्पा स्टाईलने टेम्पोत कप्पे करून लपवुन ठेवलेला दारू साठा स्थानिक गुन्हे शाखा पालघर व जव्हार पोलिस यांची संयुक्त कारवाई करत जप्त करण्यात आला.

यात दमण बनावटीची अवैध दारूची तस्करी करण्यात आली. दरम्यान यात ९ लाख ७० हजाराची दारू व १० लाखाचे आयशर टेम्पो मिळून १९ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई जव्हारच्या शिवनेरी ढाबा येथे बुधवारी दुपारी करण्यात आली.

होळी सणा निम्मित्त सदरचा साठा नाशिक येथे नेला जात होता, केंद्रशासित प्रदेशात मद्यावरील कर ईतर राज्यांपेक्षा 50% पेक्षा कमी असल्याने सेलवास वरून सिमावर्ति डहाणू तलासरी जव्हार मोखाड्या तालुक्यातील आड रस्त्याने दादरा नगर हवेली सेलवास च्या दारूची अवैधरित्या मोठ्या प्रमाणात चोरटी वाहातुक होत असते.

प्रशांत कोरटकर यांचा मोबाईल आणि सिम कार्ड जुना राजवाडा पोलिसांकडे सुपूर्द

नागपूर सायबर पोलिसांनी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिला मोबाईल आणि सिम कार्ड

जुना राजवाडा पोलिसांनी मोबाईल व सिम कार्डचा इन कॅमेरा पंचनामा करून केला जप्त

आवाजाच्या तपासणीसाठी मोबाईल सिम कार्ड फॉरेन्सिक ब्लॅक कडे देण्यात येणार

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील आगळगावात कडकडीत बंद

संतोष देशमुख हत्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील आगळगाव मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून यामध्ये सर्व व्यापाऱ्यानी आपली दुकाने सकाळपासून बंद ठेवून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे.

याप्रकरणी आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा येत्या काळात आगळगावकर आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा ही देण्यात आला आहे.

Sambhaji Raje : संभाजीराजे छत्रपती आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

श्री तुळजाभवानी मंदिरातील कामाची करणार पाहणी

श्री तुळजाभवानीचे मुख्य शिखर आणि गाभारा पुनर्बांधणीच्या पार्श्वभूमीवर पाहणी

मंदिरातील कामाची पाहणी करून छत्रपती संभाजी महाराज देणार पुरातत्व विभागाला सूचना

तुळजाभवानीचा मुख्य गाभारा आणि शिखराच्या पुनर्बांधणी संदर्भात तुळजापूर येथील पुजाऱ्यांनी घेतली होती छत्रपती संभाजी महाराजांची भेट

Shirur: शिरूर तालुक्यातील व्यक्तीला अमानुष मारहाण प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सतीश भोसलेंच्या विरोधात गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम बॅटच्या साह्याने मारहाण करण्यात आली

याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाला यानंतर संतापाची लाट पाहायला मिळाली

मारहाण करणारा व्यक्ती भाजपाचा पदाधिकारी सतीश भोसले असून त्याच्यावरती आता पोलीस ठाण्यामध्ये 324 323 506 34 प्रमाणे स्वतः पोलीस फिर्यादी होऊन सुमोटो नुसार फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा अकराच्या दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सतीश भोसले चा शिरूर पोलीस शोध घेत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बस स्थानकासमोर निदर्शने

महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एसटी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

या निदर्शनात एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, महागाई भत्ता, भाडेवाढी, बदल्या, आणि आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन केले. 

एसटी कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता अंमलबजावणी करण्यात यावी,  जाहीर केलेली पगारवाढ एप्रिल २०२० पासून लागू करण्याचे आश्वासन देऊनही ती लागू करण्यात आली नाही.

खात्यांतर्गत प्रथम बदली अर्जानुसार बदल्या कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतरही कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कर्नाटकातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या 'चंद्रादेवी'ची यात्रा संपन्न

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या 'चंद्रादेवी'ची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

अक्कलकोट तालुक्यातील किरनाळी गावातील ही यात्रा पाहण्यासाठी देशाभरातून लाखो भाविक सहभागी होतात.

सलग दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत भाविक मनोभावे दाखल झाल्याचं चित्र दिसून येत आहे

Maharashtra Politics: दत्तात्रय गाडेच्या मोबाईल शोध घेण्यासाठी पोलीस पुन्हा शेतात जाणार

पुणे, स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मोबाईल अद्याप मिळालेला नाही. मोबाईलबाबत विचारल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे नराधम दत्तात्रय गाडेच्या मोबाईल शोध घेण्यासाठी पोलीस पुन्हा शेतात जाणार आहेत.

तो लपलेल्या प्रत्येक ठिकाणी पोलीस मोबाईलचा शोध घेतील. मोबाइलमध्ये आणखी काही महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात, अशी खात्री पोलिसांना आहे.

त्यामुळे मोबाईलचा शोध घेणे महत्वाचे आहे.

बसची देखील फॉरेन्सिक चाचणी झाली आहे. पण आरोपीचा मोबाइल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

प्राथमिक तपासात फोन गाडेने गुनाट गावातील शेतात फेकला आहे, असे सांगत आहे. त्यामुळे आता गुन्हे शाखेचे पथक त्या परिसरात जाऊन मोबाइलचा शोध घेणार आहे.

Kolhapur : मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा; इंडिया आघाडीच्या नेत्यांची पोलिसांकडून सुरू धरपकड

कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या नेत्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी निदर्शने करण्यात येत असल्यानं नेत्यांची धरपकड करण्यात येत आहे.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व पक्षीय धरणे आंदोलने

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुलढाण्यात सर्व पक्षीय धरणे आंदोलने करण्यात आली,

यावेळी वालमिक कराड सह सर्व आरोपीना फाशी देण्याची मागणी करण्यात आली तसेच धनंजय मुंढे या प्रकरणाशी संबधा विषयी सी आय डी ने सखोल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली...

याप्रसंगी वालमिक कराड विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली..

या धरणे आंदोलनात शिंदे गटाच्या शिवसेनेने सहभाग घेतला नसल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे...

Dhule Temperature: धुळ्यात 7.5° सेल्सिअस तापमानाची नोंद

धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड उतार चढ बघावयास मिळत आहे,

आज धुळ्यात 7.5° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे,

एकीकडे तापमानाचा पारा राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असताना धुळ्यात मात्र आज धुळेकरांना थंडीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे,

गेल्या काही दिवसांपासून दुपारी तापमानाचा पारा हा 35° पेक्षा जास्त गेल्याचे दिसून आले असून,

धुळेकरांना दुपारच्या वेळी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत, तर दुसरीकडे मात्र आज रात्रीच्या वेळी धुळेकरांना गारठ्याचा देखील सामना करावा लागला आहे.

Dharashiv: शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे

धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत काल पोषणतत्व असलेल्या चॉकलेटचे वाटप

विद्यार्थ्यांना दिलेले चॉकलेट मध्ये आळ्या, किडे आढळल्याची पालकाची तक्रार,चॉकलेटचा व्हिडिओही केला चित्रीत

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जातात ज्वारी, बाजरी पासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार (चॉकलेट )

जिल्हा परिषद शाळांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सदरील मिलेट न्यूट्रेटिव्ह बारचा पुरवठा

आळ्या, किडे निघाल्याची पालकांची तक्रार आल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक कडून चॉकलेट वाटप बंद, वरिष्ठांना अहवाल पाठवणार

Pune: स्वारगेट बलात्कार प्रकरणात विशेष वकीलाची नियुक्ती होणार

पुणे पोलिस विशेष वकील नेमण्यासाठी राज्य सरकारला पाठवणार प्रस्ताव ..

दोन दिवसांत पाठवणार प्रस्ताव ..

सुनावणीच्या वेळी विशेष सरकारी वकील मांडणार पीडीतेची बाजू ..

पोलिस सूत्रांची माहिती

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण; मोकारपंती Whatsapp ग्रुपवर छळाचे लाइव्ह व्हिडीओ दाखवले

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.

संतोष देशमुखांच्या छळावेळी आरोपींनी व्हिडीओ कॉल केले होते.

छळाचे लाइव्ह व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याची धक्कादायक माहिती तसापात समोर आली आहे.

या व्हिडीओ कॉलचे सर्व डिटेल्स पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Beed: परळी, राख मोफत देण्याच्या मागणीसाठी वीट उद्योग व लेबर संघटनेचे अमर उपोषण

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पडणारी राख मोफत देण्याच्या मागणीसाठी वीट उद्योजक व लेबर संघटना परळी वैजनाथ यांचे परळी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.

परळी औष्णिक विद्युत केंद्रातून पडणारी राख बंद केली असल्यामुळे अनेक वीटभट्टी चालकांवर व कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.

राख बंद असल्यामुळे साठवून ठेवलेली राख मनमानी भावाने विकली जात असल्यामुळे वीट भट्टी चालकांवर व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राख मोफत देण्याच्या मागणीसाठी शेकडो वीट भट्टी चालक व लेबर आमरण उपोषणाला बसले आहेत.

Pune News: शिक्षण विभागाच्या कार्यालयांमध्ये सुटीच्या दिवशी स्वच्छता मोहीम

राज्यातील शिक्षण विभागाच्या अखत्यारितील कार्यालयांमध्ये शनिवारी (८ मार्च) विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचा आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिला आहे.

मात्र, ही मोहीम सुटीच्या दिवशी राबवावी लागणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.

१०० दिवसांच्या सातकलमी कृती आराखड्यानुसार सर्व क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे.

शिक्षण उपसंचालकांनी कार्यालयांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करावा. प्राथमिक शिक्षण संचालक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी त्यांच्या स्तरावर सूचना देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

Solapur: सोलापुरात विना परवाना माती नेणाऱ्या 11 वाहनावर कारवाई, 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या धुबधुबी तलावातून विनापरवाना माती उत्खनन करून घेऊन जाणारे 11 हायवा टीपरवर महसूल प्रशासनाने कारवाई केलीय.

तहसीलदार किरण जमदाडे यांच्या पथकाने कारवाई करत सहा वाहने वळसंग पोलिसांच्या ताब्यात दिले.तर पळून गेलेल्या पाच वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत 11 मोबाइल आणि सहा वाहनांसह तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिरवळ येथील धुबधुबी तलावातून विनापरवाना माती उत्खनन होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.

माहितीच्या आधारे कारवाई करण्यास गेलेल्या पथकला मातीने भरलेली ही अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याचे दिसले.

अपघाताला निमंत्रण देणारी आणि विनापरवाना मुरूम,माती उत्खनन करणारी ही वाहने दिवसाढवळ्या धावत होती.

यावेळी महसूल पथकाने सर्व वाहनांना थांबवले.त्यावेळी सहा वाहने वळसंग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.तर इतर पाच वाहने पळून गेली. या सर्व वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदीजणांसाठी गळाभेट,  आप्तस्वकीयांचे भेटीने गहिवरले बंदीजन

अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदयासाठी गळाभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कारागृहात अनेक बंदी शिक्षा भोगत असून त्यांची मुले आईवडिलांच्या प्रेमापासून त्यांचे स्पर्शापासून वंचित राहतात.

कारागृहात संपर्कासाठी ॲलन फोन, ई-मुलाखत, प्रत्यक्ष मुलाखत, व्हीसी, पत्रव्यवहार, इत्यादी विविध साधने उपलब्ध असून त्याव्दारे बंदयांना त्यांचे मुलांशी संवाद साधता येतो व त्यांचे वाढीचे वयामध्ये त्यांना दुरुन सहभागी होता येते..

भेटी दरम्यान अनेक बंदी व त्यांचे मुलांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी बंदयांनी कारागृह उपहारगृहामधून स्वत:चे वेतनामधून खरेदी केलेला बिस्कीट, चॉकलेट इत्यादी खाऊ सोबत आणून अत्यंत प्रेमाने मुलांना खाऊ भरविला.

तसेच कारागृह प्रशासनाकडून खिचडी व केळी असा अल्पोपहार मुलांना देण्यात आला.

Amaravati: अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात

एप्रिल महिन्यात विमानतळ सुरू होण्याची शक्यता..

पी ए पी आय चे हवाई सेलिब्रेशन यशस्वीपणे पूर्ण..

अमरावती विमानतळावरून विमान टेकऑफ करण्याचा मार्ग मोकळा..

हवाई कॅलिब्रेशनच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला..

अमरावती मुंबई मार्गावर ईटीआर 72 सहनियोजित ऑपरेशन लवकरच सुरू होणार..

धाराशिवच्या ढोकीत बर्ड प्लूचा संसर्ग वाढला, फैलाव रोखण्यासाठी ५ पथकांची नियुक्ती

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असुन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी तातडीने प्रतिबंधात्मक समीतीचे गठण केले असुन ढोकीच्या एक किलोमीटर परिसरातील चिकन सेंटरवरील कोंबड्या व पाळीव कोंबड्या प्रशासनाने नष्ट करण्यास सुरुवात केली आहे तर बर्ड फ्लू च्या पाश्र्वभूमीवर ढोकी येथील मांस विक्रीच्या दुकानावर निर्बंध वाढवले असुन ढोकी परिसरातील एक किलोमीटर परिसरात मांस विक्रीवर तीन महीन्यापर्यंत बंदी असणार आहे. नागरीकांनी आपल्याकडील कोंबड्या लपवुन ठेवु नये किंवा नातेवाईकांकडे देवु नये कोंबड्या नष्ट करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केले आहे.

Amravati: अमरावतीत १६ एकर जागेत साकारणार आयटी पार्क

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विकसित करण्याचे प्रयत्न...

आयटी पार्कसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण करण्यासाठी हालचाली सुरू..

अमरावती औद्योगिक वसाहतीतील जागेच्या पर्यायावर प्रशासनाकडून विचार सुरू...

खासदार डॉ.अनिल बोंडेनी घेतली उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक...

पुणे, मुंबई, बंगलोरला जाणाऱ्या तरुणाना स्थानिक स्तरावर रोजगार देण्यासाठी प्रयत्न...

आर्टिफिशल इंटेलिजन्स, आयटी पार्क अमरावतीच्या विकासात मोलाची भर घालणार..

डोंबिवलीत MIDC मध्ये नेहमी पेक्षा जास्त कामधे सांगणाऱ्या महिलेला कंपनीच्या मॅनेजर कडून मारहाण

एम आय डी सी मधील एम्ब्रोडरीज कंपनीत धक्कादायक प्रकार

ज्योती खैर असे जखमी महिलेचे नाव महिलेवर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू

भाजपा महिला पदाधिकाऱ्यांने कंपनी मॅनेजर ला विचारला जाब

मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

रहदारीला अडथळा ठरणाऱ्या देहूरोड मेन बाजारातील व्यावसायिकावर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून कारवाई

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून महात्मा फुले मंडई तसेच मेन बाजार येथील तीस छोट्या व्यवसाईंका वर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.

रहदारीसाठी अडथळा ठरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या दुकानासमोरील पत्र्याचे शेड कारवाईमध्ये पाडण्यात आले.

यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जवळपास पंधरा अधिकारी कर्मचाऱ्यासह सैन्य दलाची QRT टीम देखील यावेळी कारवाईत सहभागी झाली होती...

दरम्यान बोर्ड कर्मचाऱ्यांकडून मर्जीतल्या व्यापाऱ्यावर कारवाई न करता केवळ ठराविक व्यापाऱ्या वरतीच अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली असल्याने काही व्यापाऱ्यांचे म्हणणे होते त्यामुळे व्यापारी या कारवाई विरोधात आक्रमक झाले होते.

ही कारवाई एकतर्फी नसून वाहतुकीला तसेच रहदारीला अडथळा ठरणाऱ्या व्यवसायिकावर कारवाई करण्यात येत असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले

Lonavala: लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली कचरा डेपोला भीषण आग

लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोला भीषण आग लागली.

आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या गाड्या शर्थीचे प्रयत्न करत होते.

मात्र, केवळ एकच अग्निशमन गाडी उपलब्ध असल्याने आग विझवण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे.

ही एकच गाडी पाणी फवारून परत नांगरगाव पंप स्टेशनवर जाऊन टँकर भरून पुन्हा आग विझवण्याचे काम करत होती.

दरम्यान, वाऱ्यामुळे आगीने अधिक भडकण्याचा धोका वाढला होता.दोन तासाच्या प्रयत्न नंतर ही आग आटोक्यात आली.

सुरुवातीला एका लहान भागापुरती मर्यादित असलेली आग केवळ एका तासात 100 ते 150 मीटर परिसरात पसरली. यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.

नवी मुंबईतील 6 हजार अनधिकृत बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार

2015 नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतीवर नवी मुंबई मनपा करणार कारवाई.

उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे मिळालेल्या निर्देशानुसार तसेच राज्य सरकारच्या निर्देशनुसार होणार कारवाई.

नवी मुंबईत 2015 नंतर साधारण 6 हजार अनधिकृत बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती.

बांधकाम पूर्ण झालेल्या तसेच नव्याने सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई.

अनधिकृत बांधकामांवर होणार तोडक कारवाई.

80 पोलीस कर्मचारी तोडक कारवाईसाठी राखीव ठेवण्यात आले असून गरजेनुसार पोलिसांची संख्या वाढविण्यात येणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT