Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: सिंधुदुर्गमध्ये मासेमारीला पुन्हा सुरुवात, खवय्यांची गर्दी

Priya More

Sindhudurg News: सिंधुदुर्गमध्ये मासेमारीला पुन्हा सुरुवात, खवय्यांची गर्दी 

गेले तीन ते चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस व वादळ सदृश्य स्थिती असल्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात आली होती मात्र काल पासुन पुन्हा मासेमारीला सुरूवात झाली आहे. आज मालवण मध्ये मोठ्याप्रमाणात मासे लिलावासाठी आल्यामुळे मस्य खवय्यानी एकच गर्दी केली होती. मालवण बीच वर सकाळी सात वाजल्यापासून मासे लिलावाला सुरूवात झाल्यानंतर मासे खरेदीसाठी स्थानिकांसोबतच पर्यटकही मासे लिलाव बघण्यासाठी दाखल झाले होते. आजच्या मासे लिलावात सुरमई, बांगडा, माकूल, लेपे, कोळंबी, व हलवा मोठ्याप्रमाणात आला होता. त्यामुळे खवय्यांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

मंत्री छगन भुजबळ हे आज थेट हॉस्पिटल मधून नाशिकला जाणार

विधानसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्ट घड्याळ चिन्हबाबत निर्णय देणार ?

अजित पवार यांना घड्याळ ऐवजी दुसर चिन्ह देण्याची शरद पवार यांच्या पक्षाची मागणी

सुप्रीम कोर्टात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने करण्यात आली होती मागणी

१ ऑक्टोबरला याचिकेवर होणार सुनावणी

सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची बांधणी करणार

  • विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची बांधणी करणार

  • राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता भाजपचा ओबीसी मतांवर डोळा

  • ओबीसीतील प्रत्येक घटकापर्यत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न

  • पुढचा महिनाभर राज्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचणार

  • ओबीसी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव यांचे आदेश

खडसेंची आणि माझी नार्कोटेस करा. खरं ते समोर येईल. नेहमी भाषणात माझा विषय असतो. सारखं सीडी आहे, डिलीट झाली. माझा भाजपात प्रवेश झाला पण फोटो मिळत नाही.
गिरीश महाजन

Latur News : महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथे महावितरण च्या कनिष्ठ अभियंत्याला कार्यालयात मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे... कनिष्ठ अभियंता अमोल सूर्यवंशी हे आपल्या कार्यालयात काम करत होते , दरम्यान यावेळी कृष्णा जाधव या युवकाने.. शेतात लाईटचे पोल झुकला आहे.. त्याची काम कधी करणार. यावर जाब विचारत मारहाण केली आहे... तर या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या युवका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे..

Sangli News : संजयकाका पाटलांची,रोहित पाटलांवर टीका  

भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटलांवर जोरदार टीका केली आहे कवठेमंकाळ मधल्या राड्याप्रकरणी रोहित पाटलांकडून घाणेरड्या पद्धतीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोप करत, राजकीय हेतूने रोहित पाटलांनी पोलिसांच्यावर दबाव आणून आपल्यावर गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप देखील संजयकाका पाटलांनी करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.कवठेमहांकाळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष यांना संजयकाका पाटलांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्या समोर आंदोलन केलं होतं,त्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, यावर संजयकाका पाटलांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

Kolhapur News: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्स्प्रेसचा आज शुभारंभ, ८०० लाभार्थी अयोध्येला रवाना

कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्स्प्रेसचा शुभारंभ.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या 800 लाभार्थी होणार अयोध्येला रवाना.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्स्प्रेसचा शुभारंभ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते संपन्न

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर फक्त ७४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत,  प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

- दररोज लाखो प्रवासी प्रवास करणार्या पुणे रेल्वे स्थानकावर केवळ ७४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत.

- अवाढव्य पुणे स्थानकावर फक्त एकूण १२० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

- ⁠यापैकी ७४ कॅमेरे सध्या पुणे रेल्वे स्थानकात कार्यरत.

- ⁠प्रवासी आणि रेल्वे स्थानकाचा आकार यातुलनेत सीसीटीव्हीची संख्या अपुरी.

- ⁠त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. ⁠

Mumbai News: आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार?: प्रवीण दरेकर

‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं सामना अग्रलेखाला चोख प्रत्युत्तर

आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार?

देवेंद्र फडणवीस आधुनिक अभिमन्यू, तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं‘नी त्यांना घेरलं तरी ते ‘चक्रव्यूह‘ भेदण्यासाठी सक्षम

‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल?

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचा संजय राऊत यांना सवाल

Tirupati Prasad: तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी.

न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी.

सुब्रमण्यम स्वामी आणि इतर काही याचिकाकर्त्यांनी दाखल केल्या होत्या याचिका.

लाडू प्रसादामधे प्राण्यांच्या चरबीच्या भेसळीच्या आरोपाचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली SIT स्थापन करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली.

Mumbai News: नायर रुग्णालयाच्या निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखीन १० तक्रारी

नायर रुग्णालयाच्या निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखीन १० तक्रारी.

आणखीन १० विद्यार्थीनी केल्या तक्रारी.

विनयभंगाच्या आरोपानंतर सहाय्यक प्राध्यापकाला करण्यात आल होत निलंबित.

चौकशी समितीसमोर करण्यात आल्या तक्रारी.

प्रकरणाची चौकशी मुंबई महानगरपालिकेकडून सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपविण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitanshi Goel: 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीची कमाई ऐकून उडतील होश!

World Heart Day: पुरुष-महिला यांच्यात हार्ट अटॅकची वेगळी लक्षणं दिसून येतात? पुरुषांमध्ये दिसतात ही लक्षणं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींमुळे सरकारी भावांचे वांदे होणार, राज ठाकरेंचं मोठं भाकित; जानेवारीत काय घडणार?

Shivali Parab: नुसता धुराळा! 'कल्याणच्या चुलबुली' चा अनोखा अंदाज

Shraddha Kapoor: 'स्त्री 2 ' फेम श्रद्धा कपूरचा एथनिक जलवा

SCROLL FOR NEXT