राज्यात मुख्यमंत्रीपद कोणाला याची चर्चा सुरू असतानाच मंत्रीपदा साठी सुद्धा मोठी मोर्चे बांधणी सुरू आहे. पुण्यातील अनेक आमदार मुंबई तळ ठोकून बसले आहेत.मंत्रीपद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली असतानाच पुण्यातील पर्वती विधानसभेच्या आ.माधुरी मिसाळ यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत त्यामुळे मंत्री पदाची चुरस आणखी वाढलीय.कार्यकर्त्यांकडून मंत्री होण्यापूर्वीच अपाला नेता मंत्री होणारंय या अपेक्षेने बॅनर लावण्यात आलेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थाना बाहेरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या कारचा ताफा गेल्यामुळे सर्वांची धावपळ उडाली.
शिवसेनेचे चाणक्य सक्रीय झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
मात्र मिलिंद नार्वेकर एस्सार ग्रूपचे अध्यक्ष शशिंकात रुईया यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी आले असल्याची माहीती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी
शरद पवार यांच्या पक्षाकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
अजित पवार यांनी घड्याळ चिन्ह वापरून मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला - शरद पवार पक्ष
घड्याळ चिन्हासोबत जोडल्या गेलेल्या भावना आणि त्याबाबतचा लाभ घेण्याचाही प्रयत्न केला - शरद पवार पक्ष
याबाबतचे पुरावे म्हणून काही कागदपत्र दाखल करण्याची आम्हाला परवानगी द्या
शरद पवार यांच्या पक्षाची कोर्टाकडे मागणी
- नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पवनसुत नगर मध्ये काल दुपारी आढळली चिमुकली
- चिमुकली तीन महिन्याची असल्याचा अंदाज, तिच्या अंगावर काही जखमा तर चिखल लागलेल्या अवस्थेत आढळली
- कचरा वेचणाऱ्या महिलेला चिमुकली रडत असल्याचा आवाज आल्यावर उघडकीस आली घटना
- चिमुकली वर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून पोलीस चिमुकलीच्या पालकांचा शोध घेत आहे
- अनैतिक संबंधातून किंवा पारिवारिक वादातून मुलीला सोडल्याचा अंदाज
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना दिला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा वर्षा निवासस्थानी येण्याची शक्यता
एकनाथ शिंदे आज मुख्यंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यासाठी ते राजभवानाकडे निघाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनावर पोहचले आहेत.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल
उपमुख्यमंत्री पदाचा देणार राजीनामा
राज्यपालांकडे सोपवणार राजीनामा
जुनी विधानसभा आज बरखास्त होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता...
तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत एकनाथ शिंदे राहणार काळजी वाहू मुख्यमंत्री...
जुनी विधानसभा बरखास्त होत असून तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देणे अपेक्षित...
तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता...
कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने इन ॲक्शन मोड
कचरामुक्त कसबा करण्यासाठी अधिकाऱ्यांना सोबत घेत पाहणी
भल्या पहाटे संपूर्ण मतदारसंघात फिरून ऑन द स्पॉट केली पाहणी
कचरामुक्त कसबा करण्यासाठी पुढील १५ दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
भाजपच्या मोर्चा आणि प्रकोष्ठ प्रमुखांची आज प्रदेश कार्यालयात बैठक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार आढावा
महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चासह उद्योग आघाडी प्रकोष्टचे संयोजक उपस्थित राहणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू
दुपारी १२ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात बैठकीचं आयोजन
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभेतील उमेदवारांना एक महिन्याच्या आत द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा हिशोब
303 उमेदवारांना निवडणूक खर्चाचा अंतिम तपशील 23 डिसेंबर पर्यंत द्यावा लागणार
संबंधित खर्चाची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे निवडणूक खर्च निरीक्षकांकडून पाठवला जाणार.
पुणे शहर जिल्हा आणि पिंपरी चिंचवड मधील 303 उमेदवारांनी निवडणूक लढवली.
यामध्ये आता या उमेदवारांना एका महिन्याच्या आत खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे.
पुणे जिल्ह्यात 259 उमेदवाराची डीपॉझिट जप्त
पुणे जिल्ह्याच्या 21 मतदारसंघात 303 उमेदवार रिंगणात होते.त्यापैकी 259 उमेदवाराना स्वतः चे डीपॉझिट वाचवण्याकरता मते मिळू शकले नाहीत.
कोथरूड,कसबा,खडकवासला,हडपसर येथील मनसेच्या चारही उमेदवारांना डीपॉझिट वाचवणे अशक्य झाले.
जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या इंदापूर मधील अपक्ष उमेदवार प्रवीण माने याचेही डीपॉझिट जप्त
पुण्यातील कसबा,शिवाजीनगर आणि पर्वती मतदारसंघातील तीनही बंडखोर उमेदवारांचे डीपॉझिट जप्त झाले आहे.
जिल्ह्यात ४४ जणांना डीपॉझिट वाचवता आले.बाकी २५९ उमेदवारांचे डीपॉझिट जप्त झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.