Siddhi Hande
फ्रेंच फ्राइज हा पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात.
फ्रेंज फ्राइज बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाट्याची साल काढून घ्या.
बटाटे फ्रेंज फ्राइजच्या शेपमध्ये कापून घ्या.त्यानंतर हे काप थोडा वेळ पाण्यात ठेवा.
यानंतर एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात थोडं मीठ टाका.
या पाण्यात बटाट्याचे काप सोडा.
उकळी आलेल्या पाण्यात हे बटाट्याचे काप जास्त वेळदेखील शिजवून देऊ नका.
बटाट्याचे काप पाण्यातून काढून घेऊन त्याला हलक्या हाताने पुसून घ्या.
त्यानंतर एका कढईत तेल गरम करा. त्यात हे फ्राइज तळून घ्या.