ठाण्यातील घोडबंदर रोड वरील मानपाडा येथील नाल्यात 5 गाईचे पिल्ल मृतावस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सदरचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पशुवैद्यकीय विभागाचा ताब्यात देण्यात आले आहेत.प्रकरणाचा पुढील तपास चीतळसर पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज आपार्टमेन्ट मध्ये आढळले दोन मृतदेह.
दोघांची हत्या झाल्याचा संशय.
घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळला.
मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण
पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा घरातील एलपिजी गॅस लिक असल्याचे आढळले.
दोन्ही मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठविण्यात आले असून हत्या की आत्महत्या याचा शोध पोलीस घेतायत.
पोलिसांकडून सोसायटीचे सीसीटीव्ही चेक करण्यास सुरवात.
कल्याणमधील लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी विशाळ गवळीला पोलिसांचे पथक शेवाग येथे घेऊन गेले होते. आज रात्री त्याला कल्याणला आणले जाणार आहे. मागच्या लैगिंक अत्याचार प्रकरणामध्ये विशालला जामीन कसा मिळाला याची चौकशी केली जाणार आहे. शिवाय दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे.
आज भीमा कोरेगाव येथे २०७ वा शौर्य दिवस साजरा करण्यात आला. या शौर्य दिवसाची आठवण म्हणून बुलढाण्यात आंबेडकर अनुयायानी विजयस्तंभाची प्रतिकृती तयार करत त्या स्तंभाची भव्य मिरवणूक काढली. या मिरवणूकीला असंख्य तरुण युवक सामील झाले.
सांगलीच्या विटा येथे एका फटाक्याच्या गोदामाला आग लागल्याचा प्रकार घडला. यशवंत नगरतील कार्तिक कंपनीच्या गोदामाला आग लागली. गोदामातील लाखो रुपयांचे फटाके आगीत जळून खाक झाले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत तिघे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. संशयित आरोपी वाल्मीक कराडच्या अटकेनंतर तपासाला गती मिळाली आहे. फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. आता सरकारकडून या प्रकरणी एस आय टी स्थापन केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्षली भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलिसांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली पोलीस मुख्यालयात उपस्थित राहणार आहे. गडचिरोलीच्या पेनगुंडा गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी जहाल नक्षलवादी आत्मसमर्पण केले.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात निराधार योजनेचे पैसे न मिळाल्याने वयोवृद्ध, विधवा, अपंग निराधारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. लाभार्थ्यांनी ठाकरे गटाचे नेते प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयात धडक मारली. तसेच अधिकाऱ्यांना सात दिवसांत पगार न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.
नागपूर: नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात तैनात पोलिसांनी दोघांकडून तब्बल ४१ लाख रुपयांची अवैध रोकड जप्त केली. हे तरुण मध्यरात्री शिवाजी पुतळा परिसरात मोपेड स्कूटरवरुन जात होते. पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यांच्या वाहनाची तपासणी केल्यावर त्यात ४१ लाख ६७ हजार ३०० रुपयांची रोकड आढळली. रक्कमेसंदर्भात कागदपत्र सादर न केल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात ही रोकड हवालाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मागील अनेक महिन्यांपासून बदलापूर शहरात विजेचा लपंडाव सुरु आहे. शहरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. महावितरणच्या कारभाराला बदलापूरकर वैतागले आहेत. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी शहरात लाखो रुपये खर्च करुन भूमिगत वाहिन्या टाकण्यात आल्या. असे असूनही परिस्थितीमध्ये सुधारणा होत नसल्याने रस्त्यावर उतरण्याचा इशारा बदलापूरकरांनी दिला आहे.
बुलढाण्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. संभाजी ब्रिगेडने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पाठिंबा दिला आहे. कर्जमाफीसह विविध मागण्या मान्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा भाकर खाऊन आंदोलन केले. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अतिदुर्गम पेनगुंडा पोलीस मदत केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात नागरिकांना संबोधित केले. तसेच आदिवासी नागरिकांना विविध साहित्याचे वाटपही केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग व ताडगुडा पुलाचे लोकार्पण तसेच वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या भेटी दरम्यान त्यांनी दुर्गम भागात कार्यरत पोलीस जवानांसोबत चर्चा करून त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
आंदोलन मिळणार नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरू देणार नाही.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा.
अँकर:- मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन म्हणून तरंगे पाटील आरक्षणाच्या लढाईसाठी एल्गार पुकारला आहे 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार आहेत मला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजाने यावं असं आवाहन नांदेडच्या लोहा येथे केलं. नांदेडच्या लोहा येथे मराठा आरक्षण संवाद बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत मनोज रंगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केला आहे. आपल्याकडे जे वाहन मिळेल त्या वाहनाने 25 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथे येण्याचे त्यांनी आवाहन केलं आहे. पूर्वी ते सरकार होतं आता पण तेच सरकार आहे. पूर्वी टोलवाटोल इथे खेळत होते. आता मात्र मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना कोणीही आरक्षण देण्यासाठी अडथळा आणणार नाही. तर 25 जानेवारीला मराठा आरक्षणाचा प्रश्न ते मार्गी लावतील. जर त्यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी द्वेष असेल तर ते मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढणार नाहीत. त्यांना राज्यात सुद्धा फिरू देणार नाही. आपल्या जातीच्या लेकरासाठी एक दिवस काम सोडून 25 जानेवारीला अंतरवाली सराटी येथे यावं.असे आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोणावळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरात भक्तांची गर्दी पहायला मिळत आहे. आगरी, कोळी समाजाची श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र भरातून भक्तांची मांदियाळी पहायला मिळत आहे. कार्ला येथे मोठी गर्दी झाल्याने कार्ला कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. दोन्ही लेनवर गाड्यांची संख्या मोठी असल्याने वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस कार्ला येथील वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत असून लवकरच वाहतूक कोंडी सुटेल अस पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
मनमाड शहरात बहुजन पार्टी तर्फे कोरेगाव विजय दिन साजरा करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती,यावेळी शहरातील समस्त अंबेडकर अनुयायांनी भिमा कोरेगाव युद्धातील शूरविर सैनिकांना अभिवादन करत मानवंदना दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकून त्याची कमी किंमतीत पोर्टर अँपच्या माध्यमातून तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केलाय. यामध्ये पोर्टर अँपच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये उच्चप्रतीच्या स्कॉच व्हिस्कीच्या 19 बॉटल मिळून आल्या. तर हे मद्य कोपरखैरणे येथील एका घरातून आणले असल्याची माहिती मिळताच त्याघरावर देखील उत्पादन शुल्क विभागातर्फे छापा टाकण्यात आला. याठिकाणी विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकून त्याला सील करण्याचे कामं सुरु होते. येथून उच्च प्रतीच्या विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बूच आणि लेबल असे साहित्य जप्त करण्यात आले असून या कारवाईत तब्बल 7 लाख 52 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी 2 आरोपीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टोळीचा मुख्य सूत्रधार कोण याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.
उत्तर भारतीय संघ भवनाचे स्वप्न साकार करणारे, आधुनिक उत्तर भारतीय संघाचे निर्माते, माजी भाजप आमदार आणि उत्तर भारतीय संघाचे माजी अध्यक्ष बाबू आर.एन. सिंह यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईच्या बांद्रा पूर्व येथील उत्तर भारतीय संघ भवनात संपन्न झाला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन तासापासून सुरू असलेलं मस्साजोगच्या ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन मागं घेण्यात आले आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करू असं आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कावात यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आपला आंदोलन मागं घेतलं. दरम्यान दहा दिवसात आरोपींना अटक करा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा आंदोलकांनी पोलिसांना दिला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सकाळपासून गावाजवळील तलावात जलसमाधी आंदोलन करायला सुरुवात केली होती. या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होत्या.
पोलीस उपनिरीक्षक गिरनार हे पूर्वी वाकड पोलीस स्टेशनला होते. तेथून त्यांची बदली महाळुंगे पोलीस स्टेशनला झाली. रात्रपाळी करून घरी परत निघालेल्या गिरनार यांच्या कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
चक्कर आलेली महिला तासाभरापासून करत होती पाण्यात उभारून आंदोलन.
प्रभावती भिमराव सोळंके असं चक्कर आलेल्या महिलेचे नाव.
महिलेला उपचारासाठी नेण्यात आलं रुग्णालयात.
आंदोलकांनी काढले महिलेला पाण्याबाहेर. पोलीस व महसूल प्रशासनाची बघायची भूमिका.
सरपंच संतोष देशमुख यांच्या उर्वरित मारेकर्यांना अटक करा या मागणीसाठी मस्सा जो ग्रामस्थांचं सुरू आहे दीड तासापासून जलसमाधी आंदोलन
- वरिष्ठ सी आयडीचे अधिकारी करत आहेत चौकशी.
- खंडणी प्रकरणातील फरार असलेला आरोपी संदर्भात सीआयडी कडून विचारणा..
- आज दिवसभर सीआयडी कडून होणार चौकशी. कोण कोणते विषय उलगडणार हे पाहणं महत्त्वाचं..
आंदोलकांना पाण्याच्या बाहेर निघण्याची केली जात आहे विनंती
मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम..
कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभावर आज २०७ वा शौर्यदिन साजरा होतोय या निमित्ताने लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगाव भिमात दाखल होत असुन चोरीच्या घटना टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे नगर मार्गासह विजयस्तंभ परिसरात सीसीटिव्ही कँमेराच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जातेय चोरी,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस अलर्टमोडवर आहे
बीड: सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी
फरार तिन्ही आरोपीच्या नातेवकांची सीआयडी च्या अधिकाऱ्यांन कडून कसून चवकाशी झाल्याची सूत्रांची माहिती
नातेवाईकांच्या संपर्कात हे तिन्ही आरोपी आहेत का याचा ही तपास सीआयडी कडून होत असल्याची माहिती
सीआयडी कडून तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आज मस्साजोग ग्रामस्थांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.
सुदर्शन घुले हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी
खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपीच्या CID मुसक्या आवळणार
सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत.
वाल्मीक कराडच्या नंतर तपास यंत्रणांचा फोकस तीन फरार आरोपीवर
“किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाने धडाडीचा लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे. त्यांच्या निधनाने किनवटच्या सामाजिक जीवनाशी घट्ट नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. किनवट विधानसभा मतदार संघाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. दिवंगत प्रदीप नाईक यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणारे आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर सांगली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यात 40 ठिकाणी नाकेबंदी करून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पहाटेपर्यंत सुमारे 500 पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात होते. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल आऊट मोहीम राबवण्यात आली. यामध्ये हद्दपार तडीपार आणि सराईत गुन्हेगागारांचा शोध घेण्यात आला. तर स्वतः पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी रात्री उशिरा अनेक ठिकाणी फिरून तपासणी नाक्यांची पाहणी देखील केली.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे आणि त्यामुळेच म मंदिराचे बाहेर एक ते दीड किलोमीटर पर्यंत दर्शनासाठी रांगा लागले आहे तर चार ते पाच तास रांगेत उभे राहून दर्शनाला लागत आहे नवीन वर्षाचे पहिले दिवशी भारताच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक नाशिक मध्ये दाखल झाले आहे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी पर्यटना बरोबरच मंदिरात दर्शनाचा योग जुळून आणला आहे आणि त्यामुळे सर्व पर्यटन स्थळ आणि देवस्थानंवर मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळत आहे.
देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली साईनगरी भक्तांच्या गर्दीने फुलून गेलीय... नववर्षाची सुरूवात साईदर्शनाने करण्यासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत.. नववर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह शिर्डीत बघायला मिळत असून साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदूमून गेली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.