छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री तालुक्यासह ग्रामीण भागात संध्याकाळी उशिरापर्यंत पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसल्याने काढणीला आलेला मका आणि वेचणीला आलेल्या कापसासोबतच खरीपाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात ही असाच मुसळधार पाऊस पडल्यामुळे काढून टाकलेला मका हा पाण्याखाली गेल्यामुळे मक्याला कोंब फुटले आहेत.
शरद पवार गटाची कोअर कमिटीची उद्या बैठक आहे. शरद पवार गट सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. उद्या मुंबईत शरद पवार गटाची कोअर कमिटीची बैठक आहे. आज अनेक उमेदवारांनी मुंबईत शरद पवारांची वायबीला भेट घेतली.
बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सुजय विखेंनी दंड थोपटले आहेत. संगमनेर मतदारसंघात सुजय विखेंचा कार्यकर्ता मेळावा सुरु आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची सुजय विखे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तळेगाव दिघे गावात सुजय विखे काय बोलणार याकडं तालुक्याचं लक्ष लागलं आहे.
भाजप आमदार गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात घरवापसी करण्याची शक्यता आहे. गणेश नाईकांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. बैठकीत गणेश नाईकांच्या प्रवेशाला पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला.
शरद पवार गटात सामील होताच हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. जयंत पाटील यांच्या मान्यतेने त्यांची पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती झाली आहे.
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून जागा वाटपाच्या चर्चा या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत समाधान कामगिरी न करणाऱ्या आमदारांच्या तिकीट कापल्या जाणार असल्याची चर्चा काल दिवसभर रंगली. यात वर्सोवा विधानसभेच्या आमदार भारतीय लवेकर यांची सुद्धा उमेदवारी कापली जाऊ शकते, अशी चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेनंतर आता भारतीय लवेकर यांच्या समर्थकांनी लवेकर यांच्या समर्थनार्थ सोशल माध्यमातून पोस्टरबाजी सुरू केली आहे. ही निवडणूक आता जनतेची आहे, जनतेने हे निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. ही आमची निवडणूक आहे तुम्ही काळजी करू नका नऊ वर्षे 10 महिने तुम्ही आमच्यासाठी काम केला आता दोन महिने आम्ही तुमच्यासाठी काम करणार असे म्हणत पोस्टरबाजी केली आहे.
एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहेत. जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री हॅलीकॉप्टरमधून मुंबईकडं जात असताना हवामान खराब झाल्यामुळं हॅलीकॉप्टर पुन्हा दरे गावात माघारी फिरलं. आता ते गाडीने मुंबईकडे निघण्याची शक्यता आहे.
नंदूरबारच्या कोंडाईबारी घाटात जामनेर- सुरत बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात आठ जण जखमी,तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. घटनास्थळी विसरवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी दाखल झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
माजी मंत्री आमदार राजेद्र शिंगणे यांना अजित पवारांचा फोन आला. शिंगणे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न फोन केल्याचं समजतंय. शिंगणे अजित पवार साथ सोडून शरद पवार गटात जाण्याच्या हालाचलीनंतर शिंगणे यांना थांबविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
सलमान खान याला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला सुक्खा कालूयाला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आलं. पनवेल न्यायालयाने सुक्खा कालूयाला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पनवेल शहर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी पानिपत येथून संयुक्त कारवाई करत अटक केली होती.
तुळजापूर बोगस मतदान नोंदणी अर्ज प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. बोगस मतदार नोंदणी प्रकारात आमच्या राजकीय विरोधकांचा हात, मुंबई पुण्याला त्यांचे कॉलेज असल्याचं चव्हाण यांचं मत आहे. मधुकर चव्हाणांचा रोख आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्यावर असल्याचं बोललं जात आहे.
अभिनेता सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी गृहविभागाला थेट निर्देश दिले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि गुन्हे विभागाचे अधिकारी फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खान धमकी प्रकरणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यावर गृहमंत्री फडणवीस आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजना आमचीच असल्याच्या वक्तव्याचा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी समाचार घेतला.
लाडकी बहीण योजना पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना का आणली नाही, असा प्रश्न देसाई यांनी विचारला.
कर्नाटक सरकारचे उदाहरण देत असतील तर, दुसऱ्याच्या घरात मुलगा झाला म्हणून लाडू वाटण्यासारखेच हे आहे, असा टोलाही देसाईंनी लगावला.
पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार
शहरातील या पाच मतदारसंघात मनसेची उमेदवार देण्याची तयारी
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती ने जागा जाहीर केल्यानंतर मनसे त्यांच्या जाहीर करणार, सूत्रांची माहिती
राज ठाकरे येत्या रविवारी पुणे दौऱ्यावर येत असून या जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे
- भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत बोगस मतदारांविरोधात कारवाईसाठी दिलं निवेदन
- एकट्या नाशिक मध्य मतदार संघात तब्बल 20 हजारणहून अधिक बोगस मतदार असल्याचा दावा
- तर 2019 च्या लोकसभेत असलेल्या मतदारांची नावे 2024 लोकसभा निवडणुकीतून गायब
- तब्बल 18 हजार मतदारांचे नाव देखील नाशिक मध्य मतदारसंघातून गायब झाल्याची देवयानी फरांदे यांची माहिती
- या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करण्याची देवयानी फरांदे यांची मागणी
- मी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार, विरोधक खोटे आरोप करत आहेत
- विरोधक फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत, फरांदे यांची टीका
- याआधी ठाकरे गटाने देखील बोगस मतदारांच्या मुद्द्यावर निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत सत्ताधाऱ्यांवर केली होती टीका
मला पक्षाने उमेदवारी दिली नाही तर मी बंड करणार आहे हे स्पष्ट आहे
राजेंद्र शिंगणे याना जनता कंटाळली आहे त्यामुळे मी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे
आज पर्यंत पक्षासोबत मी प्रामाणिक राहिली आहे त्यामुळे पक्ष माझाच विचार करेल
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजित सिंग मोहिते पाटील हे वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते
पण माध्यमाच्या भीतीपोटी रणजितसिंग मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट न घेता वाय बी चव्हाण सेंटर मधून निघून गेले
माढा विधानसभा मतदार संघातून रणजितसिंग मोहिते पाटील हे इच्छुक आहेत
सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी लावला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन
चालत्या गाडीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला फोन
दक्षिण सोलापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस नझाल्यामुळे निर्माण झाली आहे पाण्याची टंचाई
याबाबत 10 ते 12 गावचे शेतकरी पाण्यासाठी करतायत उपोषण
उपोषणकर्त्यांना भेट देऊन आल्यानंतर आमदार देशमुखांनी लावला उपमुख्यमंत्र्यांना फोन
दुबदुबी तलावातील पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्याची केली विनंती
आमदार सुभाष देशमुख यांच्या विनंतीला मान देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दिली सकारात्मक प्रतिक्रिया..
- नाशिक शहरात महाविकास आघाडीचं ठरलं
- नाशिक शहरातील नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघ ठाकरे गट लढवणार सूत्रांची माहिती
- तर नाशिक पूर्व मतदासंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे
- नाशिक मध्य मतदासंघावर होता काँग्रेसचा दावा, तर नाशिक पश्चिम वर माकपसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचा होता दावा
- मात्र काल मुंबईत झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत नाशिक मध्य मधून वसंत गीते आणि नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची सूत्रांची माहिती
- तर देवळाली,निफाड, इगतपुरी बाबत मात्र महाविकास आघाडीतीलच मित्र पक्षाचे उमेदवार अदलाबदली करून लढवण्याची असणार रणनीती
जिथं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त मतं मिळाली. तिथं मतदार कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय.नाना पटोले
योजनादूत राज्यात फिरत आहे. ते सरकारचा प्रचार करत आहेत. त्यावर कारवाई करावी, आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहोत. फॉर्म ७ मार्फत आमचे मतदार कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय.नाना पटोले
मतदार कमी करण्याचा प्रयत्न होतोय. मतदारांचा हक्क नाकारण्याचा प्रयत्न होतोय. हा लोकशाहीला काळीमा आहे. घरुन मतदारांचा उपक्रम चांगलाय, पण तिथल्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना बरोबर घ्यावे.अनिल देसाई
फॉर्म नंबर ७ ही प्रक्रिया मूळात संशयास्पद आहे. कारण त्याचा कुठलाही डेटा आयोगाकडे नाही. सिन्नरमध्ये ५ हजार नावं अशीच गायब झाली. जिवंत असलेल्या लोकांना मृत दाखवण्यात आले. व्होटर लिस्ट नीट प्रिंट केलेली नसते. मग डिजिटल इंडियाच्या गप्पा का?जितेंद्र आव्हाड
राज्यातील तिजोरीतून उधळपट्टीसुरु आहे.
मुंबईत सर्वाधिक जागा अलढण्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही...
मुंबईत विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप चा 50-50 फॉर्म्युला...
2017 च्या मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ जागा वाटपातील महत्त्वाचा फॉर्म्युला ठरणार..., शिंदे गटाचे प्रवक्ते आणि नेते किरण पावसकर यांची माहिती...
शिवसेनेच्या दोन विभागणी नंतर शिंदे गटाला पाठिंबा देणारे 60 च्या पेक्षा जास्त माजी नगरसेवक...
मुंबई ही बाळासाहेबांची - किरण पावसकर..
मनसेचा अजून कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नाही ... जरी प्रस्ताव आला तरी शिंदे ठरवतील - पावसकर..
रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट
मी सैदव तुझ्या पाठीशी भक्कम उभा आहे, अशी पोस्ट अजित पवारांच्या फेसबुक पेज वर करण्यात आली होती
मात्र ही फेसबुक पोस्ट अजित पवारांच्या फेसबुक वरून आता डिलीट करण्यात आल्याचं समजतंय
रूपाली चाकणकर यांना पुणे शहरातून जोरदार विरोध पाहायला मिळतोय
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी न मिळाल्यामुळे पक्षातील अनेक जणं नाराज आहेत
अशातच रूपाली चाकणकर यांना दुसऱ्यांदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पद दिल्यामुळे पक्षातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती
यातच अजित पवारांनी त्यांच्या फेसबुक वर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली मात्र आता ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे
ज्यांना तिकीट मिळाले नाही किंवा ज्यांना त्यांच्याच पक्षाने नाकारले आहेत. ते मातोश्रीवर आज जात आहेत.संजय शिरसाट
काका मला भगोडा म्हणतात, मोठे असून मोठे पण दाखवत नाही, मी फक्त उजाळनी करत आहे. डान्स बार वाल्याकडून 100 कोटीचे टार्गेट होते.आशिष देशमुख
जुन्नर विधानसभा मतदारसंघात तिढा वाढला
अजित पवारांना भाजपचे मोठे आव्हान
अतुल बेनके यांच्या अडचणीत वाढ
भाजप नेत्या आशा बुचके निवडणूक लढण्यावर ठाम
चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर बुचके यांचा निर्धार कायम
येत्या दोन दिवसात मेळावा घेऊन करणार घोषणा
जुन्नरमधील राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष कायम
अजित पवार यांचा ताफा जुन्नर मध्ये असताना अशा बुचके यांनी त्यांचा ताफा अडवत आपली नाराजी प्रगट केली होती
त्यानंतर आता आशा बुचके या निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे जुन्नर मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये नवा संघर्ष पेटला आहे
आशा बुचके यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते शरद सोनवणे हे देखील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार ठाम असल्याने महायुतीसमोर नवं टेन्शन उभा राहिला आहे
महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टप्प्या टप्प्याने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करणार
सुरुवातीला सध्याचा आमदारांची उमेदवारी जाहीर होईल
कदाचित उद्याच यादी येऊ शकते
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बड्या नेत्याची माहिती
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात येत असते, खरीप हंगामात दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपाची लागवड करण्यात आली आहे मात्र पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पपई पीक ऐन काढणीच्या वेळेस पपईवर रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने जगवले आहेत यावर्षी पाऊस सोबतच कोणाच्या देखील तडाका वाढत आहे त्यामुळे निसर्गाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी आपलं एका जगवले आहेत मात्र रोगाच्या पादुर्भावामुळे शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडला असून या अडचणीतून मार्ग कसा काढावा असा प्रश्न आता शेतकऱ्या राजासमोर उपस्थित झाला आहे.
- नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता
- मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते शरद पवार गटाच्या वाटेवर
- नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते तुतारी घेण्याची शक्यता
- मुंबईत आज घेणार शरद पवारांची भेट
- नाशिक पूर्व मतदारसंघातून गणेश गीते निवडणूक लढण्यास इच्छुक
- नाशिक पूर्व मध्ये राहुल ढिकले आहेत भाजपचे सध्या विद्यमान आमदार
- भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर
आमचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे बंद करणार अश्या आशयाचे काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार व रणजित कांबळे यांचे फोटो वापरत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करण्यात आलीय. देवळी विधानसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवार यांच्या समर्थक ग्रुपवरून ही पोस्ट व्हायरल करण्यात आलीय.
भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या सुपुत्र प्रभाकर पाटील हे सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत,मात्र जागा वाटपाच्या तिढ्यात भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मैदानात असतील अशी चर्चा सुरू झाली आहे,त्यामुळे तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार,अशी लढत होण्याची शक्यता आहे.
परभणी शहरातील वसमत रोड वरीलसत्कार कॉलनी येथील एका निवासी वस्तीगृहात १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
७ नोव्हेंबर साठी शिवाजी पार्क सभेच्या मैदानासाठी ४ अर्ज दाखल...
मनसे, शिवसेना ,शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप या चारही राजकीय पक्षातर्फे शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज
मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार पहिला अर्ज दाखल करणाऱ्याला मैदान मिळण्याबाबत प्राधान्य...
मनसेनं प्रथम अर्ज केल्यामुळे मनसेला शिवाजी पार्क मैदान मिळणार असल्याची शक्यता...
विधानसभेचे आचारसंहिता लागताच संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात मंत्री अब्दुल सत्तार विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी दंड थोपटले आहेत. त्यासाठी भाजपमध्ये नाराज असलेले प्रमुख पदाधिकारी आज ठाकरे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर हे आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन हाती बांधणार आहेत. त्यामुळे सिल्लोडमध्ये भाजपला मोठी खिंडार पडणार आहे. मागील पंधरा वर्षांपासून या मतदारसंघावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केलेली आहे. स्थानिक भाजपचे पदाधिकारी, नेते विरुद्ध अब्दुल सत्तार असा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. अशामध्ये युती असल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे भाजपचे वरिष्ठ नेते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी करीत आता एकेक पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे गटात सहभागी होणार अशी चर्चा आहे.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडुन शरद पवारांची तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चेला आता आमदार बेनकेंनी पुर्ण विराम देत आज सकाळी ओझरच्या विघ्नहर्ता गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला.
- नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर
- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात थोपटले दंड
- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर
- भाजपच्या इच्छुकांनी विद्यमान आमदारांविरोधात बांधली मोट
- रात्री उशिरा भाजपच्या इच्छुकांची बैठक
- पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली विद्यमान आमदारांविरोधात नाराजी
- भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी हे देखील इच्छुकांच्या बैठकीला उपस्थित
- विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या ऐवजी इच्छुकांपैकी कुणालाही उमेदवारी द्या
- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी
- नाशिकमधील अंतर्गत वाद मिटवण्याचं भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींसमोर आव्हान
विधानसभेचे बिगुल वाजताच आता उमेदवारी साठी सर्वच पक्षात मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात देखील ही रस्सीखेच सर्वच पक्षात आहे. मावळ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्लाला सुरुंग लावला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला आमदार मावळ तालुक्याला मिळाला. मात्र आता या विधानसभेला महायुती मधीलच सर्व पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.
भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. रात्री उशिरा माजी आमदार सुरेश धस यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केलीय. सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याची माहिती असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतल्याने या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. भाजपचे आष्टी पाटोदा मतदार संघाचे माजी आमदार सुरेश धस यांनी अचानक जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
राष्ट्रवादी कॉग्रेस एकसंघ व्हायला पाहिजे यासाठी मी शेवटपर्यत लढणार असा विश्वास जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी मंत्री दिलीप वळसेपाटीलांसमोर व्यक्त करत शरद पवार आणि अजित पवार आपलेच असल्याचे मोठे विधान आमदार बेनकेंनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केल्याने चर्चेला उधाण आले.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसतो आहे. माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे हाती तुतारी घेणार आहेत. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचा प्रवेश होणार आहेत. ज्ञानदेव पवार हे आदिती तटकरे यांच्या विरोधात श्रीवर्धन मधून लढण्याची शक्यता आहे. जागा वाटपात श्रीवर्धन मतदार संघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार असून मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात म्हणजेच सुनिल तटकरे यांना टक्कर देण्यासाठी ज्ञानदेव पवार उभे रहाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ज्ञानदेव पवार यांनी यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापतीपद भूषवले आहे. . मागील वेळी म्हणजे 2019 मध्ये त्यानी श्रीवर्धनमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.
Marathi Breaking Live Marathi Headlines : महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद
महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद कायम
मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरे सेना, काँग्रेस दोन्ही पक्ष रामटेक, दक्षिन नागपूरसाठी आग्रही असल्याने दोन्ही जागांची चर्चा थांबली
आज पुन्हा या दोन्ही जागांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
कामठी काँग्रेसला तर हिंगणा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्यास सहमती
रामटेक, दक्षिण नागपूर ऐवजी राज्यात दुसरीकडे जागा, उबाठाला वाढवून देण्याचा पर्याय काँग्रेसकडून दिला जाणार असल्याची माहिती
दुसरीकडे महायुतीत आशिष जयस्वालला उमेदवारी दिल्यानं माजी आमदार रेड्डी यांनी वेगळी चूल मांडण्याचा तयारीत असल्यानं यात महाविकास आघाडीत दोन्ही पक्ष डोळा ठेवून बसले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.