Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणी आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही

Priya More

नंदुरबार शहरात वावरणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश

नंदुरबार नगर पालिका हद्दीतील मधुबन कॉलनी त गेल्या महिनाभरापासून दोन बिबट्यांचा वावर होता 2 दिवसांपूर्वी रहिवाशांना बिबट्याचा टेकड्यांवर मुक्त संचार पावास मिळाला या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर नंदुरबार वनविभागाच्या माध्यमातून सदर ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. अखेर आज पहाटेत नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आला आहे अखेर महिन्याभरापासून वावर असलेल्या बिबट्या जेरबंद झाला आहे. परंतु मधुवन कॉलनीतील रहिवाशांच्या माहितीनुसार सदर ठिकाणी दोन बिबट्या असून त्यातील एकच बिबट्या जेरबंद झाला आहे दुसरा बिबट्या अजूनही मुक्तपणे संचार करीत आहे. त्यालाही जेरबंद करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

निवडून आलेल्या सरकारला शपथ घेण्यापासून आम्ही रोखावे अस तुम्हाला वाटत का ? - कोर्ट

हरियाणा विधानसभा निवडणुकीला सुप्रीम कोर्टात आव्हान

EVM मध्ये बिघाड असल्याचे सांगत एका याचिकाकर्त्याने केली याचिका दखल

२० जागांवर पुन्हा निवडणूक घेण्याची याचिकेत मागणी

निवडून आलेल्या सरकारला शपथ घेण्यापासून आम्ही रोखावे अस तुम्हाला वाटत का ?

कोर्टाचा याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सवाल

अशा मागणीसाठी दंड आकारला जाऊ शकतो - कोर्ट

या प्रकरणाचा सुनावणीसाठी नंतर विचार करू - कोर्ट

आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

सीबीआयने आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर दाखल केला गुन्हा

सीबीआयने आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर दाखल केला गुन्हा

पुण्यात DCP, EOW पदावर कार्यरत होत्या

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) राज्य सहकारी पतसंस्थेच्या 1,200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

2020-21 दरम्यान हा घोटाळा झाला होता

महाराष्ट्र राज्य सरकारने ऑगस्ट मध्ये या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची शिफारस केली

सीबीआयने आता याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे

महादेव जानकर बारामतीत उमेदवार देण्याच्या तयारीत?

महादेव जानकर बारामतीत उमेदवार देण्याच्या तयारीत?

पहिल्या यादीत बारामतीच्या उमेदवाराचे नाव असण्याची शक्यता

१०० उमेदवारांची असणार पहिली यादी

महादेव जानकर महायुतीतून पडले बाहेर

महायुतीच्या विरोधातच महादेव जानकर यांनी थोपटले दंड

जानकर यांना राज्यपाल नियुक्त यादीत नाव असेल अस आश्वासन महायुतीने दिलं होत मात्र नाव नसल्याने जानकर नाराज झाले आणि त्यांनी युती मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

परभणी लोकसभेला पराभूत झाल्यानंतर महादेव जानकर यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून होते इच्छुक

महायुतीने विचारात न घेतल्याने महादेव जानकर नाराज

नागरिकत्व सुधारणा कायद्याची घटनात्मक वैधता सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली

CAA बाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल

तीन निकाल वेगवेगळे निकाल न्यायमूर्तींनी लिहिले

न्यायमूर्ती पारडीवाला यांच मात्र याबाबत वेगळ मत

नागरिकत्व सुधारणा कायद्याची घटनात्मक वैधता सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली

कलम 6 A वैध असल्याचा कोर्टाचा निर्णय

न्यायमूर्ती पारडीवाला यांनी CAA मधील 6 A कलम असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे

- सोलापुरात एमआयएम चार मतदारसंघात उमेदवार देणार

- एम आय एमचे सोलापूर शहर मध्यचे उमेदवार फारूख शाब्दिक यांची घोषणा

- सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार

- सोलापूर जिल्ह्यातील मुस्लिम मताचं प्राबल्य असणाऱ्या मतदार संघात एमआयएम पक्षाचे उमेदवार असणार मैदानात

- सोलापूर शहर उत्तर,शहर मध्य,सोलापूर शहर दक्षिण आणि अक्कलकोट मतदार संघात उमेदवार उभा करण्याचा निर्धार.

- सोलापूर शहर मध्य मधून शहराध्यक्ष फारूख शाब्दि यांची उमेदवारी जाहीर,अन्य तीन मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी सुरू

- एमआयएमच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीपुढे मुस्लिम मतांचे विभाजन रोखण्यासाठी असणार मोठं आव्हान

- याबतीत फारुख शाब्दि यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी..

Pune News: प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे रासपाच्या संपर्कात

प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे रासपाच्या संपर्कात

रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांची माहिती

राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नाराज नेते आमच्या संपर्कात असल्याची रासप नेत्यांची माहिती

राज्यभरात पंधरापेक्षा जास्त आमदार निवडून येणार जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांचा दावा

Mumbai News: बोरिवलीचे आमदार सुनिल राणेंचा पत्ता कट होणार?

बोरिवलीचे आमदार सुनिल राणेंचा पत्ता कट होणार?

बोरीवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक

भाजपच्या दिल्लीतील याबाबत चर्चा

गोपाळ शेट्टींच्या उमेदवारीवरून बैठकीत दोन नेत्यांमध्ये मतांतर

लोकसभेत गोपाळ शेट्टींचे तिकीट कापल्यानंतर त्यांचं पुर्नवसन करण्याची मुंबईतील नेत्यांची विनंती

मुंबईतील एका नेत्याचा गोपाळ शेट्टींसाठी आग्रह असल्याची माहिती

बोरीवली विधानसभेबाबत कालच्या बैठकीत तोडगा नाहीच

पुढील बैठकीत यावर चर्चा करण्यास पक्षश्रेष्ठी यांची संमती

Pune News: महायुतीच्या पुणे महानगर समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती.

महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय राखत पुणे महानगर,पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक म्हणून विधानसभेच्या सर्व एकवीस जागा आहेत

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची पदावर नियुक्ती केल्याचे जाहीर केली आहे

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंदीगड दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंदीगड दौऱ्यावर

हरयाणा सरकारच्या शपथविधीला फडणवीस लावणार हजेरी

एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत साधणार संवाद

Ratnagiri News: रत्नागिरीच्या पशुराम घाट संरक्षक भिंत पुन्हा कोसळली

रत्नागिरी - परशुराम घाट संरक्षक भिंत कोसळली

परशुराम घाट असुरक्षित संरक्षक भिंतीचा आणखी एक भाग कोसळला

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखालील मातीची मोठी धूप

महामार्गाचा काँक्रीटचा रस्ता केव्हाही कोसळण्याचा धोका

महामार्गावरील एक लाईन बंद असली तरी दुसऱ्या लाईनलाही धोका निर्माण होण्याची शक्यता

उर्वरित संरक्षक भिंतही कोसळण्याच्या स्थितीत

Pune News: पुण्यामध्ये शहर काँग्रेसची बैठक पार पडली

पुण्यात शहर काँग्रेसची बैठक पार पडली

गटातटाच्या राजकारणाऐवजी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करावा

पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना सूचना...

पुढील महिना भर मतभेद विसरून कामाला लागण्याच्या सूचना

महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेन त्याचा घरोघरी जाऊन प्रचार करा...

पुण्यात काँग्रेस भवन येथे पार पडली बैठक.

Pune News: पुण्यातील खराडी-मुंढवा येथील पुलावर धावत्या कारने घेतला पेट

पुण्यातील खराडी-मुंढवा येथील पुलावर धावत्या कारने घेतला पेट

अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन आग पूर्णपणे विझवली

या आगीत कोणी जखमी झाले नाही पण कार पूर्णपणे जळून खाक झाली

पुणे शहर आणि परिसरात गेल्या ३ दिवसांपासून अवकाळी पाऊस

पुणे शहर आणि परिसरात गेल्या ३ दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली

गेले तीन दिवस दिवसापेक्षा रात्री पावसाचा जोर जास्त असल्याचे दिसून आले

शहरातील अनेक भागात रात्रीचा पाऊस झाला आहे

२० ऑक्टोबरपर्यंत पुणे शहर आणि परिसरात अवकाळी बरसणार आहे.

Nitesh Rane: भाजप आमदार नितेश राणे यांना आज माजगाव कोर्टात हजर राहणे बंधनकारक

भाजप आमदार नितेश राणे यांना आज माजगाव कोर्टात हजर राहणे बंधनकारक

कोर्टात हजर राहण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाकडून रणेंविरोधात काढण्यात आलेला अजामीनपात्र वॉरंट करण्यात आला होता रद्द

संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानी प्रकरणी नितेश राणेंना माझगाव कोर्टात राहावे लागणार

Mumbai News: विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे वरळीत झळकले बॅनर

विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे वरळीत झळकले बॅनर

आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे झळकले बॅनर

कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी अथवा मतं मागण्यासाठी इमारतीत पाऊल न ठेवण्याचा बॅनरवरून देण्यात आला इशारा

इमारत क्रमांक १ मध्ये घरे देण्याचं देण्यात आलं होतं रहिवाशांना आश्वासन

इमारत क्रमांक १ मध्ये घरे नसल्याचं समजतात स्थानिकांकडून रोष व्यक्त

NCP New Song: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नवीन गाण लाँच

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नवीन गाण लाँच

२०१९ला राष्ट्रवादी पुन्हा असं गाण मात्र पक्षात २ गट निर्माण झाल्यामुळे गाण्यात राष्ट्रवादी पुन्हा सोबतच शरद पवार पुन्हा असा उल्लेख

लोकशाही आणि स्वाभिमानाचा लढा लढण्यासाठी राष्ट्रवादी पुन्हा शरद पवार पुन्हाचा गाण्यात उल्लेख

Nagpur News: राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

पहिल्या टप्प्यात ५० मतदारसंघात एकच नाव आल्यानं उमेदवारी निश्चित

काही ठिकाणी 2 ते 3 नाव आहे त्यावर 20 ऑक्टोबरला काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

यातील विदर्भातील नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकुर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची उमेदवारी निश्चित..

Nashik News: नाशिकमधील ऑनर किलिंगच्या घटनेतील आरोपीला 20 वर्षांचा करावास

नाशिकमधील २०१३ मध्ये झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेतील आरोपीला 20 वर्षांचा करावास

2013 मध्ये नाशिकमध्ये एका गर्भवती मुलीची वडिलांनीच केली होती हत्या

आंतरजातीय विवाह केल्याने वडिलांनी केली होती मुलीची हत्या

या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दिली होती फाशीची शिक्षा

सर्वोच्च न्यायालयाने मात्र एकनाथ कुंभारकर या आरोपीला दिली 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अनिसकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत करण्यात आलं स्वागत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jodhpur Tourism Places: जोधपूरमधील 'ही' खास पर्यटन स्थळे पाहिलीत का ?

Maharashtra Politics: तिकीटावरुन सख्ख्या भावांमधील संघर्ष टळला! भाजपच्या विद्यमान आमदाराची निवडणुकीतून माघार

Pooja Sawant : पूजाचा स्वॅगच निराळा; डोळ्यांना लावलं पिवळं काजळ

Vijay Vadettiwar : काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार, विजय वडेट्टीवार यांनी सांगितली तारीख

IND vs NZ,1st Test: भारताचा फक्त ४६ धावांत खुर्दा, टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, मायदेशात माती खाल्ली

SCROLL FOR NEXT