Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 11h january 2025 : आज शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, संतोष देशमुख हत्या प्रकरण, चीनमध्ये नवा विषाणू, राज्यात पावसाचा अंदाज, हवामानात बदल, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण हे जबाबदारी सांभाळणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

चाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचे हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करत मुंबईतील बोरिवली पोलिसांनी ४० लाख २० हजार रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. एनडीपीएस कायद्याच्या कलम ३.२१ (२) २९ अन्वये आरोपींना अटक करण्यात आली आहे.शाहवाझमा (24 वर्षे) अभिषेक रामजीलाल कुमार (25 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत बोरिवली पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाने दोन्ही आरोपींकडून चाळीस लाख वीस हजार रुपयांचा हेरॉईन हा अमली पदार्थ हस्तगत केला आहे दोन्ही आरोपी सध्या बोरिवली पोलिसांच्या ताब्यात असून आरोपींनी हा अमली पदार्थ कोणाकडून आणला आणि ते कुणाला विकणार होते त्यांच्यासोबत अजून कोणी सहभागी आहेत का याचा तपास बोरिवली पोलीस करत आहेत.

Raigad News : पेणमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या

रायगड जिल्ह्यातील पेण शहरात रहाणाऱ्या 14 वर्षीय लहानग्या मुलाची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत आंबेडकर शाळे लगतच्या झुडूपात मृतदेह मिळून आल्यानंतर एकच गोंधळ झाला. गणेश बाळू चुणारे वय वर्ष 14 असे मृत मुलाचे नाव आहे. मृत मुलाचे वडील बाळू चुणारे यांनी या बाबत पेण पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. अज्ञात आरोपीविरोधात कलम 103 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Walmik Karad : वाल्मिक कराडला अशक्तपणा, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली तपासणी

खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला अशक्तपणा जानवू लागला

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली तपासणी

कोठाडीतच करण्यात आली तपासणी

डॉक्टरांनी केला औषधोपचार

वाल्मीक कराड ला १४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

Pune News : पुण्यातील एफसीवर रोडवर पोलिसांची आणि महापालिकेची धडक कारवाई

पुण्यातील एफ सी रोड वर पोलिसांची आणि महापालिकेची धडक कारवाई केली आहे.

एफ सी रोड वरील फुटपाथ वर अनधिकृतपणे करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

गेल्या अनेक महिन्यांपासून एफ सी रोड वर अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी

पुण्यातील एफ सी रोड वर असलेल्या फुटपाथ वर चालणं नागरिकांना अवघड जात होतं

Sanotsh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणीही सुटणार नाही : CM फडणवीस 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करतील जेवढे पुरावे आहेत. त्या सर्व पुरावांच्या आधारावर कारवाई होईल, कुणीही सुटणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे.

राजकारणी आपल्याकडे जशी मजा करतात, तशी राजस्थानमध्ये नाही - राज्यपाल हरिभाऊ बागडे

जालना येथे महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन आणि मारवाडी युवा मंचच्यावतीने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी आपल्या भाषणात राजस्थान आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची तुलना केलीय. आपल्यासारखी राजस्थानच्या राजकारणात मजा नाही. आपल्याकडे जसे राजकारणी मजा करतात, तसे तिकडे करत नाहीत, असं मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांनी मांडलाय.

शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त प्रकरणी लवकरच निर्णय - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगरमधील श्री शनी शिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त मंडळाद्वारे बेकायदेशीररित्या करण्यात आलेल्या १८०० कर्मचाऱ्यांची भरती आणि विश्वस्त मंडळांवर होत असलेल्या विविध आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. तसेच विशेष ऑडिट करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. दरम्यान, 'आता या देवस्थानाचे प्रकरण माझ्याकडे आहे, हा प्रश्न मी मागच्यावेळेस विधीमंडळात मांडला होता. आता या प्रकरणाच्या मुळाशी मी जाणार आहे. याबद्दल सखोल चौकशी झाली आहे. सरकार जो काही निर्णय घेईल, त्या निर्णयामध्ये मी पूर्णपणे लक्ष घालणार असल्याचं, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

Supriya Sule News : मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुप्रिया सुळेंची नाराजी 

Supriya Sule News : बारामती तालुक्यातील अंजनगाव (कऱ्हावागज) येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ऐनवेळी निमंत्रण देण्यावरून खासदार सुप्रियाताई सुळे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे आपली ही नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर विधानसभा निहाय मी आढावा बैठका घेतल्या. मोठ्या ताकतीने आपण ही निवडणूक लढल्याचे मला यादरम्यान स्पष्टपणे दिसून आले - अंबादास दानवे

मुख्यमंत्री साहेब आमचं ऐका, ७ जणाला मोकोका लागला आहे. राहिलेल्यातला सुध्दा लागला पाहिजे. आक्का सुध्दा यातील आरोपी आहे. दीड कोटी रूपयांसाठी हत्या झाली.
सुरेश धस, भाजप आमदार

पोलीस भरती परीक्षेत डमी उमेदवार पकडला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोव्यात आज पोलिस भरतीची परीक्षा सुरू होती, त्यात एका उमेदवाराऐवजी त्याचा डमी उमेदवार परीक्षा देताना पकडला गेला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबई मेट्रो लाईन ७ आणि २अ आता ८० किमी प्रति तास वेगाने धावणार

मुंबई मेट्रो लाईन ७ आणि २अ आता ८० किमी प्रति तास वेगाने धावणार

पूर्ण गतीने संचालनासाठी सीसीआरएसकडून मिळाली मंजुरी

मुंबई मेट्रो लाईन ७ आणि २ए या दोन्ही मार्गांवर ५० ते ६० किमी प्रति तास या मर्यादित वेगाने सध्या मेट्रो धावते

मेट्रो लाईन ७ आणि २ए या दोन्ही मार्गांवर संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आल्याने वेग मर्यादा वाढवणे झाले.शक्य

या दोन्ही लाईन्सवर रोज २.५ लाखांहून अधिक प्रवासी करतात दररोज प्रवास

वेग मर्यादा वाढवल्यामुळे प्रवाशांच्या वेळेत होणार बचत

चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड पोलिसांनी महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

तसेच त्यांच्या ताब्यातून तिन चार चाकी वाहन आणि चार चाकी वाहनांच्या बनावट चाव्या असा जवळपास 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. , अल्ताफ कासम अत्तार, जुबेर कयामुद्दिन कुरेशी आणि मुसाहिद अलिहास खान आणि र जानिशार कमर आली या चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या चारही आरोपीकडून पोलिसांनी चार चाकी वाहन चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडती चालले आहेत. यात पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील चार चाकी वाहन चोरीच्या गुन्ह्याचा सहभाग आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.. यातील एक आरोपी अद्यापही फरार असताना आता या सर्वच आरोपींवर मोका लावण्यात आला आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सभागृहात याबाबतची घोषणा केली होती, त्याची आज अंमलबजावणी करण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले व सिद्धार्थ सोनवणे हे सध्या अटकेत आहेत तर कृष्णा आंधळे हा अध्यापही फरार आहे.. त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत.. तर दुसरीकडे अटकेत असलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याने त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या दरम्यान आज विष्णू चाटे याला न्यायालयात हजर करण्यात आले असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याची पोलिस कस्टडी मागितली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात या खुनातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल. अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आज करण्यात आली असून आता या सर्व आरोपींवर मोक्का लावला असल्याची माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कर्जमाफी विधानावरून अजित पवारांना प्रवीण दरेकरांचा टोला

शेतकरी कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगावलेला टोल्यावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील टोला लगावला आहे. अंथरून बघून पाय पसरायच्या ऐवजी,आम्ही अंथरून वाढवू,पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ,असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावला आहे.

Maharashtra Live Update : विशाळगडावर होणाऱ्या ऊरूसाची परवानगी पोलिसांसह प्रशासनानं नाकारली

संजय राऊत यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं.. मी बांधील नाही, त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मत व्यक्त करायला.. ते रिकामटेकडे आहे, ते रोज बोलतात मी रिकामटेकडा नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने सोलापूरकरांची जिंकली मने

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी आणि सोलापूरच्या बार्शीची सून माधुरी दीक्षित ही सोलापुरात आली होती.सोलापूरच्या जुन्या एम्प्लॉईमेंट चौकातील पी अँड जी ज्वेलर्सच्या उदघाटच्या कार्यक्रमासाठी ती आलेली.यावेळी तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं.विशेष म्हणजे माधुरी दीक्षितने मराठीतून आपल मनोगत व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली..

पालीच्या खंडोबा यात्रेचा आज मुख्य दिवस, खंडोबा- म्हाळसाचा विवाह सोहळा

यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार खोबरे उधळणीत कराड तालुक्यातील पालीच्या खंडोबाच्या यात्रेस सुरवात झाली आहे. महाराष्ट्र कर्नाटक मधील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोंबाची यात्रेला सुरूवात झाली असून खंडोबा म्हाळसा विवाह सोहळ्याचा आज मुख्य दिवस आहे.

पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भाविक भक्तांकडून आपल्या घरच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ घातला जात आहे.खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात रथामधुन मानकऱ्यांच्या सोबत जातो अशी परंपरा असुन मानकरी कमरेला देवाचा मुखवटा बांधुन देवाला विवाहस्थळी नेण्यात येते यावेळी भाविक यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करत रथावर भंडार खोबरे उधळण करतात.पौष पोर्णिमेच्या मृग नक्षत्र गोरज मुर्हतावर हा विवाह सोहळा पार पडतो.

भाजप श्रेष्ठींनी बाळा भेगडेंना माफ करावं, आमदार सुनील शेळके यांची बावनकुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया..

भाजप श्रेष्ठीने पुन्हा बाळा भेगडेंना पदरात घ्यावं, माफ करावं आणि काम करण्याची संधी द्यावी अशी प्रतिक्रिया मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. मावळ विधानसभा निवडणुकीत बाळा भेगडे यांनी मावळ पॅटर्न राबवत सुनील शेळके यांच्या विरोधात काम केले. बाळा भेगडे यांनी महायुती चा धर्म पाळला नाही. मात्र भाजपची शिस्तभंग समिती त्यावर निर्णय घेईल असे बावनकुळे यांनी सांगितले. मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार सुनील शेळके यांनी भाजप श्रेठींनी बाळा भेगडेंना माफ करावं अशी प्रतिक्रिया दिल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत....

संजय राऊत यांनी घेतलेला निर्णय आश्चर्यकारक- प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिय

निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. स्वबळावर लढण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्याचा तर नाही ना? कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जरी वेगळा लढणार असेल तर आम्ही मात्र समविचारी पक्षाचे एकत्र म्हणून महा विकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवू असं ही जगताप म्हणाले..

Vegatable Price: भाजीपाल्याची आवक वाढली, दर वधारले

मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात सध्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, भाजीपाल्याला पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाला जास्त प्रमाणात फुलल्याने याचा परिणाम दरांवर झाला आहे, टोमॅटो केवळ दहा रुपये किलो तर मेथी आणि संबार चक्क दहा रुपयांमध्ये तीन जुड्या हिंगोलीच्या बाजारपेठेत मिळत आहेत .

Santosh Deshmukh Murder Case: आम्हाला न्याय मिळावा, संतोष देशमुख यांच्या लेकीची मागणी

आम्हाला न्याय मिळावा पोलीसांनी जो तपास सुरू केला आहे तो न लपवता आम्हाला माहीती द्यावी अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केलीय दरम्यान वैभवी देशमुख यांच्याशी बातचीत केलीय.

Sanjay Raut:महानगरपालिका स्वबळावर लढणार- संजय राऊत

संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मुंबईसह नागपूरपर्यंत स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Rajan teli: मी भाजपात प्रवेश करतोय ही चर्चा चुकीची-राजन तेली

मी भाजपात प्रवेश करतोय ही चर्चा चुकीची आहे. मी बावनकुळे साहेबांना माझ्या मतदार संघातील महत्वाच्या विकास कामा बाबत चर्चा करण्यासाठी भेटायला मंत्रालयात गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी बावनकुळे साहेबांची भेट घेतली असे स्पष्ठीकरणं माजी आमदार व ठाकरे गटाचे स्थानिक नेते राजन तेली यांनी दिलेय.

'उजनी'वर विदेशी पाहुण्यांचे आगमन...... हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फ्लेमिंगोंनी खुलले निसर्ग सौंदर्य.....

पुणे, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर साकारलेल्या आणि सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या,आणि विशेष म्हणजे देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांची 'पंढरी' ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय.

धुक्यामुळे विमानसेवेला अडथळा, बेंगलोरु ते नांदेड विमानाने आकाशात मारल्या पाच घिरट्या

नांदेड जिल्ह्यात सध्या थंडीने जोर धरला आहे.तापमानात देखील कमालीची घसरण झाल्याने पहावयास मिळत आहे. दरम्यान याचाच फटका विमान सेवेवर होताना दिसत आहे.दरम्यान बेंगलुरूहुन नांदेडला लँड होणाऱ्या विमानाने आकाशात पाच घिरट्या घातल्या, धुक्यामुळे लँडिंगचे सिग्नल मिळाले नसल्याने लँडिंगला अडथळा निर्माण झाला., पाच घिरट्या घातल्यानंतर दृश्यमानता नीट झाल्यानंतर विमानाचे झाले लँडिंग आहे.विमानतळ परिसरात विमानाच्या घिरट्या पाहून प्रवाश्यांसह नांदेडकर मात्र बुचकळ्यात पडले होते.

mahad : ट्रॅक्टर नाल्यात उलटून दोघांचा

रस्त्यालगतच्या नाल्यात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात महाड तालुक्यातील धरण वाडी इथं झाला. सतीश देशमुख असे मृत चालकाचे नाव आहे. वरंध गावाकडे जात असताना धरण वाडी येथील नाल्यात ट्रॅक्टर कोसळून हा अपघात झाला.

Santosh deshmukh case : संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासात नेमकं चाललय काय?

माझे वडील संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन एक महिना झाला या प्रकरणात पोलीस त्यांचा तपास करत आहेत परंतु त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती दिली जात नाही या प्रकरणात नेमकं चाललय काय तपास कुठपर्यंत आलाय हे देशमुख कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला कळायला हवे ही माझी विनंती आहे.. या गुन्ह्यातील तपासाबाबत वेळोवेळी आम्हाला माहिती द्यावी अशी विनंती संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने केली आहे..

जालन्यात तरुणाने किरकोळ भांडणातून स्वतः ची दुचाकी जाळली,जालना शहरातील गांधी चमन भागातील घटना

जालन्यात तरुणाने किरकोळ भांडणातून स्वतःची दुचाकी जाळल्याची घटना समोर आलीय.. जालना शहरातील गांधी चमन भागात गुरुवारी रात्री ही घटना घडली असून, या घटनेत दुचाकी जळून संपूर्णतः खाक झालीय.. दुचाकी जळत असल्याचं समजताच स्थानिक नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.मात्र तो पर्यंत दुचाकी पूर्णतः जळून राख झाली होती.

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना बडतर्फ करा

परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीमुळे आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्याना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी माजी नगरसेवक भाजप कार्यकर्ते रमेश माळी यांनी केली आहे . त्याचबरोबर पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असून त्त्यांच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता असून त्या सर्व मालमत्तेची चौकशी करावी. या संपुर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील रमेश माळी यांनी केली आहे.

crime News : अमरावतीमध्ये जात पंचायतीने कुटुंबावर टाकला बहिष्कार

फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जातपंचायती जिवंत असून जातपंचायतीमुळे अनेक कुटुंबांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे अमरावतीमध्ये गाडी लोहार समाजाच्या जातपंचायतीने करण चव्हाण यांच्या कुटुंबाला जात पंचायतीने दिलेला निर्णय मान्य केला नाही म्हणून गेल्या दीड वर्षापासून बहिष्कृत केलेले आहे या कुटुंबाला समाजातील लग्न असो मरण असो वा कोणी आजारी असो कुठेही बोलावलं जात नाही अखेर या प्रकरणाची तक्रार महिलेने गाडगे नगर पोलीस ठाण्यात दाखल केली व त्यावरून आता जातपंचायतीच्या प्रमुखांवर गडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे,

Pune : घरफोडी करणा-या परप्रांतीय टोळीला अटक

आंबेगाव तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात पाळत ठेवुन घरफोडीसह दुचाकी चोरी करणारी टोळीला मुद्दामालासह अटक केली असुन त्यांच्याकडुन एका चारचाकी गडीसह १३ लाख २० हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या चारही आरोपींना आरोपींना घोडेगाव न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

Maharashtra Breaking Live Marathi Headlines : कोल्हापूर जिल्ह्यातील गायरानात राजरोस वृक्षतोड सुरू, वन खात्याचे दुर्लक्ष

कोल्हापूर जिल्ह्यातील म्हाळसवडे इथल्या गायरान गट क्रमांक 83 मधील 406 सुबाभुळीची झाडे तोडण्याचा ग्रामपंचायतीने ठराव केला. त्या ठरावानुसार सुबाभुळीची म्हणून सर्वच झाडांच्या वाहतुकीचे पास वनक्षेत्रपाल यांनी दिले. यामध्ये सागवान, खैर किंवा इतर औषधी वनस्पतींचाही समावेश असल्याची शंका आहे. वाहतूक करताना कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नसल्याने ठेकेदाराने ही राजरोसपणे बहुमोल अशा वृक्षांची तोड करून वाहतूक केलीये. दरम्यान याची चौकशी करण्यासाठी तालुक्याचे कार्यालयीन प्रमुख म्हणून तहसीलदार कार्यालयाने एक पथक स्थापन केलं. मात्र या पथकाने चौकशी करताना वन विभागाची परवानगी घेतली नाही म्हणून वनक्षेत्रपालांनी वनरक्षकांना चौकशीला पाठवलेलं नाही. यावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात ही वृक्षतोड कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, यात कोण कोण सामील आहे ? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.

पाटणे तलावातील मगरीची दहशत

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पाटणे गावच्या तलावात मगरीने तळ ठोकल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तलावात गेली अनेक दिवस मगरीचे वास्तव्य असून या मगरी दोन पिले आहेत. मासेमारी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही मगर येत आहे. दोन दिवसांपूर्वी या तलावात मासेमारी करण्यासाठी आलेल्या एका नागरिकावर या मगरीने हल्ला चढवला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या मगरीला पकडून अधिवासात सोडावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

Maharashtra Breaking Live Marathi Headlines गायीच्या दुधाला 5 रुपयां वरून 7 रुपये प्रति लिटर अनुदान...दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा ,यासाठी राज्य शासनाने गाईच्या दुधावर 5 रुपयांवरून 7 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे .. दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं बोललं जात आहे..

शरद पवारां सधणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्यकांशी संवाद

आज शरद पवार साधणार सहित्यकांशी संवाद

दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार साधणार सहित्यकांशी संवाद

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आज या कार्यक्रमाचे आयोजन

डॉ रावसाहेब कसबे यांच्यासह डॉ शिवाजीराव कदम, डॉ पी डी पाटील सुद्धा राहणार उपस्थितीत

संध्याकाळी ५.४५ वाजता कार्यक्रम

धुळ्यात थंडीचा कहर अद्यापही कायम; 9.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

धुळ्यात थंडीचा कहर अद्यापही कायम आहे, आज धुळ्यात 9.5 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे, आजही धुळ्यात 10 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली असली तरी कालच्या तुलनेत तापमानाचा पारा चार अंशाने वाढला आहे, त्यामुळे धुळेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे,

Nagpur Crime : हप्ता दिला नाही म्हणून केला जाणून दोघांना धारदार शस्त्राने वार करत केले जखमी

नागपुरातील नंदनवन भागात एका गुंड प्रवृत्तीच्या युवकाने परिसरातील लोकांना हप्ते वसूली करून त्रस्त केले आहे... त्यामुळे पोलिसांचा धाक उरला की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.... त्यामुळे गुंडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहेय...

रजत मेश्राम या गुंडाचे नाव आहेय... नागपुरच्या नंदनवन पोलिस ठाण्या अन्तर्गत आनंद शेट्टी या फूड स्टॉल मालकावर हप्ता न दिल्यामुळे कात्रीने हल्ला करून जखमी केले आणि त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या राजकुमार बैस्वार यांना डोक्यावर घाव करून जखमी केले आहे.

दोघांना रुग्णालयात उपचार सुरू आहे. तेच आरोपी रजत मेश्रामला पोलिसांनी अटक केली आहे. आता परिसरातील रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी हप्ता मागणाऱ्या आरोपीला आणि भंगार व्यावसायिक असलेल्या त्याच्या आईला वस्तीतून बाहेर करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली आहे.

crime News : वसईत शुक्रवारी ज्वेलर्स दुकानात चोरी

वसईत शुक्रवारी ज्वेलर्स दुकानात चोरी

वसईतील बाभोळ नाका परिसरात मयंक ज्वेलर्सवर दरोडा

दोन अज्ञात चोरट्यांचा बंदुकीचा धाक दाखवून लूट

शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली घटना

दुकानादार रतन सिंघवी वयवर्षे ६५ एकटे दुकानात पाहून चोरानी केली लुट

सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद

पोलिस उपायुक्त पौर्णिमा श्रृंगी चौगुले घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली

५० तोळे,तब्बल ८० लाख रुपये पेक्षा अधिकच सोन चोरीला गेल्याच्या प्राथमिक माहिती

माणिकपूर पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू

पाच पेक्षा अधिक टीम तपास करीता रवाना लवकरच आरोपी गजाआड होतील पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांची माहिती

jalana : खंडणी मागितली तर तात्काळ पोलिसांना कळवा, जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांचं आवाहन

जालना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पावर जर कोणी खंडणी मागितली, दमदाटी केली तर तात्काळ पोलिसांना कळवा असं आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केलंय.पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत महावितरणचे अधिकारी, सौर ऊर्जा प्रकल्पाधिकारी त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी हे उपस्थित होते. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प उभारत असताना प्रकल्प अधिकाऱ्यांना काही अडचणी आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याच आवाहन त्यांनी केलाय.

शुभदा कोदारे खून प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन

पुण्यातील आय टी कंपनी मध्ये महिलेच्या खुनाच्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून विशेष समिती स्थापन

राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फायंडिंग कमिटी (घटनेची तथ्य शोध घेणारी समिती) करणार संपूर्ण प्रकरणी तपास

केरळ आणि हरयाणा या राज्याच्या माजी पोलीस महासंचालक तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सेक्रेटरी या समिती मध्ये असणार

crime News : फलोत्पादन उपसंचालक अडीच लाखांची लाच घेताना ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. २०१९ मध्ये कृषी सिंचन योजनेत त्यांनी कसुरी केल्याबद्दल चौकशीत तत्कालीन कृषी सहसंचालकांनी डिसेंबर मध्ये त्यांना निलंबित केले होते. या प्रकरणात पोलिस ठाण्यात तक्रार न देण्यासाठी गुंजाळ याने तक्रारदाराकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. फिर्यादी यांनी याची तक्रार एसीबी कडे दिली होती

याबाबत ‘एसीबी’ ने संगमवाडी परिसरात सापळा रचून गुंजाळला अडीच लाख रुपये लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. गुंजाळ याच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात आणखी दोन लाख १५ हजारांची रक्कम आढळून आली

याबाबत त्याच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Pune Metro : पुणे मेट्रो रात्री ११ पर्यंत धावणार 

पुणे मेट्रो रात्री ११ पर्यंत धावणार, लवकरच होणार अधिकृत घोषणा

पिंपरी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असे दोन्ही मार्ग सध्या पूर्ण क्षमतेने सुरू

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लक्षात घेत पुणे मेट्रो कडून लवकरच निर्णय घेण्याची घोषणा करणार

पुणे मेट्रो ची दैनंदिन प्रवासी संख्या १.५ लाखावर

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील आय टी कंपन्या, इतर आस्थापना रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे अनेकांना प्रवास करता येत नाही

सध्या मेट्रो सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत धावत आहे

Pune Crime  : दिलीप मंडल यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल

दिलीप मंडल यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल

आझाद समाज पार्टी तर्फे मंडल यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार

दिलीप मंडल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

सावित्रीबाई फुलेंच्या चरित्र ग्रंथातील फातिमा शेख हे पात्र इतिहासात कधीच नव्हतं, दिलीप मंडल यांनी केला होता दावा

फातिमा शेख यांच्या विषयावर पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्या आणि समाजात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा मंडल यांच्यावर आरोप

मंडल यांच्या वक्तव्यामुळे समाजातील वंचित घटकांच्या विशेषतः ज्या घटकांना फातिमा शेख यांच्या ऐतिहासिक कार्याचा अभिमान आहे अशांचा भावना दुखावल्या चे सुद्धा त्यांच्यावर आरोप

आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

दिलीप मंडल हे केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार आहेत

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे मोटार अपघात प्रकरण

पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे मोटार अपघात प्रकरण

डॉ. अजय तावरे याच्या अर्जावर १५ जानेवारीला सुनावणी

ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीदरम्यान, पोर्शे वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे

नमुने बदल्याप्रकरणी तावरे याला अटक करण्यात आली

पोलिस तपासात अग्रवालच्या मुलासह दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा प्रकार समोर आला होता

डॉ तावरे विरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली होती

या प्रकरणात डॉ. तावरे ने नाव वगळण्याबाबत अर्ज केला आहे. त्यावर पोलिसांकडून काल न्यायालयात पुरावे सादर करण्यात आले

या प्रकरणात १५ जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार

1 कोटी 15 लाखाची वीज चोरू उघडकीस

- नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील राईसमिलवर वीज चोरीची मोठी कारवाई, 1 कोटी 15 लाखाची वीज चोरू उघडकीस

- औद्योगिक वसाहतीत ताज राईसमिल शरीफ री अन्सारी यांची आहे, या प्रकरणात रामटेक पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- वीज मित्रांच्या पतंग राजा तपासणी दरम्यान शुभेच्छुक पूर्ण लोडचा उपयोग होत असताना सुद्धा डिस्प्लेवर कमी वीज वापर दिसत होती

- पथकाकडून तपासणी केली असता हा सगळा प्रकार मागील वर्षभऱ्यापासून सुरू होता, त्यामुळे 90 हजार युनिटचा अवैध वापर करण्यात आला. त्यासाठी एक कोटी दोन लाख रुपयाचा आकारण्यात आले, तेच 13 लाख 10 हजाराचा दंड ठोठावण्यात आला.

HMPV संशयित लहान मुलांचे सॅम्पल हे एम्समध्ये तपासासाठी पाठवण्यात आले

- HMPV संशयित लहान मुलांचे सॅम्पल हे एम्समध्ये तपासासाठी पाठवण्यात आले.... तपासणी किट उपलब्ध न झाल्याने विलंब झाला. गुरुवारी संच उपलब्ध झाल्यानंतर तपासणी अहवाल आला... मात्र तो जाहीर न करता ते सॅम्पल पुणे NIV कडे पाठवण्यात आले...

- पुणे येथील NIV च्या तपासणीनंतर अहवाल नंतर होणार जाहीर

- नागपुरात दोन लहान मुलाना HMPV झाल्याचा अहवाल खाजगी लॅबमधून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती...

- सारी आणि इन्फ्लुएंजा यांची लक्षणे ही याचे मी सारखेच असल्याने पाच वर्षाखालील मुले व साठ वर्षाहून अधिक रुग्णांची HMPV तपासणी केली जाणार आहे.

- एम्स बरोबर नागपूर मेडिकल कॉलेज आणि मेयो मध्ये सुद्धा एचएमपीव्ही HMPV ची तपासणी केली जाणार, तिनी प्रयोगशाळेत तपासणी किट उपलब्ध

नागपूर विमातळावर परिसरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, विजयलक्ष्मी बिदरी यांच्या सूचना

- विमानतळाच्या सुमारे दहा किलोमीटर परिसरात पाळीव प्राणी, पक्षी आदींमुळे विमानांना अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या

- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विमानतळ पर्यावरण व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली

- पशु, प्राणी व पक्षी यांचे वास्तव्य विमानतळ परिसराच्या दहा किलोमीटरमध्ये राहणार नाही

- यासाठी वनविभाग, महापालिका, मिहान तसेच स्थानिक स्वराज्य समितीद्वारे पाहणी करावी.

- या परिसरात पाळीव प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य नको, याची खबरदारी घ्यावी. यासाठी परिसरातील गावांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना

नायलॉन मांजा विक्री थांबवण्यासाठी 10 लाख रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला...

नागपूराती तहसील पोलिसांनी टिमकी परिसरातून प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आरोपी हा माल वाहक वाहनात भरून त्याच्या दुकानातून गोदामात माल नेत होता. यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. घातलेल्या नायलॉन बॉक्सचे 60 बॉक्स जप्त केले. ज्याची किंमत सुमारे 6 लाख रुपये आहे.. तेच वाहन असा मुद्देमाल जप्त केला... या कारवाईदरम्यान चालक मोहम्मद सद्दाम मोहम्मद अब्दुल यालाही अटक करण्यात आली आहे.

राजमाता जिजाऊ यांचा 427 वा जन्मोत्सव उत्साहात होणार साजरा..

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ यांचा 427 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवा पासून सिंदखेडराजा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.. जिजाऊ गाथा हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपन्न झाला या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत स्वतः गाऊन सुरवात केली ... जिजाऊ यांचा राजवाडा विद्युत रोषणाई ने नाहून निघाला असून आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच 12 जानेवारीला देशभरातून लाखो जिजाऊ भक्त शिवप्रेमी अभिवादन करण्यासाठी सिंदखेडराजा येथे येत असतात त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने सुखसोयीची व्यवस्था केली आहे...

उल्हासनगरमध्ये कारची रिक्षासह तीन गाड्यांना धडक,  कॅम्प ४ मधील सिद्धार्थ नगर रस्यावर अपघात

उल्हासनगरच्या कॅम्प ४ भागातील सिद्धार्थ नगर रस्त्यावर एका कारने रिक्षासह तीन गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक जखमी झालाय.

या रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका भरधाव कारने येऊन रिक्षासह अन्य गाड्यांना अचानकपणे जोरदार धडक दिली. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षा आणि दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून चालकाला ताब्यात घेतलं आहे. जखमी रिक्षा चालक सचिन पवार याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा कारचालक मध्यधुंद अवस्थेत भरगाव वेगाने कार चालवत होता का? याचा पोलीस तपास करत आहेत.

Washim News : वाशिममध्ये मुक मोर्चाच आयोजन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा या करिता वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मुक मोर्चा काढण्यात येणारआहे.

सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे झालेली हत्या आणि बीड जिल्ह्यात असलेला गुंडाराज संपवून सर्व सामान्य जनतेच्या मनातील भय दूर करण्याचा हेतूने या मोर्चाचे आयोजन करण्यात आल आहे.

या मोर्चाचे आयोजन सामाजिक संघटना, सर्व पक्षीय आणि सरपंच संघटना यांच्या वतीनं करण्यात आलं आहे...या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगा विराज देशमुख,संजीव भोर, दीपक केदार हे सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

Crime News : इमारतीच्या टेरेसवर व्यसन करण्यास अटकाव उल्हासनगरमध्ये दोघा भावांना मारहाण

उल्हासनगर कॅम्प 1 मधील बेवस चौक येथे खेमदास अपार्टमेंट आहे. या इमारतीच्या 301 क्रमांकाच्या सदनिकेत संतोष चव्हाण हे राहतात. त्यांची मुलं शुभम चव्हाण आणि श्रेयस चव्हाण हे त्यांच्या मित्रांना घेऊन येऊन इमारतीच्या टेरेसवर धिंगाणा घालत धूम्रपान आणि मद्यपान करतात असा इमारतीच्या रहिवाशांचा आरोप आहे. त्यामुळे इमारतीचे सेक्रेटरी पवन सेवानी आणि इतर सदस्य हे चव्हाण कुटुंबाकडे टेरेसची चावी मागण्यासाठी गेले. तेव्हा शुभम चव्हाण याने आम्ही चावी देणार नाही, ही बिल्डिंग कोणाच्या बापाची नाही, काय करायचे ते करून घ्या अशी भाषा वापरली. त्यानंतर झालेल्या वादात संतोष चव्हाण, शुभम चव्हाण, श्रेयस चव्हाण यांनी पवन सेवानी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने मारून त्यांना जखमी केले. तसेच भावाला वाचवायला गेलेल्या सनी सेवानी याच्या गालावरही धारदार वस्तूने वार केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पंकज त्रिलोकाणी यांनी जखमींना मदत केली आणि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी सुभम चव्हाण, संतोष चव्हाण, श्रेयस चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे इमारतीतील रहिवासी दहशतीच्या वातावरणात जगत आहेत.

Santosh Deshmukh case : धाराशिवमध्ये आज सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, या मोर्चासाठी संभाजी राजे छत्रपती,मनोज जरांगे पाटील ,आमदार सुरेश धस , आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार संदीप क्षीरसागर,नरेंद्र पाटील,देशमुख कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर संत गाडगेबाबा चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचे भव्यसभेत रूपांतर होणार आहे.या मोर्चासाठी मोठी तयारी करण्यात आली असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. तर वाहतूक व्यवस्था देखील बदलण्यात आली आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी

अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावरील फेरीवाल्यांवर कारवाई

अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडलं होतं. या फेरीवाल्यांवर अखेर पालिकेनं कारवाई करून महामार्ग मोकळा केलाय.

कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर साई मंदिर ते मटका चौकादरम्यान अनेक फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे बस्तान मांडलं होतं. लहान मुलांची खेळणी, शोभेच्या वस्तू, बॅग आणि छोटे मोठ्या घरगुती वस्तू असे अनेक स्टॉल लावून महामार्गावर अतिक्रमण करण्यात आलं होतं. या अतिक्रमणामुळे महामार्गावर अनेक अपघात झाले असून याबाबत नागरिक आणि वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. याच अनुषंगाने पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आणि हा महामार्ग मोकळा करण्यात आला. कल्याण बदलापुर हा राज्य महामार्ग आहे. या मार्गावर वाहनं जास्त वेगात असतात. मात्र अतिक्रमणामुळे वाहनचालकांचं लक्ष विचलीत होऊन भीषण अपघात होऊ शकतात.।हे अपघात टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी महामार्गावर अतिक्रमण करू नये, असं आव्हान पालिकेकडून करण्यात आलंय.

Agro News : लाल मिरचीच्या आगारात 90 हजार क्विंटल ओल्या मिरचीची आवक

मिरचीचा आगार म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे या भागात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतलं जातं झणझणीत तिखट अशी ओडख असलेली लाल मिरचीला मोठी मागणी आहे सध्या नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीला 90 हजार क्विंटल ची आवक झाली असून दररोज 600 ते 700 वाहनातील मिरची कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत आहेत नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 8 हजार ते 10 हजार क्विंटल ची आवक होत असून दरही चांगला मिळत आहेत मिरचीच्या कॉलिटीनुसार 2 हजार 500 ते 5 हजार रुपयांचा दर सद्या ओल्या लाल मिरचीला मिळत आहे...

Agro News : तुरीचे भाव 11 हजारांवरून सात हजारावर

गतवर्षी तुरीचे भाव दर 11 हजार 500 रुपये क्विंटल च्या घरात होती यावर्षी हे दर 7 हजार 200 क्विंटल पर्यंत खाली आले असून वर्षभरात तुरीचे दर चार हजार रुपयांनी घसरले. अलीकडच्या तीन महिन्यात हे दर साडेतीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत तुरीच्या दरात वारंवार घसरण होण्याची विविध कारणे असून त्यात लेमन तुरीची होत असलेली आयात प्रमुख कारणीभूत मानली जात असून यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Ambarnath News : अंबरनाथमध्ये रस्त्यातले विजेचे खांब हटवले! अपघातांना निमंत्रण ठरत होते विजेचे खांब

अंबरनाथमध्ये रस्त्यातले।विजेचे खांब स्थलांतरित करण्यात आलेत. हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौकादरम्यान असलेले।रस्त्यातले।खांब हटवण्यात आले असून अंबरनाथ पालिका आणि महावितरण यांनी एकत्रितपणे ही मोहीम राबवली.

हे खांब हटवण्यासाठी पालिकेच्या वतीने हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौक मार्ग बंद करण्यात आला होता. तसेच हे विजेचे खांब काढण्यासाठी वीज पुरवठाही काही काळ बंद ठेवण्यात आला होता. हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौक रस्त्याचं काँक्रीटीकरण करताना रस्त्याची रुंदी वाढल्यानं विजेचे खांब रस्त्यात आले होते. Yq खांबांमुळे अपघात होत असल्यानं ते हटवण्याची मोहीम पालिका आणि महावितरणकडून राबवण्यात आली. यासाठी वाहतूक आणि वीजपुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता. शहरात इतरही ठिकाणी असे विजेचे खांब असून ते देखील स्थलांतरित करण्याचं काम लवकरच सुरू केलं जाईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Devendra fadanvis : भंडाऱ्याच्या सुकडीत मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले पल्लवीचे पालकत्व

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईच्या निधनानंतर तेरावीच्या कार्यक्रमानिमित्त सांत्वनसाठी भंडाऱ्याच्या सुकळी या पटोलेंच्या मूळ गावी गेले होते. त्यांना भेटण्यासाठी म्हणून फडणवीस गेले असताना मुख्यमंत्र्यांचा हा दौरा एका कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यात सेंदूरवाफा येथील पल्लवी सेवकराम डोंगरवार (वय वर्ष 19) ही येथील राजीव गांधी महाविद्यालयात शिकणारी धावपटू असून तीने झारखंडच्या रांची येथे झालेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत मैदान गाजवले होते. धावण्याच्या शर्यतीत पल्लवीने ब्रॉन्झ पदक महाराष्ट्राला मिळवून दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्याच्या सुकडीत नाना पटोले यांच्या घरी सांत्वना भेटी दरम्यान तिची विचारपूस करत पाठीवर कौतुकाची थाप दिली. व महाराष्ट्रासाठी पदक जिंकले असल्याने आणखी चांगले प्रशिक्षण मिळाल्यास महाराष्ट्रासाठी चांगली कामगिरी पल्लवी करू शकते म्हणत पल्लवीचे पालकत्व महाराष्ट्र स्वीकारणार असल्याचे सांगितले.

Akola News : स्कॉर्पिओ वाहनातून गोवंश चोरीचा प्रकार

आता स्कॉर्पिओ वाहनातून गोवंश चोरीचा प्रकार समोर आलाये.. अकोल्यात चोरट्यांनी स्कॉर्पिओ वाहनातून गोवंश चोरीची शक्कल लढवत स्कॉर्पिओमधून चार गोवंश घेऊन जाताना पोलिसांनी चोरट्यांना पकडले. आरोपी सराईत गोवंश चोरटे असून त्यांनी आणखी काही गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ही कारवाई अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनी केली आहे. दरम्यान, शेख शकील शेख जलील, सैय्यद फिरोज सय्यद जहीर, सैय्यद आसिफ सैय्यद अनिस आणि मोह्म्मद मुजीब मोह्म्मद सलीम असे पकडण्यात आलेल्या चौघाची नावे आहे.

Akola : माकडांचा उच्छाद

अकोल्यातल्या पणज गावात माकडांचा उच्छाद पाहायला मिळतोये.. पणज गावात माकडांनी मागील 10 दिवसांपासून चांगलाच उच्छाद मांडला आहे. आयत्या अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या माकडांच्या फौजांनी शेकडो गावाकऱ्यांची चांगलीच पंचाईत केली आहे. माकड गावाकऱ्यांच्या घरावर धुमाकुळ घालतांना दिसून येत.. या माकडांमुळे काही घरांवरील टिन शेड खाली आले आहे.. माकडे नागरी वस्तीत घुसल्याने पणज येथील ग्रामस्थांना सळो की पळो करून सोडले आहे.. वन विभागाने तातडीने याची दखल घ्यावी अशी मागणी आता येथील गावकरी करतात.

Walmik karad news : वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता..

- वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी

- सुशीलने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक,दोन कार,परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप

navi Mumbai : नवी मुंबई मनपाच्या वतीने सर्वत्र सखोल स्वच्छता मोहीमेचे आयोजन

Ambarnath News : अंबरनाथ पालिकेतील ६२ कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली

अंबरनाथ नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या ६२ कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली करण्यात आली आहे. यातील अतिक्रमण विभागातील सर्वच्या सर्व २० कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून यापैकी १० कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली आहे.

Navi Mumbai Crime :  टास्क पूर्ण करुन पैसे कामाविण्याचे आमिष दाखवत दोघांची लाखोंची फसवणूक

व्हॉट्सअप आणि टेलिग्रामद्वारे संपर्क साधुन वेगवेगळे टास्क पूर्ण करुन पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून कोपरखैरणे मधील दोन जणांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आलेय. टास्क पूर्ण करण्यासाठी पैसे आणि टास्क पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून पुन्हा पैसे भरण्यास सांगून एकाची 31 लाखांना तर दुसऱ्याची 8 लाख 70 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेय. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आळा असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Crime News : मॅग्निज चोर पोलिसांच्या जाळ्यात गोबरवाही पोलिसांची कारवाई

भंडारा जिल्ह्याील हिरापूर हमेशा गावाजवळ नाकाबंदी करत असताना पोलिसांनी एक काळ्या रंगाची महिंद्रा गाडीविनानंबरची पकडली असूनत्या गाडीमध्ये चिखला माईन प्रतिबंधित क्षेत्रातील जंगलातून अवैधरित्या चोरी करून विनापरवाना वाहतूक करताना आरोपी आकाश नागपुरे (२४) रा. नाकाडोंगरी व आरोपी जाफर शेख (३४) रा. चिखला मिळून आल्याने त्यास विचारपूस केली असता तथा गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे २० प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ५० किलो प्रमाणे काळा दगड मॅग्नीज आढळून आले. त्या मॅग्निजची किंमत प्रति ८० किलो प्रमाणे ८० हजार व गाडीची किंमत अंदाजे २ लाख एकूण २ लाख ८० हजार असून आरोपींना विचारपूस केली असता प्लॉटवर घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने गाडीची संपूर्ण तपासणी केली असता त्यामध्ये मॅग्निज आढळल्या. मुद्देमाल व गाडी पोलीस स्टेशनला जमा करून कलम ३०३ लावून गोबरवाहीचे ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस हवालदार लंकेश्वर राघोर्ते करत आहे.

jalana News : जालना जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी वर्गात चिंतेच वातावरण

जालना तालुक्यातील उटवद आणि आसपासच्या परिसरात त्याचबरोबर भोकरदन तालुक्यातील हसनाबाद आणि आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे या परिसरातील सर्व पशुंना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण करून शेतकऱ्यांची भीती दूर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे

Solapur : 15 जानेवारी पर्यंत विठ्ठल रुक्मिणीचे आॅनलाईन बुकींग दर्शन बंद

मकर संक्रांतीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचे आॅनलाईन बुकींग दर्शन बंद करण्यात आले आहे.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्य भरातून महिला भाविक मोठ्या संख्येने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येतात. जास्तीतजास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.

आज पासून 15 जानेवारी पर्यंत आॅनलाईन बुकींग दर्शन सुवीधा बंद राहणार आहे.

weather update : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत तापमानाचा पारा घसरला

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत तापमानाचा पारा घसरला....

सपाटी भागांपेक्षा सातपुड्याच्या पर्वत रांगेत तापमानात पारा 8 अंश सेल्सिअस च्या खाली.....

काही भागात मध्य रात्री तापमानाचा पारा 7.5 अंश सेल्सअसने येतो खाली....

सातपुडा पर्वत रांगेतील काकडदा, धडगाव, मोलगी, डाब आणि तोरणमाळ परिसरात वाढला गारठा.....

गारठा वाढल्याने आदिवासी बांधवांना घ्यावा लागतोय उबदार कपडे आणि शेकोट्यांच्या आधार....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT