नांदेडच्या लोहा नगरपालिकेत भाजपकडून एकाच कुटुंबातील सहा उमेदवार
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह नातेवाईक रिंगणात
आडनाव सारखं असलं म्हणजे ते एकाच परिवारातील होत नाहीत
पालकमंत्री अतुल सावे यांचा खुलासा
ठाण्यातील वर्तक नगर परिसरात शिवसेनेच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील उपस्थित नागरिकांची मने जिंकली. विविध प्रकारची बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत
पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री झाली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात आढळून स्थानिकांना बिबट्या
वन विभागाकडून आणि टीम रेस्कूकडून बिबट्याच्या शोध सुरू
पहाटे ४ नंतर मात्र बिबट्याच्या कुठल्याही खुणा मिळून न आल्याची माहिती
थर्मल ड्रोनने घेतला जातोय शोध
महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद स्पष्टपणे नजरेस पडले. वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या वेगवेगळ्या भूमिकांबाबत चर्चा होत असताना चंद्रपुरात आमदार वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली. असे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातात, असे सांगत महाकाय मुंबई महापालिकेत महायुती होत असताना जे आवश्यक ते केले पाहिजे, असे माझे मत असल्याचे ते म्हणाले. मी मनसेविषयी नाव घेऊन बोललो नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
खाऊ आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
इचलकरंजीत एकावर गुन्हा दाखल
पोलिसांनी गुन्हा दाखल करायला विलंब केल्याने नागरिक आक्रमक
शहापूर पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा
आमदार राहुल आवडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचे निलंबन करण्याची मागणी
या परीक्षा २४ मार्च २०२६ ते ८ मे २०२६ या कालावधीत घेण्यात येणार
पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा घेतल्या जाणार
2026 मध्ये एप्रिल, मे महिन्यात आणि डिसेंबर महिन्यात अशी तीनदा सीईटी परीक्षा होणार
बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा प्रचाराचा शुभारंभ युगेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला अजित पवार गटाने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 20 लाख रुपये दिल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे
संगमनेर नगरपरिष निवडणुकीत शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. महायुती विरुद्ध सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वातील संगमनेर सेवा समिती ही स्थानिक आघाडी निवडणुकीच्या रिंगणात आहे.
आमदार तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत.. यापूर्वी सत्यजीत यांच्या आईने अनेक वर्षे संगमनेरच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.. माजी मंत्री मामा बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शहरात अनेक विकासकामे झाल्याने संगमनेरकर पुन्हा आमच्याच मागे उभे राहतील विश्वास आमदार तांबे यांनी व्यक्त केलाय..
मंगल प्रभात लोढा ज्येष्ठ नेत्यात मंत्री आहेत मात्र ते खोटे बोलत आहेत
व्हिडिओ क्लिप त्यांनी जे दिली आहे त्यामध्ये कुठेही मी धमकी देतोय असं समोर आलेले नाही
अतुल भातखळकर म्हणतात त्यांना वाटत असेल धमकी दिली नाही पण आमच्या लोकांना वाटतंय धमकी दिली आहे त्यामुळे त्यांनी माफी मागावी
अमित साटम उलट मला धमकी देत आहेत माझ्याबद्दल अपशब्द वापरत आहेत
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेला महायुतीतीलच भाजपाने मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते वाडकर यांनी भाजपा प्रवेश केला. त्यांसोबतच काही महिला कार्यकर्त्यांनी आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. भारतीय जनता पार्टी कडून शतप्रतिशत भाजप हा नारा देत आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
-लोणावळ्यात भाजपच्या प्रचार सभेत चित्रा वाघ यांचे वक्तव्य चर्चेत
-बाबांच्या नादी लागू नका… बाईच्या नादी लागा वक्तव्यावर महिलांमध्ये एकच हशा
-सुरेखा जाधव विरोधकांना उत्तर देण्यासाठी पुरेशा चित्रा वाघ यांची टिप्पणी
-घराघरात जा… केलेली कामे आणि पुढील नियोजन महिलांनी सांगावे, असा सल्ला
-आपण निवडून येणारच आहोत… मुंग्यांसारख्या घरोघरी फिरा महिलांना आवाहन
-नवऱ्यांवरही टोला नवरा नेता असला तरी घराच्या बाहेरचाच नेता असतो
-केंद्राच्या 35% महिला-केंद्रित योजनांची दिली माहिती
-खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटन प्रचारातील ओरिजिनल पंच
-नवऱ्याने स्वयंपाक करू नको सांगितलं तर समजून घ्या पार्टी आहे
-मटण कुणाचंही खा पण बटण कमळाच दाबा महिलांना घराघरात सांगण्याचे निर्देश
माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माझासह शहाजी बापू पाटील यांना नागडं केलं आणि त्याचे फोटो दुसर्यांना पाठवले अशी बोचरी टीका आमदार उत्तमराव जानकर यांनी आज सांगोल्यात केली.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये नवी राजकीय समीकरणे घडू लागले आहेत.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात उत्तम जानकर व माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोहिम सुरु केली आहे. त्याचा पहिला अंक आज सांगोल्यात पाहायला मिळाला.
मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले आहे. मालवणी अग्निशमन जवळ असणाऱ्या असलम शेख यांच्या कार्यालयावर युवा मोर्चाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येणार आहे मात्र मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आला आहे भाजपा कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले असून कार्यकर्त्यांकडून असलम शेख विरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली आहे.
हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे युती घडवण्यामागील ते अदृश्य हात म्हणजे मुख्यमंत्रीच
मुख्यमंत्र्यांनीच आम्हा दोघांना मुंबईला बोलावून चर्चा घडविली
समरजीत सिंह घाटगे यांची प्रचार सभेत कबुली
- हिंगणघाट येथे रात्रीच्या कॉर्नर सभांवर प्रचारासाठी भाजपाकडून जोर
- नगरपालिकेत प्रतिष्ठा पणाला लागल्याने आमदार समीर कुणावार उतरले प्रचाराच्या मैदानात
- कॉर्नर सभा घेऊन मतदारांना साथ घालण्याचा भाजपाचा प्रयत्न
- हिंगणघाटात भाजप,राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटात रंगतदार सामना
- आपला अजेंडा मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी छोट्या छोट्या भागातही घेण्यात येत आहे कॉर्नर सभा..
- छोट्या छोट्या कॉर्नर सभेलाही आमदार व नेत्यांची उपस्थिती...
- आष्टी शिवारात चारचाकी वाहनाची रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरटँकरला धडक
- भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी
- अमरावती येथून परत येत असताना आष्टी जवळ घडला अपघात
- जखमींना अमरावती येथील सामान्य रुग्णालयात केले दाखल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातच शिवसेनेला घरघर...सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे झालेले नुकसान हे जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांच्यामुळेच विकास शिंदे यांचे गंभीर आरोप...
नंदुरबार -
शहादा नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम पक्ष मैदानात
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर
नंदुरबार आणि शहादा येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील शहाद्यात
शहादा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साजिद पिंजारी यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा
शहादा शहरातील गरीब नवाज परिसरात सायंकाळी एमआयएमची प्रचार सभा
इम्तियाज झाली सभेतून काय आश्वासन देतील हे पाहणं महत्त्वाचं
हिंगोली -
देवेंद्र फडणवीस क्रूर माणूस
फडणवीस यांची नार्को टेस्ट करा
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं हिंगोलीत वक्तव्य
भाजपला हिंदू मुस्लिम दंगली घडवायच्या त्या शिवाय सत्ता येऊ शकत नाही अशी त्यांची मानसिकता झाली आहे
त्यामुळे त्यांचे दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
नंदुरबार -
भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहाद्यात उद्या जाहीर सभा
शहादा शहरातील ऐतिहासिक जनता चौकात सभेची जोरदार तयारी
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यात
लातूर -
सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत पवारांच्या राष्ट्रवादीचे दमदार शक्तिप्रदर्शन, अहमदपूर नगरपालिकेत प्रचाराचा भव्य शुभारंभ
अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सुरुवात करण्यात आली .
तर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅलीला काढण्यात आली यावेळीकार्यकर्त्यांचा देखील मोठा प्रतिसाद लाभलाच पाहायला मिळालं
ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या शक्तिप्रदर्शनात महिलांचा तसेच युवकांचा सहभाग होता,
सांगली -
स्मृती मानधनाच्या विवाहच्या ठिकाणी रुग्णवाहिका दाखल
अचानक पणे ऍम्ब्युलेन्स दाखल झाल्याने खळबळ
लग्न समारंभच्या ठिकाणाहून एकाला उपचारासाठी घेऊन गेले
मेडिकल इमर्जन्सी असल्याचं आले सांगण्यात
मात्र नेमका काय प्रकार घडला याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार गटाचे परळीमध्ये शक्ती प्रदर्शन
शक्ती प्रदर्शन नसून जनतेचा उद्रेक आहे
15 वर्षे यांनी जनतेवर अन्याय केला
दीपक देशमुख यांची प्रतिक्रिया.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष सचिन कदम यांनी हा प्रकार उघड करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अहिल्यानगर -
राहाता तालुक्यातील साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार
शेतात मुक्त संचार करणारा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद
बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
परिसरात आणखी बिबटे असल्याचा नागरिकांचा दावा
वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
मालेगावच्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा करावी, या मागणीसाठी उद्या अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
निषेध सभेला जिल्हाभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या निषेध सभेचे नेतृत्व महाकाली पिठाचे शक्ति महाराज करणार आहेत.
दरम्यान मालेगाव घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा करावी, अन्यथा मालेगाव येथे जाऊन आंदोलन करू, असा इशारा शक्ति महाराज यांनी दिला आहे.
खेड पंचायत समितीच्या कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार तनुजा निलेश पवार यांच्या घरासमोर काळा जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दुचाकीवर जाणाऱ्या एका इसमाने तनुजा पवार यांच्या निघोजे येथील घरासमोर काळा जादूटोणा केलेले दोन लिंबू फेकले आहेत.
दुचाकीवर आलेला तरुण तनुजा पवार यांच्या घरासमोर काळा जादूटोणा केलेल्या लिंबू फेकून पळून जात असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत.
लातूरच्या रेनापुर नगरपंचायत निवडणुकीतून ठाकरे सेनेच्या 11 उमेदवारांनी पूर्णपणे माघार घेतली आहे.
एकूण 16 पैकी 11 उमेदवारांनी माघार घेतल्याने चर्चेला उधाण आलय, तर पक्षश्रेष्ठीनीच मदत न केल्याने पक्षावर नाराजी देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीत मित्र पक्षांसोबत युती न झाल्याने उबाठा ने स्वबळाचा नारा देत नगरपंचायत निवडणूक हातात घेतली.
मात्र पक्षाकडून योग्य मार्गदर्शन आणि कुठलीच मदत मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह 11 उमेदवारांनी उमेदवारीचे फॉर्म विड्रॉल करत निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतली आहे.
साताऱ्यातील पिलानी (खालची) या गावात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.शेतात बैल चरायला घेऊन गेला असता बैलावर बिबट्याने प्राणघातक हल्ल्या केला आहे.
यामधे बैलाला गंभीर दुखापत झाली आहे.बिबट्याच्या आणि बैलाच्या झटापटीमध्ये बैलाचे एक शिंग तुटले आहे.
बैलाला गंभीर तुपात होऊन मोठा रक्तस्त्राव झाला.त्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतात काम करण्यासाठी मजूर येत नसल्याने शेतीची कामे रखडले आहेत.
त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आसनगाव मधील अनेक ठिकाणी ही बिबट्याने पाळीव कुत्रेवर हल्ला केला आहे.
त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वनविभाग आणि प्रशासनाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्कलकोट नगरीत दाखल सोलापूरच्या
- स्थानिक निवडणुकांच्या प्रचारासाठी एकाच दिवशी तीन जाहीर सभांचे आयोजन
- अक्कलकोट, मोहोळ, आणि सांगोला येथील नगरपालिका निवडणुकांसाठी जाहीर सभा घेत करणार जम्बो प्रचार
- त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
संगमनेर तालुक्यातील बोटा ते घारगाव दरम्यान सकाळपासून वाहतूक ठप्प
सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू; केवळ एकाच लेनवरून वाहतूक
वाहनचालकांनी केलेल्या दोन-तीन लेनमुळे गोंधळ वाढला
रविवारची सुट्टी आणि लग्नसराईमुळे वाहनांची प्रचंड गर्दी
वर्हाडी मंडळी, कुटुंबांना तासंतास प्रतीक्षा
कोणताही ट्रॅफिक प्लॅन नसल्याने नागरिक संतप्त
वारंवार होणाऱ्या कोंडीवर प्रशासन मौन
महामार्गावरील कोंडी थांबणार कधी हा प्रश्न.
आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक ( TET )पात्रता परीक्षा सुरू आहे पण या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून मुरगुड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. सदरच्या टोळीची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून मुरगुड पोलीस या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत.
चुटकीवाला बाबा भोंदू मांत्रिक अखेर कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात
चुटकीवाल्या बाबाचा सर्वात आधी साम टीव्हीने केला होता पर्दाफाश
चुटक्या वाजवत भूत उतरविणे, करणी करणे, आघोरी पूजा करणे आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा उद्योग सुरू केला होता भोंदू मांत्रिकाने
पूजेसाठी आलेल्या एका महिलेलाही बाबांने फुस लावून पळून नेल्याची झाली आहे तक्रार
अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देणारा चुटकीवाला मांत्रिकाच्या कोल्हापूर पोलिसांनी मुस्क्या आवळल्या
हिंगोलीच्या वसमत पालिकेसाठी भाजप मध्ये दोन उमेदवारांमध्ये अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा अखेर पक्षाच्या आदेशानंतर संपुष्टात आली आहे.
भाजप कडून दोन उमेदवारांनी एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता यामध्ये सुषमा शिवदास बोडेवार व सविता मारुती क्यातमवार यांच्या कडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता
मात्र भाजपकडून आता अधिकृत उमेदवार म्हणून सुषमा शिवदास बोडेवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने वसमत पालिकेसाठी त्यांनी प्रचार सुरू केला आहे
दरम्यान वसमत पालिकेत वीस पेक्षा जास्त नगरसेवक व भाजपचा नगराध्यक्ष विजयी होणार असल्याचा विश्वास यावेळी भाजपचे नेते शिवदास बोडेवार यांनी व्यक्त केला आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीत ज्या वार्ड मधून कमी मते पडतील त्यांची काही खैर नाही
कार्यकर्त्यांनी कमी मतं पडणाऱ्या वॉर्डवर लक्ष देऊन काम केलं पाहिजे
पूर्वीचे आपापसातील वाद मिटवून कामाला लागा कुणाचीही तक्रार येता कामा नये नाहीतर तुमची ही खैर नाही.
मी कधीही जातीभेद केलेला नाही. कोणत्याही पक्षाने अल्पसंख्यांक नेत्याला विधानपरिषदेत संधी दिली नाही राष्ट्रवादी काँग्रेसने ती दिली. आपल्याला मिळालेल्या 10 मंत्रिपदापैकी सर्व समाजाला मंत्रीपदे दिलीअजित पवार, उपमुख्यमंत्री
-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी स्वतः भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.अतुल भोसले यांच्या बरोबर बैठक घेतली होती तरी देखील साताऱ्यात महायुतीमध्ये समन्वय होऊ शकला नसल्यामुळे तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवीत आहेत. प्रत्येक पक्षाला वाटतं आपल्याला जास्त जागा असाव्यात. मात्र युती होऊ शकली नसली तरी मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढतोय. त्या बैठकीत भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे अनुपस्थित असल्यामुळे त्यांनी महायुतीची निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पुढे ढकलली होती मात्र त्यानंतर भाजपकडूनच कोणताही प्रतिसाद आला नसल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे...
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणुकीमध्ये स्थानिक भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे ह्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असताना कार्यकर्त्याला तिकीट न मिळाल्याने विरोधकांकडून टीका होत असताना मला ही तिकीट माझ्या पक्षाने माझं काम पाहून दिली आहे,मी तिकीट न मागता मला पक्षाने तिकीट दिली,मी वयाच्या 18 व्या वर्षापासूनच एबीव्हीपी च काम सुरू केलं,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सुद्धा मी काम केलं त्यानंतर मी सक्रिय राजकारणामध्ये आली,मी पक्षाची कार्यकर्ता म्हणून पक्षाने हा निर्णय घेतला, आणि पक्षाचा निर्णय हा माझ्यासाठी आदेश आहे त्यामुळे मी निवडणूक लढत आहे
भाजपाने काल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन ‘दोन्ही ठाकरे यांना सुबुद्धी दे’ अशी प्रार्थना केली होती. त्यानंतर लगेचच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समर्थक अखिल चित्रे यांनी भाजप नेते अमित साटम यांचा एक व्हिडिओ शेअर करत पलटवार केला.
चित्रेंनी ट्विटद्वारे आरोप केला की “मुंबई पोलिसांची लाज काढणारे, उत्तर भारतीयांना जीवानिशी मारण्याची धमकी देणारे, महिलांविषयी अर्वाच्य भाषा वापरणारे अशा व्यक्तीला मुंबई भाजपाध्यक्षपद देणे कितपत योग्य?” असा सवाल उपस्थित केला. तसेच “देवा, आता तूच भाजपालाही सुबुद्धी दे, नाहीतर मराठी संस्कारात वाढलेले मुंबईकरच भाजपाला वठणीवर आणतील,” अशी कडवट टीका त्यांनी केली.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे मुंबईतील राजकीय तापमान वाढले असून भाजपाकडून यावर कोणती अधिकृत प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर अनेक वर्षांपूर्वी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. अंदाजे दोन हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या बंधार्यावर शासनाने कोठ्यावधीचा खर्च केला आहे . मात्र या बंधाऱ्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. बंधाराला अनेक ठिकाणी भगदळ पडले आहे . तर अनेक दरवाजे जिर्ण झाले आहेत. तसेच काही दरवाजे चोरीला गेले आहेत . त्यामुळे या बंधाऱ्यात पाणी थांबत नाही.लाखो लेटर पाणी वाहून जात आहे.त्यामुळे संबंधीत विभागाने या कडे लक्ष देऊन उपाय योजना करावी आशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
बीडच्या वडवणी तालुक्यातील लवूळ या गावामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून जिल्ह्यातील कारखानदारांचा निषेध केला. ऊसाला 3000 रूपयांपेक्षा अधिक भाव जाहीर करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून कारखानदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्या या मागणीसाठी माजलगाव येथील परभणी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे रात्री चार चाकी स्विफ्ट गाडीने मराठा सेवक अतुल घरत यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर चार चाकी चालक फरार झाला. बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील अतुल घरत यांना रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या चारचाकी गाडीवर 'आण्णा' असा मजकुर असुन गाडीमध्ये पोलीसाची वर्दी आहे. हा घातपात असल्याचा संशय सोशल मीडियातून व्यक्त केला जात असुन फरार चालकाला अटक करण्याची मागणी होत आहे.
सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली आहे.स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी आणि माजी खासदार संजयकाका पाटलांनी नगरपरिषदेची निवडणूक लढवत असून निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडला.. यावेळी सुजात आंबेडकर यांनी तासगाव शहराच्या विकासासाठी स्थापन झालेल्या स्वाभिमानी विकास आघाडीला तासगावकर जनतेची साथ मिळेल,असा विश्वास व्यक्त केला आहे. तासगाव नगर परिषदेसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे.
मनसे नेते अमित ठाकरे हे आज नवी मुंबईतील नेरुळ येथे दाखल होणार आहेत. नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते सकाळी ११ वाजता उपस्थित राहतील. तसेच, या शिवस्मारकाचे अनावरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी ते नेरुळ पोलीस स्थानकात हजर राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेले चार महिने अनावरण झाले नव्हते. याबद्दल मनसे नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन करत या पुतळ्यावरील आवरण हटवून त्याचे अनावरण केले होते. या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे यांनी यापूर्वी नकार दिला होता आणि आपण स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून नोटीस स्वीकारू असे सांगितले होते.
ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा अकलूजच्या मोहिते पाटील यांना डिवचले आहे.
मोहिते पाटील यांनी बॅंका आणि पतसंस्था मध्ये गोरगरीब लोकांनी ठेवलेले पैसे मोडून खाल्ले.इतकच नाही तर लोकांच्या जमिनी आणि कोंबड्या ही खाल्या अशी टिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
नगर-मनमाड महामार्गावर येवल्याच्या बाभुळगाव शिवारात कार रस्त्याच्या कडेला उभी करुन फोनवर बोलत असलेल्या चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात कार चालकाचा मृत्यू झाला,पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला असून कार चालक हा धुळे जिल्ह्यातील असल्याच सांगण्यात येतय.
निकाल आधीच भाजपाचे शंभर नगरसेवक बिनविरोध होत असतील तर हे लोकशाहीसाठी धोका आहे,असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे.सांगलीच्या तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.माजी खासदार संजयकाका पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तासगाव नगर परिषदेची निवडणूक लढवली जात आहे.या निवडणुकीसाठी सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ पार पडला, यावेळी सुजात आंबेडकरांनी भाजपावर टीका करताना,निकाला आधीच 100 नगरसेवक विजय घोषित झाले आहेत,हे होत असताना विरोधकांच्या वर दबावा आणून त्यांचे अर्ज बाद करून,हे करण्यात आले आहे असून हा प्रकार लोकशाहीला धोका आणि खतरा असल्याचं सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.