Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, मनोज जरांगे पाटील, धनंजय मुंडे, पार्थ पवार राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

पुण्यातील मनसे नेते उद्या राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

पुणे शहरातील मतदार याद्यांचा पूर्ण अहवाल घेऊन मनसे नेते उद्या राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. पुण्यातील बैठकीत मनसेकडून १६५ वॉर्डपैकी अवघ्या ६० ते ६५ वॉर्ड मधील याद्या सादर केल्या होत्या.

ऑटो रिक्षाचा स्कार्पिओ चा समोरासमोर अपघातात एक जण ठार

बीडच्या माजलगावातील केसापुरीजवळ भीषण अपघात समोरासमोर धडक झाल्यानं एका तरुणाचा जागीच मृत्यू झालंय. देशमुख पेट्रोल पंपाजवळ सादोळ्याकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षाला समोरून आलेल्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली धडकेनंतर स्कॉर्पिओने ऑटो रिक्षा चालकाला तब्बल दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या भीषण घटनेत शेख अमीर इलाही या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण या घटनेत गंभीर जखमी असून त्याला प्राथमिक उपचारानंतर संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आहे.. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे… या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे…

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कामशेत येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कामशेत-खडकाळा गटातून दिपाली दीपक हुलावळे यांची जिल्हा परिषद उमेदवार म्हणून घोषणा केली.

पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी फरार आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी कोथरूड भागात झालेल्या गोळीबारात तो आरोपी होता. त्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वाघ हा निलेश घायवळ टोळीचा सदस्य असल्याची माहिती असून १८ सप्टेंबर रोजी कोथरूड मध्ये एका व्यक्तीवर झालेल्या गोळीबारात त्याचा सहभाग होता. पोलिसांना गुंगारा देऊन तो गायब होता

अमरावती जिल्ह्यात 10 नगरपरिषदासह दोन नगरपंचायतीची निवडणूक

अमरावती जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून प्रशासराज असल्याने बहुप्रतिक्षित असलेल्या दहा नगरपरिषदासह दोन नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे, त्यासाठी राजकीय वातावरण चांगलेच तापला आहे, उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, या निवडणुकीत 155 प्रभागातून 278 सदस्य आणि 12 नगराध्यक्ष निवडल्या जातील, याममध्ये 141 महिला सदस्य आहेत, सध्या तरी सर्वच राजकीय पक्षातर्फे एकला चलो चा नारा दिला गेला आहे... सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक नगरसेवक आणी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या आहे... उद्यापासून मात्र आता अमरावती जिल्ह्यात स्थानिक तहसील कार्यालयात उमेदवारी उचल आणि भरण्यासाठी मोठी लगबग असणार आहे.

वाळूच्या ट्रॅक्टरनं सायकलस्वार मजुराला चिरडलं.

वाळूचं अवैध उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रॅक्टरनं मजुरीसाठी जाणाऱ्या सायकलस्वार मजुराला चिरडलं. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मीटेवानी इथं आज सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. अनिल बांगडे (28) असं मृत सायकलस्वाराचं नावं आहे. मृतक अनिल हा साखळी या गावातील असून तो सकाळी आपल्या सायकलने मजुरीसाठी तुमसर शहराकडे निघाला असताना पाठीमागून आलेल्या वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने त्याला चिरडलं. यानंतर सदर अपघातग्रस्त ट्रॅक्टरसह चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

धाराशिवच्या भूम तालुक्यातील हांडोग्री येथील 300 एकर डोंगराळ जमिनीवर सव्वा लाख झाडांची लागवड

धाराशिवच्या दुष्काळी भागात, तीनशे एकर डोंगरातील खडकाळ जमिनीवर तब्बल सव्वा लाख झाडांची लागवड करण्यात आली.यामध्ये जवळपास 50 हजार दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींचाही समावेश आहे.बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर यांनी या ठिकाणी इकोव्हिलेज साकारत ध्यानकेंद्र , वाचनालय आयुर्वेदिक रुग्णालय उभा केले.आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना या ध्यान केंद्रातून एक मानसिक आधार दिला जात आहे.गेल्या पाच ते सहा वर्षाच्या कालखंडात डोंगराळ भागात ही देशी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतलीय

आयकर चोरीच्या संशयावरून 1050 पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस

बुलढाणा जिल्हा पोलीस दलात आयकर विभागाच्या नोटिसांमुळे खळबळ उडाली आहे तब्बल 1050 पोलीस अंमलदारांना गेल्या तीन ते चार वर्षात आयकर रिटर्न्स मध्ये बोगस कपाती दाखवून कर चोरी करण्याच्या संशयावरून नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत आयकर विभागाने पोलीस अधीक्षक कार्यालयालाच नोटीस बजावली आहे. त्यामुळे बुलढाणा पोलीस दलात खळबळ उडाली आहे...

nashik-nifad-बिबट्याची दहशत सीसीटिव्ही मध्ये कैद

कोठुरे शिवारातील शेतकरी बापू निवृत्ती मोरे यांच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास बिबट्याने दोन पाळीव कुत्र्यांना आपले भक्ष्य केले असून,वस्तीवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याची दहशत कैद झाली आहे,दरम्यान वनविभावाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

धुळ्यात तापमानाचा पारा घसरला, धुळ्यामध्ये 8.6° सेल्सिअस तापमानाची नोंद आली करण्यात

सलग दुसऱ्या दिवशी धुळ्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे, आज धुळ्यामध्ये 8.6° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, या वर्षातील हे सर्वात नीचांकी तापमान मानले जात आहे.या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा हळूहळू घसरताना दिसून येत असून, या वाढत्या थंडीचा परिणाम धुळेकरांवर बघावयास मिळत आहे, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी वाऱ्यांमुळे तापमानामध्ये सध्या प्रचंड गारवा वाढला असून, यामुळेच धुळ्याचा तापमानाचा पारा घसरला असल्याचे दिसून येत आहे, यापुढे देखील तापमानामध्ये अशाच प्रकारे घट धुळ्यात बघावयास मिळणार असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

रायगडकरांना गुलाबी थंडीची चाहूल

रायगडकराना आता गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसांपासून हवेतील गारवा वाढला आहे. त्यामुळे तापमान 20 अंशाच्या खाली जात आहे. ग्रामीण भागात तापमानाचा पारा घसरल्याने संध्याकाळच्या वेळेसही थंड वातावरण असते. दिवसभर जाणवणारे कडक उन्हाचे चटके देखील कमी झाले आहेत. पहाटे पासूनच सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळते.

लोणावळा नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार

मावळ भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे मावळ विधानसभेच्या स्तरावर युती झाली पाहिजे युती फक्त एकट्या नगरपालिके करता होणार नाही ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे, मात्र राष्ट्रवादी कडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही....

यवतमाळ पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडे सात अर्ज

यवतमाळ नगर परिषदेच्या 29 प्रभागांसाठी भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांची गर्दी यावेळी बघायला मिळाली, विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मधीलही अनेकांनी उमेदवारी अर्ज केले. अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी देखील सात महिलांचे अर्ज आले.पक्ष नेत्यांनी उमेदवारी देताना सर्व्हे करून नावे निश्चित केली असली तरी उमेदवारी लोकशाही मार्गाने ठरवित असल्याचे भाजपने सांगितले.

भूम, परंडा नगरपरिषदेत आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र

भाजप,शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी आमदार तानाजी सावंतांविरोधात एकत्र नगरपरिषद निवडणूक आखाड्यात उतरणार ?

आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात रणनीतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

मी एकला चलो रे चा नारा दिला नाही, मोठ्या पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता एकला चलो रे चा नारा दिला, त्यामुळे आम्हीही कुठे गाफील नाहीत, सर्व जागा लढवण्याची आमची तयारी

भाजप, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी , काँग्रेस सर्व एकत्र येत आहेत, त्यातच आजच आमचा विजय

विरोधक एकवटताच आमदार तानाजी सावंताकडून बैठकांचा सपाटा

पनवेल महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक दृष्टीने शिवसेना भाजपची बैठक

कर्जत पनवेल आणि उरण मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लागलेल्या आहेत त्या दृष्टीने मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात बैठक पार पडली. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत दृष्टीने दोघांमध्ये चर्चा करण्यात आली या वेळेला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना-भाजप समन्वय साधून युती केली जाईल असे दोन्ही नेत्यांनी सांगितलं.

रायगड जिल्ह्यातील 'काशीद बीच' येथे अकोला जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा समुद्रात बुडून मृत्यू

अकोला येथील एका क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असे फिरण्याकरिता रायगड जिल्ह्यातील काशिद बीच येथे गेले होते. त्यातील 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असे पाण्यात बुडाले असल्याचे समजतं आहे. त्यापैकी 1 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहेत. तर एक विद्यार्थी सुखरूप आहे.

 मुंबई पुणे एक्सप्रेसवर बर्निंग ट्रकचा थरार 

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बर्निंग ट्रकचा थरार पहायला मिळाला.  खोपोली जवळ बोरघाटात ही घटना घडली आहे.  सौंदर्य प्रसाधने, कटलरी घेऊन हा ट्रक पुण्याकडे निघाला होता.  शॉर्टसर्किट मुळे ट्रकमध्ये आग लागली. आणि आतील साहित्याने पेट घेतला.  आयआरबीच्या अग्निशमन दलाने आग विझवली आहे.  ट्रक बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

PANVEL : पनवेल महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक दृष्टीने शिवसेना भाजपची बैठक

पनवेल महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक दृष्टीने शिवसेना भाजपची बैठक 

कर्जत पनवेल आणि उरण मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लागलेल्या आहेत त्या दृष्टीने मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात बैठक पार पडली 

तसेच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत दृष्टीने दोघांमध्ये चर्चा करण्यात आली या वेळेला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते 

शिवसेना-भाजप समन्वय साधून युती केली जाईल असे दोन्ही नेत्यांनी सांगितलं

PUNE -पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन डिसेंबरपासून पुणे ते अबू धाबी ही विमानसेवा सुरू होणार आहे

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन डिसेंबरपासून पुणे ते अबू धाबी ही विमानसेवा सुरू होणार आहे

एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीने शनिवारी या हवाई मार्गाबाबत शनिवारी घोषणा केली

पुणे विमानतळावरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पुणे ते अबू धाबी विमान उड्डाण होणार आहे

पुण्यातून रात्री ८.५० वाजता विमानाचे उड्डाण होईल आणि अबू धाबी येथे रात्री १०.४५ वाजता पोहोचेल


परतीच्या प्रवासात, विमान रात्री ११.४५ वाजता अबू धाबीहून निघेल आणि पहाटे ४.१५ वाजता पुण्यात उतरेल


असे एअर इंडियाने एक्सप्रेस कंपनीने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे

PUNE-गुलाबी थंडीला सुरुवात! पुणे शहरात गारठा वाढला

गुलाबी थंडीला सुरुवात! पुणे शहरात गारठा वाढला

पुणे शहरातील अनेक भागात धुक्याची चादर

पुण्यासह ग्रामीण भागात सुद्धा थंडी सुरू 

सकाळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुक दिसून येत आहे 

गेल्या २,३ दिवसांपासून रात्रीही गारठा वाढू लागला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आजीसोबत झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण; बलात्कार करून रक्ताच्या थारोळ्यात सोडलं, भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल

Shocking News : कर्ज न फेडल्यामुळे एजंटने मर्यादा ओलांडल्या, कर्जदाराच्या पत्नीचे 'तसले' फोटो केले व्हायरल

Indurikar Maharaj Net Worth: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांची संपत्ती किती? जाणून घ्या

जगप्रसिद्ध ‘द ग्रेट ब्रिटिश बेकिंग शो'च्या एडिटरचे निधन; वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

Gallbladder Problems: 'ही' 4 लक्षणं दिसली तर समजा पित्ताशयात झालेत खडे; 99% लोकं करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT