Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : 'सिरप' प्रवर्गातील औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन- चिट्ठी शिवाय विक्री करू नये

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन, मेट्रो ३ पूर्णपणे सुरू होणार, कोर्टात शिवसेना अन् धनुष्यबाण यावर सुनावणी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

अपहरण केलेल्या दीड वर्षाच्या बालकाची 24 तासात सुखरूप सुटका

नांदेड शहरातील पीरबुऱ्हाण नगर येथून एका दीड वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आले होते. पिरबुऱ्हाण नगर येथील एका मस्जिदी बाहेरून दोन आरोपींनी या बालकाचे अपहरण केले होते.. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि भाग्यनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पल्सर गाडीवर आलेल्या दोन युवकांनी त्या बालकाला पळवले होते. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बाळाची सुखरूप सुटका केली. 27 वर्षीय मोहम्मद अमीर आणि त्याचा मित्र मोहम्मद इस्माईल या दोघांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आज अटक केली.त्या बाळाची सुखरूप सुटका केली.मोहम्मद आमीर हा गवंडी काम करतो .. त्याचा मित्र मोहम्मद इस्माईल हा सराईत गुन्हेगार आहे .. हे दोघे नांदेड शहरातील खुदबई नगर येथील राहीवाशी आहेत ... त्यांनी या बालकाचे अपहरण का केले होते याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.या प्रकरणाचा तातडीने तपास केल्या बद्दल पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी भाग्यनगर पोलिसांना दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलें .

आसलगाव जिल्हा परिषद शाळेत जपली जाते भुलाबाई उत्सवाची संस्कृती

महाराष्ट्रामध्ये अनेक जुन्या परंपरा, संस्कृती लोप पावत चालल्या आहेत.. त्यातीलच एक उत्सव म्हणजे भुलाबाई.. भुलाबाई उत्सवाची परंपरा आजही ग्रामीण भागामध्ये जपली जात आहे.. भुलाबाई उत्सव हा विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील महिला मुलींचा एक पारंपरिक सण आहे, जो भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो, या उत्सवात भुलाबाई ही पाहुणी म्हणून एका घरात येते आणि या काळात टिपऱ्या खेळणे, पारंपरिक गाणी म्हणणे व प्रसाद वाटणे असे कार्यक्रम केले जातात.. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक वर्षापासून ही परंपरा जपली जात आहे, याही वेळी शाळेतील सर्व शिक्षीकांनी सहभागी होत उत्सव साजरा केला, दप्तरमुक्त शाळा या विशेष उपक्रमांतर्गत साजरा करण्यात आलेल्या पारंपरिक कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळाला...

दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळ स्वस्त

हरभरा डाळीच्या दरात घट झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात किलोमागे 15 ते 20 रुपयांची घट झाली आहे

-गेल्या वर्षी घाऊक बाजारात एक किलो हरभरा डाळीसाठी 85 ते 94 रुपये दर होता तर किरकोळ बाजारात 100 रुपये किलो इतका दर होता

-यंदा हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दरात किलोमागे 15 ते 20 रुपयांची घट झाली आहे

-सध्या हरभरा डाळीचा दर प्रतवारीनुसार 72 ते 75 रुपये प्रतिकिलो आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षा संदर्भात माहिती मागणाऱ्या याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय राखून ठेवला

- लालन किशोर सिंग यांनी ही याचिका दाखल केली असून कोर्टासमोर अंतिम सुनावणी पार पडली

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कशाच्या आधारावर सुरक्षा पुरविले जाते आणि या सुरक्षा व्यवस्थेवर किती खर्च होतो याची माहिती मागणाऱ्या याचिकेवरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने राखून ठेवला

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कायद्यानुसार नोंदणी झालेली नाही त्यामुळे त्यांना सार्वजनिक निधीतून सुरक्षा पुरविली जाऊ शकत नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे

- याचिकाकर्ते लालन किशोर सिंग यांनी 30 सप्टेंबर 2021 रोजी गृह विभागाला आरटीआय अंतर्गत अर्ज सादर करून ही माहिती मागितली होती

- विशेष शाखा पोलीस उपायुक्तांनी या संदर्भात माहिती दिली जाऊ शकत नसल्याचे सिंग यांना कळविले

- त्यानंतर प्रथम व द्वितीय अपीलामध्ये त्यांची मागणी मंजूर झाली नाही

- त्यानंतर सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली

शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण जस्टीस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर आज 16 नंबरला लागलेले असल्याने ते प्रकरण सुनावणीसाठी रिच होणार हे नक्की परंतु एका इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बेंचचे सुद्धा जस्टीस सूर्यकांत सदस्य न्यायाधीश आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का असे प्रश्नचिन्ह आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यातर्फे असे प्रयत्न होतीलच की सुनावणी पुढे ढकलली जावी.
असीम सरोदे

तब्बल सहा तासानंतर उतरल्यात झाडावर चढलेल्या महिला...जिल्हा प्रशासनाच लेखी आश्वासन

40 वर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या पूर्ण व्हाव्या, यासाठी कालपासून भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्तांनी आरपारची लढाई आंदोलन सुरू केलं आहे. काल दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजताच्या सुमारास तीन महिला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालया समोरील कडुनिंबाच्या झाडावर चढल्यात. यामुळं पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची चांगलीचं तारांबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पुनर्वसन मंत्री त्यांच्याशी तातडीची बैठक लावून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण कराव्या ही मागणी रेटून धरण्यात आली. जिल्हाधिकारी सावन कुमार, अप्पर जिल्हाधिकारी (पुनर्वसन) लीना फडके यांनी आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करून यावर तातडीनं बैठक लावण्याचं आश्वासन देत उद्या सर्व प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक लावण्याचं लेखी आश्वासन दिलं आणि तब्बल सहा तासानंतर झाडावर चढलेल्या महिला झाडावरून खाली उतरल्यात.

यवतमाळ जिल्ह्यात ई-केवायसीच्या नावाने लाडक्या बहिणींची फरफट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या 52.हजार 110 लाभार्थ्यांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली यामध्ये 3 हजार 500 लाभार्थी लाडक्या बहिणी 65 वर्षावरील आणि एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक असल्याचे उघडकीस आले यातून 48 हजार 500 हून अधिक महिला पात्र ठरल्या आहेत असे असले तरी त्या पात्र महिलांना गेल्या तीन हप्त्यांपासून वंचित राहावे लागत आहे. आता ई- केवायसीच्या नावाने महिलांची पुन्हा फरफट होत असल्याचे चित्र यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळते.

'सिरप' प्रवर्गातील औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन- चिट्ठी शिवाय विक्री करू नये

- राज्य अन्न व औषधी विभागाची सर्व किरकोळ औषधी विक्रेत्यांस सूचना

- कफ सिरप मुळे मध्य प्रदेशातील बालकांच्या झालेल्या मृत्यूनंतर राज्य अन्न व औषध विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

- बाल रुग्णांसाठी 'सिरप' प्रवर्गातील औषधे डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विक्री केल्यास कठोर कारवाईचा अन्न व औषध विभागाचा इशारा

- औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम 1945 अंतर्गत अनुसूची एच,अनुसूची एच-1 आणि अनुसूची एक्स या औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन वरच करण्याच्या सूचना

अमरावती येथील VMV कॉलेजमध्ये परीक्षा फॉर्म प्रक्रियेत गोंधळ; विद्यार्थ्यांचा संताप

अमरावती जिल्ह्यातील ब्रिटिश कालीन शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (VMV College) येथे परीक्षा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत सुरू असलेल्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. प्रशासनाकडे तक्रारी करूनही तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत महाविद्यालयात आंदोलन केले आहे.

प्राध्यापक शिवानंद कुमार यांनी परीक्षा फॉर्म बाबत जाब विचारणाऱ्या नाराज विद्यार्थ्यांना “संस्था सोडा” असे म्हटल्याच आणि एका विद्यार्थ्याचा मोबाईल जप्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी संचालक सतीश मालोडे उपस्थित असल्याचे सांगितले जाते.

विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळापत्रक, ऑनलाइन फॉर्म पोर्टल आणि पारदर्शक प्रक्रिया यांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भंडारा जिल्ह्यात तुडतुडा रोगानं भातपीक फस्त....भातपीक नष्ट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त

शेतकरी यावर्षी अस्मानी आणि नैसर्गिक संकटात सापडलाय. अतिवृष्टीने हजारो हेक्टरमधील कापणीयोग्य भातपीक वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसात जमीनदोस्त झालं. त्यानंतरं आता तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेकडो हेक्टरमधील भातपीक हा रोग फस्त करीत आहेत. महागडी औषध फवारणी केल्यानंतरही भातपीक वाचविण्यात शेतकरी यशस्वी ठरताना दिसत नाही. त्यामुळं अगोदर अतिवृष्टी आणि आता तुडतुडा रोगाच्या प्रादुर्भानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि नैसर्गिक संकटात सापडा आहे.

कडवी बाजारात मनपा आयुक्तांची धडक कारवाई — चार ट्रक प्लॅस्टिकचा साठा जप्त

प्लॅस्टिकमुक्त अमरावतीसाठी महानगरपालिका प्रशासनाने मोठी कारवाई करत कडवी बाजार परिसरातून बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा तब्बल चार ट्रक साठा जप्त केला आहे.

ही मोहीम नवनियुक्त महापालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक व सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. अतिक्रमण व स्वच्छता विभागाच्या संयुक्त पथकाने ही तपासणी मोहीम केली.

तपासणीदरम्यान व्यापाऱ्यांकडे बंदी घातलेल्या पिशव्या, कप, प्लेट्स आणि अन्य प्लॅस्टिक साहित्य आढळले. पूर्वसूचना देऊनही वापर सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध मनपाने कठोर कारवाई केली आहे.

वाशिम एसडीपीओच्या पथकाची गावठी दारु विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई

वाशीमच्या मालेगांव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे वेगवेगळ्या ठिकाणी गावठी दारू विक्री करणाऱ्यावर एसडीपीओच्या पथकाने छापे टाकून कारवाई केली. या कारवाई 1 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त करत 5 जणांवर पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाशीम एसडीपीओ नवदीप अग्रवाल यांना मिळालेल्या माहितीनुसार मालेगांव पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरकिन्हीं येथे 5 ठिकाणी छापा टाकण्यात आला. यात मोहमाचं हातभट्टी दारू, सडवा बाळगणारे आणि विक्री करतांना मिळून आले. याप्रकरणी मिळून आलेली हातभट्टी दारू 105 लिटर, 855 लिटर मोहमाचा सडवा ,1 मोबाईल ,1 मोटर सायकल असा 1लाख 68 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.तसेच गावठी हातभट्टी दारु आणि मोहामाच सडवा बाळगणारे आणि विक्री करणाऱ्या आरोपी 5 आरोपी विरुद्ध मालेगांव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलं आहे. ही कारवाई एसडीपीओ नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दिनेश शिरेकार आणि त्यांच्या पथकाने केली.

गौतमी पाटील ने धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस

८ दिवसानंतर सुद्धा गौतमी पाटील ने पोलिसांकडे जबाब नोंदवला नाही

१ तारखेला हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली असताना सुद्धा गौतमी पाटील उपस्थितीत नाही

पोलिसांचा आदेश झुगारुन गौतमी पाटील चे "शो" दणक्यात सुरू

गौतमी पाटील ला कोणाची भीती वाटते? पोलिसांकडे हजर राहायला सुद्धा गौतमी पाटील ने टाळलं

ई-केवायसीसाठी सूचनेनंतरही रेशन कार्डधारकांची गैरहजेरी

यवतमाळ जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कुटुंबांनाही ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतर या रेशन कार्डधारकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा रेशनकार्डधारकांचे धान्य बंद करण्याच्या सूचना होत्या तूर्त या प्रक्रियेत राशनकार्डला ई-केवायसी करण्याची वाढीव मुदत नसली तरी अपडेशन प्रक्रिया सुरू आहे मात्र पुढील काळात अशा रेशन कार्डधारकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

पंधरा दिवस सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता

22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने सुरुवात झालेला श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची आश्विन पौर्णिमेच्या विविध कार्यक्रमाने सांगता करण्यात आलीय.पंधरा दिवस सुरू असलेल्या महोत्सवानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली. सोलापूर येथील मानाच्या काट्या आल्यानंतर मंदीर संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले तर राञी उशीरा मानाच्या काठ्यासह तुळजाभवानी मातेचा छबिना करण्यात आला आणि परंपरेचा जोगवा मागून या महोत्सवाची सांगता करण्यात आली.यावेळी मंदिरात लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

मिरजेत दोन गटात राडा. धार्मिक भावना दुखावनारे वक्तव्य प्रकरणी एकास अटक

सांगली जिल्ह्यातील मिरज येते मुस्लिम समाजाच्या भावना दुखानारे वक्तव्य करणाऱ्या 16 वर्षीय मुलाला पोलिसांनी तात्काळ अटक करून कारवाई केली आहे.

या घटनेने मिरज येथील शास्त्री चौक येते जमाव जमला होता..याच दरम्यान राजकीय पुढाऱ्यांचे ही फलक फाडले गेले आहेत.काहीजण भावना दुखावणार्या मुलाच्या घरावर चाल करून गेले होतें. वेळीच पोलिसांनी धाव घेऊन जमाव पांगवला ,पोलीस स्टेशन आवारात समाजाकडून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जमावाला शांत करत ..कारवाई सुरू असल्याची माहिती दिली.सद्या तनाव पूर्ण निवळला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्घाटन.

ज्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणार असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. 

मात्र उद्या उद्घाटन तरी देखील निमंत्रण पत्रिकेवरती विमानतळाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख. 

दिबा पाटील यांच्या नावाचं कुठेही उल्लेख नाही. 

विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी अनेक भूमिपुत्रांनी केले होते आंदोलन

महायुतीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींसाठी रणनीती ठरली…

महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर  समिती निर्माण करणार 

या समितीत पालकमंत्री व दोन्ही पक्षांचे नेते असणार, सोबतच जिल्ह्यातील आमदार व इतर ही असणार…

जिल्हा पातळीवरील समिती पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील निवडणुकींच्या अनुषंगाने अहवाल तयार करणार…

या अहवालात जिल्ह्यातील परिस्थिती, महायुती आणि महायुतीअंतर्गत असलेल्या पक्षाची ताकद आणि परिस्थिती याचा ही आढावा असणार 

तसेच ज्या जिल्ह्यात महायुती अंतर्गत वादाची सविस्तर माहिती मांडणार 

हा संपूर्ण अहवाल, आढावा जिल्हा समन्वय समिती राज्य समिती समोर पुढील आठ दिवसात मांडणार 

राज्य सरकारकडे अहवाल आल्यानंतर ज्या ठिकाणी वाद असतील त्या ठिकाणचे निर्णय महायुतीचे मुख्य नेते घेतील 

कोणत्याही ठिकाणी जाहीरपणे तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी राज्य समन्वय समितीकडून घेतली जाईल…

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई मेट्रो ३ आज पूर्णपणे सुरू होणार आहे. मोदी काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठा बदल! टेलिग्रामप्रमाणे युजरनेम फीचर येणार

Nashik Crime News: मायलेकाच्या नात्याला काळिमा! मुलाने अंथरुणाला खिळलेल्या आईचा केला खून

Mumbai One : महामुंबईची सफर आजपासून एकाच तिकिटावर; मेट्रो, बस ते लोकलसाठी एकच तिकिट

Chakli Recipe : भाजणी नीट जमत नाही? मग पोह्यांपासून बनवा अवघ्या १० मिनिटांत कुरकुरीत चकली

'Bigg Boss 19' च्या घरात तान्या मित्तल ढसाढसा रडली, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT