Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: वंजारी समाजाच्या ST प्रवर्गातील आरक्षणाच्या मुद्द्यांवरून युवकाची आत्महत्या

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Ahilyanagar: वंजारी समाजाच्या ST प्रवर्गातील आरक्षणाच्या मुद्द्यांवरून युवकाची आत्महत्या

अहिल्यानगर -

वंजारी समाजाच्या ST प्रवर्गातील आरक्षणाच्या मुद्द्यांवरून युवकाची आत्महत्या?

अमोल दौंड 22 वर्षीय आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव...

गळफास घेऊन अमोलने संपवले जीवन...

अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील कोणोशी गावातील घटना...

अमोल दौंड हा वाडगाव थाटे येथे सुरू असलेल्या उपोषण आंदोलनात होता सक्रिय सहभागी...

वंजारी आरक्षणाच्या मुद्द्यावरच आत्महत्या केल्याचा गावकऱ्यांचा दावा...

Washim: वाशिमच्या मेडशीजवळ ट्रकला भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही 

वाशिमच्या मेडशीजवळ ट्रकला अपघात

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

ट्रक डिव्हायडरवर चढला

चालक आणि क्लिनर सुखरूप बचावले

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

अहिल्यानगर-

अहिल्यानगर मध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

महापालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पार पडणार सभा

सभेला पोलिसांनी अटी आणि शर्ती घालून दिली परवानगी

Nashik: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

नाशिक -

- काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार उद्या भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक

- उत्तर महाराष्ट्रमधील पाच ही जिल्ह्याचे पदाधिकारी नेते राहणार उपस्थित

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा घेतला जाणार

- मुख्यमंत्री पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार ,याकडे लक्ष

Pune: संपूर्ण राज्यभरातील एटीएसचे अधिकारी कोंढव्यामध्ये तैनात

पुणे -

संपूर्ण राज्यभरातील एटीएसचे अधिकारी कोंढव्यामध्ये तैनात

अधिकाऱ्यांनी काही मोबाईलचे सिम कार्ड व लॅपटॉप ताब्यात घेतल्याची माहिती

आतंकवाद्याशी संबंधित असल्याची माहिती समोर

Kolhapur: कोल्हापुरातील बड्या उद्योगपतीच्या घरावर आयकर विभागाचा छापा

कोल्हापूर -

कोल्हापूर स्थित बड्या उद्योगपतीच्या घरावर आयकर विभागाचा छापा

काल सकाळ पासून सुरु आहे घरातील कागदपत्रांची तपासणी

कोल्हापुरात आयकर विभागाने बन्सल नामक उद्योगपती वर छापा टाकला आहे

Amravati: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या 

अमरावती -

धक्कादायक प्रियकरासोबत मिळून आईनेच केली प्रेम संबधात अडसर ठरणाऱ्या आपल्या मुलाची हत्या

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील धक्कादायक घटना

आरोपी आई व तिच्या प्रियकराला पोलिसांनी केली अटक

प्रेम संबधाची कुरकुर मुलाला लागल्याने आपल्या मुलाची केली हत्या

Pune: पंचायत समिती सभापतिपदासाठी आज आरक्षण सोडत

पुणे-

पंचायत समिती सभापतिपदासाठी आज आरक्षण सोडत

पुणे जिल्हा परिषदेंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सभापतिपदांची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होईल.

सभापतिपदासाठीची सोडत अडीच वर्षे कालावधीसाठी असणार आहे

अशी माहिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक विभागाच्या जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. चारुशीला देशमुख- मोहिते यांनी दिली.

Pune: कोंढव्यात रात्रीपासून ATS चे सर्च ऑपरेशन सुरू

पुणे -

कोंढव्यात रात्रीपासून ATS चे सर्च ऑपरेशन सुरू

काही संशयित ताब्यात घेतल्याची माहिती

जवळपास ३५० पुणे पोलिस आणि ATS चे कर्मचारी, अधिकारी आहेत

Nashik: नाशिकमध्ये आज काँग्रेसच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीचे आयोजन

नाशिक -

- नाशिकमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीचे आयोजन

- काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्राचे प्रभारी बीएम संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक

- बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा निहाय आढावा घेतला जाणार आढावा

- बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी, नेते आणि पदाधिकारी राहणार उपस्थित

Pune: पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

पुणे -

पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

शनिवार पासून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार

दिवाळी निमित्त मध्यवर्ती भागात खरेदी करण्यासाठी मोठी वर्दळ होते

त्यामुळे भिडे पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो

त्यामुळे दिवाळी संपेपर्यंत पूल खुला असणार आहे

तो पर्यंत पादचारी पुलासाठी पुणे मेट्रोचे सुरू असलेले काम बंद राहणार आहे

Mumbai:  मुंबईमध्ये आलिशान कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी 

मुंबईमध्ये आलिशान कारचा भीषण अपघात

पश्चिम द्रुतगती महामार्गावर पहाटे भीषण अपघात

पोर्शे कारचा चुराडा

तरुण चालक गंभीर जखमी

Dharashiv: भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आरपीआयची मागणी 

धाराशिव -

सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी

पनवेल ग्रामीण भाग अंधारात .. . 20 तासांपासून वीजपुरवठा खंडित

पनवेलच्या ग्रामीण भागात गेल्या 20 तासांपासून वीज प्रवाह खंडित झाला आहे. नेरे, नेरेपाडा, धोदाणी, वाजे, मालडुंगे यांसारखी जवळपास 40 गावे अंधारात आहेत.

वीज वितरण कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्ली उपकेंद्रातील 22 केवी एचटी केबलमध्ये फॉल्ट झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी लोड डाइवर्ट करून रात्रीच पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.

दरम्यान, 2.5 किमी लांबीच्या केबलमध्ये फॉल्ट ओळखल्यानंतर त्याची दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उर्वरित गावांमध्ये काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्रांमधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम नियोजनानुसार मंगळवार दिनांक ०७ ऑक्टोबर , बुधवार दिनांक ०८ ऑक्टोबर व गुरुवार दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी दररोज दुपारी १२.३० ते ०३.३० वाजेपर्यंत म्हणजेच अडीच तास केले जाणार होते. त्यापैकी मंगळवार व बुधवारी नियोजित कामकाज सफलतापूर्वक पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, गुरुवार दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी महावितरण कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सदर कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे.

त्यामुळे मुंबई शहर विभागातील ए , बी , एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच पूर्व उपनगरातील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील व पूर्व उपनगरातील एल विभाग (कुर्ला पूर्व ), एन विभागात, विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रातील यापूर्वी प्रस्तावित केलेली १० टक्के पाणीकपात रद्द करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे.

सांगली सह मिरजेला पाच दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे

सांगली मिरज सह उपनगरात परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. गेल्या पाच दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा रात्री जोरदार कमबॅक केले आहे. या पावसामुळे बाजारपेठ आणि सकल भागात पाणी शिरले आहे.. शेतकरी आतासा कुठे सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीतुन सावरत असताना पुन्हा पावसाने दैना उडवली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पुढे मोठे संकट उभे राहिले आहे. तर या पावसाने काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले होते.

कल्याणमध्ये धक्कादायक घटना, दोन मुलांना हात बांधून सुरक्षा रक्षकाकडून मारहाण

पलावा कासा बेला गोल्ड या हाय प्रोफाईल सोसायटीत धक्कादायक प्रकार

मुले खेळत असताना बॉल इमारतीत गेला या रागातून दोन मुलांना हात बांधून सुरक्षा रक्षकाकडून मारहाण

पालकांनी जाब विचारला असता सुरक्षा रक्षकाकडून मुजोरी

मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याला मानपाडा पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

SCROLL FOR NEXT