महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : मान्सून पाऊस,हवामानाचा इशारा राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Bharat Jadhav

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा थोड्याच वेळा पार पडणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनावरण सोहळा पार पडत आहे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक

सोहळा राज्यात पार पडत आहे

त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे

नाशिकमध्ये राजकारण तापलं; गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम

गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम

काल दिवसभर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याकडून गोकुळ गीते यांच्या मन धरणीचा प्रयत्न

मात्र गोकुळ गीते यांनी दोन्ही नेत्यांची भेट टाळली

लवकरच तोडगा काढून, उदय सामंत यांना विश्वास

सोलापुरात पोलिसांची मोठी कारवाई; छत्तीसगडमधून आणलेला तब्बल ३६ किलो २७० ग्रॅम गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची बोरामणी परिसरात मोठी कारवाई

७ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

गांजासह दोन मोबाईल फोन पोलिसांच्या ताब्यात

हैदराबाद–सोलापूर महामार्गावरील हॉटेल वैष्णवी परिसरात सापळा

गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाची धडक कारवाई

वैभव नाईकांच्या घरी एसीबीचं पथक दाखल

माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे.

Cockroach Janata Party : अभिजित दिपके यांना दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी मिळाली

कॉकरच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात दाखल

अभिजित दिपके यांना दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी मिळाली

दिल्लीत करणार आंदोलन

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणार

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्राम प्रकल्पासाठी मोठा निधी मंजूर

* सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्राम प्रकल्पासाठी मोठा निधी मंजूर

* तपोवन परिसरातील साधुग्राम उभारणीसाठी १९१.२१ एकर जमिनीच्या भूसंपादनाला मिळणार गती

* राज्य शासनाकडून भूसंपादनासाठी २,२८७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी

* कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविक आणि साधू-महंतांच्या सुविधांसाठी महत्त्वाचा निर्णय

कणकवलीच्या 12 वर्षीय मंथन उकर्डेची ट्रॅम्पोलिन स्पर्धेत चांगली कामगिरी

कणकवली तालुक्यातील कलमठ येथील मंथन उकर्डे याने हॉंगकॉंग येथे झालेल्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये 6वे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटातून देशभरातून 2 खेळाडूंची निवड झाली होती. 12 वर्ष गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मंथनने आशियाई देशांच्या खेळाडूंमध्ये 6वा क्रमांक मिळवला. चेन्नई येथे एप्रिलमध्ये झालेल्या निवड चाचणीत मिनी एज ग्रुप 12 वर्ष गटात मंथनने प्रथम क्रमांक मिळवला होता. फेब्रुवारीत स्टेट चॅम्पियनशिपचे गोल्ड मेडलही त्याने जिंकले आहे.

Pune : पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याला निरोप देताना कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले

पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याला निरोप देताना कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले

या बदलीमध्ये वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांची बदली करण्यात आली.

त्यांची डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली.

TCS प्रकरणातील ९ खटल्यांची सुनावणी येत्या मंगळवारपासून सुरू होणार

* TCS प्रकरणातील ९ खटल्यांची सुनावणी येत्या मंगळवारपासून सुरू होणार

* धर्मांतर, बलात्कार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांवर सुरू होणार सुनावणी

* नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्यांचे कामकाज सुरू होणार

Abhijeet Dipke : कॉकरच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात दाखल

कॉकरच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात दाखल

दिल्लीत करणार आंदोलन

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणार

Hingoli : वसमतमध्ये कोसळला मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस

वसमत मध्ये कोसळला मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस

घरावरील लोखंडी पत्रे थेट रोहित्रावर अडकली

नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरण,  ३५ साक्षीदारांची साक्ष नोंद

नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरण

तीन अल्पवयीन मुलांसह ३५ साक्षीदारांची साक्ष नोंद

या तिन्ही मुलांनी निर्भीडपणे न्यायालयासमोर साक्ष देत आरोपी चिमुरडीला घटनास्थळाकडे घेऊन जात असल्याचे सांगितले

चिमुरडीला मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शेडवर दगड मारल्याचेही साक्षीत नमूद

Satara : सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पावसाने झोडपले

सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पावसाने झोडपले...

कुकुडवाड परिसरात पावसाची जोरदार हजेरी...

शेतकरी कर्जमाफी; जाचक अटीमुळे यवतमाळमधील ४८ हजार योजनेसाठी अपात्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सरकारनं लागू केली आहे. परंतु योजनेतील जाचक अटींमुळे यवतमाळमधील शेतकरी योजनेस अपात्र ठरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death : मनोरंजन विश्व हादरले; प्रसिद्ध अभिनेत्याची हत्या, गर्लफ्रेंडच्या मुलाने चाकूने केले सपासप वार

राज्यातील ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे, अमरावती, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठा फेरबदल

Shocking : संभाजीनगर हादरलं! नोकरीचं आमिष देत शिक्षिकेचं धर्मांतर, हॉटेलमध्ये नेत केले अत्याचार

Menstrual cramps: पाळीदरम्यान घेतलेल्या पेन किलरमुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ व्या वेतन आयोगात वयानुसार १००% पर्यंत पेन्शन देण्याची मागणी, पहा नेमका काय आहे प्रस्ताव

SCROLL FOR NEXT