Blocked blood vessels: शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ लागल्या की पायांमध्ये दिसतात ही 3 लक्षणं

Surabhi Jayashree Jagdish

रक्तवाहिन्यांचं कार्य

रक्तवाहिन्या हृदयातून शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवतात. त्या शरीरातील पेशींना आवश्यक पोषक तत्त्वं आणि हार्मोन्स पोहोचवण्याचं काम करतात.

Artery blockage | saam tv

रक्तवाहिन्या ब्लॉक का होतात?

रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीवर चरबी, कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम साचल्याने प्लाक तयार होतं. हे प्लाक वाढत गेल्याने रक्तवाहिनी अरुंद होतात आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

Peripheral artery disease | saam tv

रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची कारणं

जास्त कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि धूम्रपान ही यामागील प्रमुख कारणं आहेत. नियमित व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि जास्त तेलकट अन्न खाल्ल्याने धोका वाढतो. वाढतं वय, आनुवंशिकता आणि दीर्घकाळचा ताण यामुळेही रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता वाढते.

Blood vessel health | saam tv

शरीरावर होणारे परिणाम

संबंधित अवयवाला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याने त्याचं कार्य बिघडू शकतं. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यास छातीत दुखणं किंवा हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. याची पायांमध्ये कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.

Heart health | saam tv

चालताना वेदना

चालताना किंवा जिने चढताना पोटरी, मांडी किंवा नितंबात वेदना किंवा गोळा येऊ शकतो. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ही वेदना कमी होऊ शकतात.

Poor blood circulation | saam tv

पाय थंड पडणं

पाय इतर शरीरातील भागाच्या तुलनेत थंड वाटू शकतो. पायाची त्वचा फिकट, निळसर दिसू शकते. रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे पायावरील केस कमी होणं किंवा नखं हळूहळू वाढणं अशी लक्षणेही दिसू शकतात.

Diabetes and arteries | saam tv

जखम लवकर न भरणं

पायाच्या बोटांवर किंवा तळपायावर झालेल्या जखमा भरून येण्यास जास्त वेळ लागू शकतो. गंभीर अवस्थेत विश्रांती घेत असतानाही पायात वेदना जाणवू शकतात.

Cold feet symptoms | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Chia seeds: सकाळ की संध्याकाळ? वजन कमी करण्यासाठी कधी खावेत चिया सिड्स?

Morning chia seeds | saam tv
येथे क्लिक करा