Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक ५ डिसेंबर २०२५, राज्यात कडाक्याची थंडी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Nashik: निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

नाशिक -

- निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना आठ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

- तर या प्रकरणातील फिर्यादी उपसंचालक बी.बी. चव्हाण फरार

- बनावट शालार्थ आयडी प्रकरणी उपासनी यांना करण्यात आली होती अटक, आर्थिक गुन्हे शाखेने केली होती कारवाई

- यापूर्वी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे आढळले होते उपासनी यांच्या सहभागाचे पुरावे

- जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर या घोटाळ्याचे मुख्य केंद्र

- बनावट आयडी प्रकरणी आतापर्यंत 9 जण ताब्यात

- पुणे एसआयटी टीमकडून सुरू आहे प्रकरणाचा तपास

Pune: पुण्यात मौजमजेसाठी दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला अटक

पुणे -

पुण्यात मौजमजेसाठी दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला अटक

चक्क नर्तिकेवर पैसे उडवता यावेत म्हणून आरोपी करत होता दागिन्यांची चोरी

फुरसुंगी पोलिसांकडून आरोपीला अटक

आरोपीकडून ६ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त

राहुल उत्तम पठारे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आरोपीकडून तब्बल ५ तोळे सोने पोलिसांनी केले जप्त

सदर आरोपी हा पुण्यातील वेगवेगळ्या दुकानामध्ये जात करत होता सोन्याची चोरी नंतर हे सोने विकून मिळवत होता पैसे

हेच दागिने चोरीतून मिळालेले पैसे तो पुढे मौजमजा करण्यासाठी वापरत होता.

अधिक तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.

Akola: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नया अकोला येथे उसळणार हजारोंचा जनसमुदाय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नया अकोला येथे उसळणार हजारोंचा जनसमुदाय

नया अकोला या ठिकाणी आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी

6 डिसेंबर रोजी नया अकोला येथे काँग्रेस पक्षातर्फे अभिवादन सभा.. खासदार मुकुल वासनिक आणि खासदार प्रणिती शिंदे उपस्थित राहणार

Pune: आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणार्‍यावर केली MPDA कारवाई

पुणे -

आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणार्‍यावर केली MPDA कारवाई

समर्थ पोलीस स्टेशन गुंड मंथन सचिन भालेराव वय 19 वर्षे राहणार भवानी पेठ,पुणे याचेवर पुणे पोलीस आयुक्त यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई केली आहे.

मंथन भालेराव याने आंदेकर टोळीचे उदात्तीकरण करणारे स्टेटस त्याचे INSTAGRAM अकाउंट वर ठेवले होते. त्यावेळी तात्काळ समर्थ पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली होती.

Social media च्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांसाठी हा कठोर संदेश पोलीस आयुक्त यांनी या कारवाईच्या माध्यमातून दिला आहे.

समर्थ पोलीस स्टेशन ची मागील काही महिन्यातील ही पाचवी कारवाई आहे.

Pune: अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरायला नकार? 

पुणे 0

अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरायला नकार?

मुद्रांक शुल्क विभागाने पाठवलेली नोटीस कंपनीकडून अमान्य

मुंढवा येथील सरकारी जागेची खरेदी करताना आयटी कंपन्याचे डेटा सेंटर उभारण्यासाठी घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य आहे

असा अमेडिया कंपनीने वकिलांमार्फत केला दावा

या संदर्भात नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने कंपनीला २१ कोटींची मुद्रांक शुल्क भरण्याची पाठविलेली नोटीस कंपनीने अमान्य केली आहे

लेखी म्हणणे सादर केल्यानंतर येत्या आठवडाभरात यावर सुनावणी होणार आहे

Pune: नवले ब्रीज अपघात टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांची अजून एक नवीन उपाय योजना

पुणे -

नवले ब्रीज अपघात टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांची अजून एक नवीन उपाय योजना

आता कात्रज बायपास मार्गावर वाहन वेग मर्यादा 40 किमी प्रतितास बंधनकारक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakhpati Didi Yojana: महिलांसाठी खास योजना! कोणत्याही व्याजाशिवाय मिळणार ५ लाखांचं कर्ज; योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचा

Accident : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, ५० प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस दरीत कोसळली

Fact-Check: आता कर्मचाऱ्यांना 12 तासांची ड्युटी? आठवड्याला 72 तास काम, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Zodiac sign: कृष्ण प्रतिपदेचा दिवस ठरणार खास; जाणून घ्या कोणत्या राशींना मिळणार मोठा फायदा

Crime: घटस्फोट द्यायला नवऱ्याचा नकार, संतापलेल्या बायकोने काढला काटा; जंगलात नेऊन जाळलं

SCROLL FOR NEXT