Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

Marathi Breaking Live Headlines Updates : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भातील काही ठिकाणी शाळांना सुट्टी, संसदेचे पावसाळी अधिवेशन, राहुल गांधींच्या वक्तव्याने गदारोळ, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

नाशिक न्यायालयाच्या परवानगीने घेतला भोंदू खरातचा ताबा...

समता पतसंस्थेतील बनावट खाती आणि कोट्यवधींच्या व्यवहार प्रकरणाच्या पुढील तपासासाठी शिर्डी पोलिसांनी घेतला भोंदू खरातचा ताबा..

भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिस करणार उद्या राहाता न्यायालयात हजर...

पोलिसांच्या तपासात भोंदू खरातच्या आर्थिक व्यवहारांचे आणखी काय कारणामे समोर येणार? याकडे राज्याचे लक्ष..

प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणाचा अद्याप शोध लागेना... 48 तास उलटून शोध सुरूच.

काल दुपारी संगमनेर येथील गोदामाई घाट परिसरात बुडाला तरुण...

ऋषिकेश गडाख नावाचा तरुण कालपासून बेपत्ता...

आमदार अमोल खताळ यांनी घटनास्थळी पाहणी करत घेतला आढावा...

ड्रोनच्या माध्यमातून परिसरात शोध सुरू...

बेपत्ता झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांनी, प्रशासनाच्या कारभारावर व्यक्त केली नाराजी...

नदीत आंघोळीसाठी गेलेला ऋषिकेश गडाख कालपासून बेपत्ता...

यवतमाळ: पुराच्या पाण्यात 70 बकऱ्या गेल्या वाहून

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उचेगाव या गावतील उल्हास जाधव या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतामध्ये असलेल्या 70 बकऱ्या आणि कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तसेच शेतात लागवड केलेले कपाशी, सोयाबीन तूर आणि हळद या पिकांचे मोठे नुकसान झाले.शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नागपूर येथील ऐतिहासिक निवासस्थानावर आधारित विशेष पोस्टल कव्हर, माहिती पुस्तिका आणि कायमस्वरूपी सचित्र टपाल मुद्रेचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या कार्याचा विस्तार, राष्ट्रसेवा आणि व्यक्तिनिर्माणावर भाष्य केले.

- भारतीय टपाल विभागातर्फे डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित विशेष पोस्टल कव्हर, माहिती पुस्तिका आणि कायमस्वरूपी सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला...

बीड येथे 45 लाखाची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या नांदेडच्या निवासस्थानी एसीबीचे पथक दाखल.

बीड येथे 45 लाखाची लाच घेताना अटक विभागीय वन अधिकार्याच्या नांदेड येथील निवासस्थानी एसीबीचे पथक दाखल झाले.लाचखोर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार हे मूळ नांदेडचे आहेत . नांदेड शहरातील आनंदनगर भागात लखमावार यांच निवासस्थान आहे.याच घरी झाडाझडती घेण्यासाठी नांदेड एसीबीच पथक दाखल झाल आहे.सध्या त्याच्या घरी कोणीच नसल्याने एसीबीच पथक घरा बाहेर थांबून आहे.लाच घेताना मोठा अधिकारी पकडला गेला तर त्याच्या घराची झाडाझडती घेतली जाते.घरातील दागिने , रोख रक्कम , स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते.याच कारवाईसाठी एसीबीचे पथक नांदेडच्या निवासस्थानी दाखल झाले.मात्र या निवासस्थानी श्रीनिवास लखमावार त्यांच्या आई-वडील नाहीत.ते पुण्याला असल्याची माहिती आहे.आता पुढील आदेशाची एसीबीच पथक प्रतीक्षा करत आहे.

DCM सुनेत्रा पवारांची बैठक सुरू असतानाच विभागीय वन अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

बीड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असतानाच एका मोठ्या अधिकाऱ्याला लाच लुचपत पथकाने 45 लाखाची लाज घेताना पकडले आहे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर, विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांना त्यांच्या राहत्या घरी ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर धडक कारवाई

३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला

अन्न व औषध प्रशासनाने एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर धाड टाकून भेसळयुक्त पनीर व गाईच्या तुपाच्या निर्मितीप्रकरणी मोठी कारवाई केली.

या कारवाईत सुमारे ९५० किलो वजनाचे ₹३ लाख १२ हजार ३८० किमतीचे तूप, क्रीम, पनीर आणि रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले.

Ulhasnagar: स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचा आक्रोश मोर्चा, भरमसाठ वीज बिलांमुळे नागरिक  संताप

उल्हासनगर -

उल्हासनगर शहरात स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलांच्या विरोधात नागरिकांनी शुक्रवारी तीव्र आक्रोश व्यक्त करत मोर्चा काढलाय.

भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप करत मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते,

Raigad: महाडच्या शिवथर परिसरात मुसळधार पाऊस; तीन गावांचा संपर्क तुटला

महाडच्या शिवथर परिसरात मुसळधार पाऊस; तीन गावांचा संपर्क तुटला

महाड तालुक्यातील शिवथर परिसराला जोरदार पावसाने झोडपले आहे.

याचा फटका येथील आंबेनळी, आंबेशिवथर आणि सह्याद्रीवाडी या तीन गावांना बसला असून गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने तीन गावांचा संपर्क तुटला आहे.

प्रशासनाने येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे

Pune: शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

पुणे -

शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

१ आणि २ ऑगस्ट रोजी किल्ले सिंहगड पर्यटकांसाठी राहणार बंद

पुण्यातील घाट माथ्यावर सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे

सिंहगड किल्ले परिसरात दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता वन विभागाचा निर्णय

Pune: पुण्याच्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस

पुणे -

पुण्याच्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस

मुसळधार पावसानं बहुतांशी भागात ओढ्या - नाल्यांना पूर

वीसगाव खोऱ्यातील वरोडी गावच्या ओढ्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्यानं पूल गेला पाण्याखाली

पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प.. परिसरातील गावांचा संपर्क तुटला

शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांचे हाल

Nashik: खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांची मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली भेट

नाशिक -

- खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांची मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली भेट

- आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी सुरू आहे चर्चा

- मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्याच्या समस्या संदर्भात मांडली व्यथा

- रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या मदती संदर्भातही केली मागणी

नंदुरबार- हतनुर धरणाचे 36 दरवाजे उघडल्यानंतर तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू....

नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश आणि सारंखेडा तापी नदीला पूर परिस्थिती....

सारंखेडा बॅरेजचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 3 दरवाजे 2 मीटरने उघडले....

प्रकाश बॅरेजचे पाच दरवाजे पूर्ण क्षमतेने तर दोन दरवाजे तीन मीटर उंचीने उघडण्यात आले...

प्रकाश आणि सारंखेडा मॅरेज मधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने तापी नदीला पूर परिस्थिती....

सारंखेडा आणि प्रकाशा तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या इशारा....

मुसळधार पावसामुळे धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदीला आला पूर

पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धुळे शहरातील फरशी पूल गेला पाण्याखाली

फरशी पूल पाण्याखाली गेल्यामुळे प्रशासनातर्फे वाहतुकीसाठी पूल करण्यात आला बंद

पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिगेटिंग करून प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तैनात

सेल्फी काढण्यासाठी जाणाऱ्या युवकांना प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे आवाहन

पूर आलेल्या नदीकाठाहून पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी..

संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

- संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

- त्र्यंबकेश्वर, कळवण, बागलाण तालुक्यासह अन्य काही ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट

- ५०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता

- राज्याच्या आपत्कालीन विभागाचा अलर्ट

मंत्रालयातील कॅन्टीनला क्लीनशीट कशी? संजय गायकवाडांचा संताप

मंत्रालयातील कॅन्टीनला अवघ्या दोन महिन्यांत क्लीनशीट कशी मिळाली, असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. हायकोर्टाच्या आदेशाची माहिती अधिकाऱ्यांना आधीच असल्याने कारवाईपूर्वी कॅन्टीन साफ करण्याची संधी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तपासणीत 79 त्रुटी आढळूनही कॅन्टीनला दिलेल्या क्लीनशीटवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी कॅन्टीनची नियमित तपासणी करून दर पंधरा दिवसांनी आढावा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

पुणे- आयटी पार्क हिंजवडी परिसरात कारवाईदरम्यान दुकानावर क्रेन पलटी झाल्याची धक्कादायक घटना

आयटी पार्क हिंजवडी परिसरात पीएमआरडीए च्या कारवाईदरम्यान एका दुकानावर क्रेन मोठी पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीएमआरडीए तर्फे हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरामध्ये अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्यात येत आहे. अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्यासाठी पीएमआरडीएन एक मोठी क्रेन बोलवली आहे. मात्र आज कारवाई दरम्यान पीएमआरडीए ची क्रेनच एका दुकानावर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

४० हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू

नदी काठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा

पुण्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी सुद्धा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संतधार सुरूच

धुळे जिल्हा रुग्णालयाबाहेर साचलं गुडघाभर पाणी

जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर जलमय परिस्थितीमुळे रुग्णांचे हाल

गुडघाभर पाण्यातून जाताना रुग्णांना करावी लागतेय कसरत

रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे गुडघाभर पाण्यामुळे झाले हाल

पैनगंगा नदीला पूर; पुलावर पाणी, मलकापूर–सोलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

सततच्या मुसळधार पावसामुळे येळगावजवळील पैनगंगा नदीला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे मलकापूर–सोलापूर राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस; नाशिक, धुळे जळगावला रेड अलर्ट

पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र जवळ निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होतोय. पुढील २४ तासांमध्ये पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहील मात्र उद्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. पुण्यातील घाट माथ्यावर रेड अलर्ट आहे तर पुणे शहराला ऑरेंज अलर्ट पुणे वेधशाळेने जारी केला आहे.

सततधार पावसाचा नांदुरा तालुक्याला तडाखा; सोयाबीन-तूर-कापूस पिकांचे मोठे नुकसान

नांदुरा तालुक्यात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे सर्वच गावांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी शेती खरडून गेली असून शेतांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे.

धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, महापौरांनी केली पाहणी

शहरातील कॉम्प्लेक्स मध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे दुकानांमध्ये पाणी घुसल्याने दुकान मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

धुळे शहरातील जलमय परिस्थितीची पाहणी धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी केली

दुकानांमध्ये पाणी शिरून झालेल्या नुकसानी संदर्भात महानगरपालिका प्रशासनाला महापौरंतर्फे आदेश

लवकरात लवकर दुकानांमध्ये शिरलेले पाणी काढून दुकानदारांना दिलासा देण्याचे महापौरांचे आश्वासन

मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर

- खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट.

- त्यानंतर नाशिक महापालिकेत कुंभमेळा कामांचा घेणार आढावा बैठक

- कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढलेल्या खड्ड्यांवर होणार चर्चा.

- खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची.

- बैठकीला महापालिका, कुंभमेळा प्राधिकरण आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार.

कोयना आणि वारणा धरणातून केला जाणाऱ्या विसर्ग मुळे सांगलीच्या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ 

कोयना आणि वारणा धरणातून केला जाणाऱ्या विसर्ग मुळे सांगलीच्या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. वारणा धरणातून 7 हजार क्यूसेक्सने पाणी नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. तर कोयना धरणातून 6 हजार क्यूसेक्सने विसर्ग कृष्णा नदीत सोडण्यात आला आहे. कृष्णा आणि वारणा नदी पात्रा बाहेर पडू लागली आहे.

मोठी घटना! वसईत मालगाडीचे मागील डबे वेगळे झाले; फ्रेट कॉरिडॉरवरील वाहतुकीत खळबळ

वसईत वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर वरून धावणारी मालगाडीचे पाठीमागील डब्बे निघून दोन झाल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना मधुबन सिटीच्या शेजारून जाणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्गावर आज सकाळी साडे दहा वाजता घडली आहे.

वंचितांचा आवाज म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचं कार्य केलं- फडणवीस

अण्णाभाऊ साठे संशोधन संस्था प्रकल्पाचंं भूमिपूजनाच्या वेळी भाषणात मुख्यमंत्र्यांनी वंचितांचा आवाज म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचं कार्य केलं असंही म्हंटलं.

गडचिरोलीत पुराचा फटका कायम; १२ मार्ग अद्याप बंद, नागरिकांना खबरदारीचे आवाहन 

गडचिरोली जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने १२ प्रमुख रस्ते व महामार्गांवरील वाहतूक अद्याप बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही माहिती जाहीर केली.

मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

चाळीसगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आज गांधी चौक परिसराला बसला. नगरपालिकेची जुनी व जीर्ण इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने घटना घडली त्यावेळी इमारतीजवळ कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

पाण्याचा प्रवाह वाढल्याने चिंचपूर बंधारा बुडाला पाण्याखाली, महाराष्ट्र कर्नाटकचा संपर्क तुटला 

- पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण झाले ओव्हरफ्लो

- त्यामुळे भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली

- दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर बंधारा पाण्याखाली बुडाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांचा संपर्क तुटला

- चिंचपूर बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाणंद रस्त्याच्या कामांची पाहणी 

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी रायगड जिल्ह्यात राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या पाणंद रस्ता योजनेच्या कामाचा आढावा घेतला.त्यानंतर मुळे गावात जाऊन पाणंद रस्त्याच्या कामांची पाहणी केली. झालेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. रायगड जिल्ह्यात अशा 3 हजार पाणंद रस्त्याच्या कामाला चालना मिळणार असून वनविभागाच्या अडचणीवर तोडगा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांच्यासोबत माजी खासदार धैर्यशील पाटील , आमदार विक्रांत पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण बाजारपेठेतील मुख्य रस्ता खचला,वाहतूक कोंडी, प्रशासनाकडून तात्पुरती उपाययोजना 

कल्याण शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्ता अचानक खचल्याने परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागात तत्काळ बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

वसमत कुरुंदा हिंगोली राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद, महापुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

हिंगोली जिल्ह्यात 24 तासात 103 मिलिमीटर पाऊस कोसळल्याने अनेक नद्या नाले व ओढ्याला पूर आला आहे तर तिकडे सोडेगाव जवळ असलेल्या कयाधू नदीच्या पुलावरून मध्यरात्रीपासून पाणी वाहत असल्याने शेकडो हेक्टर शेतीवरील पीक पाण्याखाली गेली आहेत, ड्रोन कॅमेरा च्या माध्यमातून या पुराची महाभयंकर दृश्य पुढे आली आहेत, या दृश्यांमध्ये हिरवीगार पिके पाण्याखाली गेल्याच दिसत आहे तर वसमत कुरुंदा हिंगोली हा राज्य मार्ग देखील वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत दुर्घटना झालेल्या ठिकाणी भेट घेतली. ते म्हणाले, भिवंडीत एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. जखमींवर उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

पेठ पिंपळगाव येथील पर्यायी पूल पुराच्या पाण्यात गेला वाहून

परभणी जिल्ह्यातील चोरवड – राणीसावरगाव मार्गावरील पेठ पिंपळगाव येथील नदीवरील पर्यायी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून परिसरातील सुमारे 20 गावांचा संपर्क तुटला आहे.

Akola : अकोला जिल्ह्यातील धामणा बुद्रुक येथील पठार नदीला पूर 

अकोला जिल्ह्यातील धामणा बुद्रुक येथील पठार नदीला पूर आलेला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार – करतवाडी – रेल – धामणा बु – गरसोळी – पातोंडा या गावांचा परस्पर संपर्क तुटला. धामणा बुद्रुक येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने आज सकाळपासून हा मार्ग पूर्णतः बंद केला आहे.

कयाधू नदीच्या पुलावर साडेतीन फूट उंच पाणी वाहने सुरू, ड्रोन कॅमेरा ने घेतलेली दृश्य

हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पूर आला आहे, मागील दोन दिवसापासून जिल्हाभरात धुवाधार पाऊस कोसळत असल्याने अनेक नद्या नाले ओढ्यांना पूर आला आहे.

Jalgaon : सातपुड्यातील सुकी नदी वरील गायबर्डी धरण ओव्हर फ्लो

जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले हे धरण निसर्ग रम्य सौंदर्यानं एक पर्यटन स्थळ सुद्धा नावारूपाला आले आहे धरण क्षेत्रातील वाहणाऱ्या सुकी नदी च्या पाण्याचे परक्यूलेशन क्षमता चांगली असल्याने रावेर यावल साठी हे धरण शेतकऱ्यांन साठी जीवन वाहिनी आहे तर पाल या थंड हवेच्या निसर्ग रम्य पर्यटन सोबतच गारबर्डी धरण हे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पर्यटकांसाठी मोठा ठिकाण ठरला आहे धरण ओव्हर फ्लो झाल्याने येथे पर्यटकांची संख्या वाढणार आहे .

अंचलगाव रेल्वे गेटसमोर टेम्पो पलटी,शेकडो कोंबड्यांचा मृत्यू, नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक ठप्प

नाशिकच्या नगर-मनमाड महामार्गावरील येवल्याच्या अंचलगाव पाटी शिवारात, रेल्वे गेटसमोर तिहेरी अपघात घडला आहे. कोंबड्यांची वाहतूक करणारा भरधाव टेम्पो अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाला. या दुर्दैवी अपघातात टेम्पोतील शेकडो कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

अतिमुसळधार पावसाचा फटका; जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून काही गावांना पाण्याचा वेढा पडला आहे.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी दोन्ही तालुक्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्याचे आदेश संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे

गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

उद्या गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण पुण्यात होत आहे

उद्या सकाळी साडेदहा वाजता काँग्रेस अमित शहा यांच्या विरोधात करणार आंदोलन

Hingoli : समगा नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पूर आला आहे,

मागील दोन दिवसापासून जिल्हाभरात धुवाधार पाऊस कोसळत असल्याने अनेक नद्या नाले ओढ्यांना पूर आला आहे

तर तिकडे हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या कयाधू नदीवरील समगा गावच्या जवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या जवळपास 15 गावातील नागरिकांचा हिंगोली शहराशी थेट संपर्क तुटला आहे

पुण्यात रात्री साडे अकराच्या सुमारास कॅम्प परिसरात अपघात

पुण्यात रात्री साडे अकराच्या सुमारास कॅम्प परिसरात अपघात

चार चाकी कारचा दरवाजा उघडल्यामुळे त्याला धडकून एका दुचाकी युवकाचा जागीच मृत्यू

काल रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे कॅम्प येथील मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला.

सूर्यकांत लक्ष्मण बिडकर असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

बुलढाणा-नागपूर महामार्गावर बाभळीचे भलेमोठे झाड कोसळले; वाहतूक पूर्णपणे ठप्प

बुलढाणा-नागपूर महामार्गावर बाभळीचे भलेमोठे झाड कोसळले; वाहतूक पूर्णपणे ठप्प

शिरसगाव देशमुखजवळ रात्रभरापासून मार्ग बंद; मुसळधार पावसाचा फटका

Buldhana : अतिवृष्टीचा फटका; बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद

अतिवृष्टीचा फटका; बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद..

पुलांवरून पाणी वाहत असतानाही वाहनचालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास

राजुरा पूर बचाव.. ७ जणांची सुखरूप सुटका

अमरावती जिल्ह्यातील राजुरा येथील मोखड नदीला आलेल्या भीषण पुरात अडकलेल्या सात जणांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डी.डी.आर.एफ. (DDRF) शोध व बचाव पथकाने धाडसी कारवाई करत सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास सात जण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार शोध व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

कोल्हापुरातल्या शिंगणापूर येथे बंद घराला बनवलं नशेचा अड्डा

कोल्हापुरातल्या शिंगणापूर या गावांमध्ये अनेक दिवसांपासून बंद असलेलं एक घर काही नशेखोर तरुणांनी नशा करण्यासाठी एक अड्डा म्हणून वापरल्याचा प्रकार समोर आलाय... विशेष म्हणजे या घरातील सर्व साहित्य त्यांनी एक एक करत विक्री सुद्धा केली आहे.... केवळ दारू सिगरेटची नशा नसून गांजा तसेच नशेची इंजेक्शन सुद्धा त्या तरुणांनी घेतल्याचं समोर आलंय.. इतकंच काय तर नशेमध्ये घरात दोन घुशी सुद्धा मारून त्याला सॉस लावून त्यांनी खाल्ल्याचा संशय आहे... नशेची अनेक इंजेक्शन आणि गांजा ओढण्यासाठी ची सगळं साहित्य इथं घरामध्ये अस्ताव्यस्त पडल्याचे पाहायला मिळत आहे... माधुरी वाल्मीम कातवरे असे या महिलेचे नाव आहे ज्यांच्या घरी ही घटना घडली आहे... विशेष म्हणजे या घरातील भावाभावांनी धाडस दाखवून त्या नशेतील तरुणांना पकडले..

कंकालेश्वर मंदिराच्या विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी कंकालेश्वर मंदिराच्या विकास कामाचे भूमिपूजन केले.दिवंगत अजित पवार यांनी कंकालेश्वर मंदिरासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर केला होता.याच कामांचे भूमिपूजन सुनेत्रा पवार यांनी नारळ फोडून केले.

रत्नागिरी- काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचं नगरसेवक पद रद्द

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

डिसेंबर २०२५ मध्ये राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काॅग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या झारी

राजापुरात महाविकास आघाडीला धक्का

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने झारी यांचं जात प्रमाणपत्र ठरवलं होतं अवैध

राजापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता, महायुतीकडे आणि महायुतीकडे प्रत्येकी १० नगरसेवकांचे होते संख्या बळ

जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष

पैनगंगेच्या पुराचा तडाखा; चार गावांत शिरलं पाणी

विदर्भ आणि मराठवाडाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दातोडी, कापेश्वर, कवठा आणि चिमटा या चार गावांत पाणी शिरले असून यात घरांसह नागरिकांचं मोठे नुकसान झाले आहे. पैनगंगा, अरुणावती आणि अडाण नद्यांच्या संगमाजवळील चिमटा गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून नागरिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

- ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता पुढील ३ तासांसाठी हवामान विभागाची इशार्‍याची अधिकृत घोषणा

- जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

- नाशिककरांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

- हवामान बदलामुळे जिल्ह्यातील काही भागांत मध्यम ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज

भोयेगाव–चंद्रपूर मार्ग बंद

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून वर्धा नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याखाली भोयेगाव पूल आल्याने भोयेगाव–चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले असून, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विश्वासघातातून घरफोडी; शेजाऱ्यानेच चोराला दिली घर बंद असल्याची माहिती

शिरूर तालुक्यात विश्वासघाताचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दशक्रिया विधीसाठी कुटुंब घराबाहेर गेल्याची माहिती घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच सराईत चोराला दिल्याने घरफोडी झाली. मात्र शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चाकण उद्योगनगरीचा वाहतूक कोंडीने श्वास गुदमरला रस्त्यावर वाहनांच्या रांगा

पुणे जिल्ह्यातील चाकण उद्योगनगरी पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडली आहे. पुणे नाशिक महामार्गासह औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

भिवंडी दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू

भिवंडी शहरातील भंडारी कंपाउंड परिसरात असलेल्या गंगाराम वाडी येथील असलेली कोहिनूर चार माळ्याच्या बिल्डिंगचा एक साईटचा स्लॅब कोसळल्याने मधील पाच ते सहा नागरिक या मलब्याखाली दाबल्याची माहिती होती.

आतापर्यंत 4 जणांचा मृतदेह काढण्यात एनडीआरएफ आणि टीडीआरएफ ला यश आले आहे

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्याची दुर्दशा...

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस,खड्डे आणि महामार्गावर सुरू असलेली कामे यामुळे पुणे बंगळूर महामार्गावर आणि सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी चा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे.त्याचबरोबर महामार्गावर आणि सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने प्रवाश्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.लवकरात लवकर महामार्ग प्रशासनाने हे खड्डे मुजऊन नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गा लागत असणाऱ्या सेवा रस्त्यावरून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

घाटंजी - सायफळ पैनगंगा पुलावरुन पाणी वाहतूक पुर्णपणे ठप्प

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सायफळ हे गाव विदर्भ - मराठवाडा- तेलंगाना जोडणारा उनकेश्वर जवळील पैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असून वाहतुक ठप्प झाली आहे. पैनगंगा नदीच्यापुलावरिल कठडे वाहून गेले आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत पुणे लेनवर कंटेनरला अपघात

कंटेनरच्या केबिनचे मोठे नुकसान

० पायाला गंभिर दुखापत झालेला कंटेनर चालक केबिनमध्ये आडकला

० दोन तासांच्या प्रयत्नांनंतर बचाव पथकाने कंटेनर चालकाला बाहेर काढले

० कंटेनर चालकला उपचारासाठी MGM रूग्णालयात हलवले

० मध्यरात्री झाला अपघात

चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनर बंद पडल्याने पाच किलोमीटरची वाहतूक कोंडी

पुणे जिल्ह्यातील चाकण शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावसमोर मोठा कंटेनर बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. भोसेपर्यंत सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

भोर तालुक्यात देखील पावसाची दमदार हजेरी

भोरचे निरा देवघर धरण १०० टक्के भरले

पुणे जिल्ह्यात डोंगर माथ्यावर सतत पडणाऱ्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निरा देवघर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचे पाहायला मिळाले

12 टीएमसी क्षमता असलेले निरा देवघर धरण भरल्यामुळे पुणे जिल्हा, सातारा जिल्हा त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार खेडच्या आदिवासी भागातील विदारक वास्तव

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील खालचे भोमाळे येथे मुसळधार पावसात ताडपत्रीचा आडोसा करून अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीवर संरक्षणात्मक शेड नसल्याने ग्रामस्थांना ही वेळ ओढवली.

Maharashtra News Live Update: दमदार पावसामुळे पुण्यातील सर्व धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस

पुण्यातील खडकवासला १०० तर पानशेत धरण ९८ टक्के भरलं

घाटमाथा आणि धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची मोठी आवक

खडकवासला: १०० टक्के

पानशेत: ९८.३८ टक्के

वरसगाव: ९५.२८ टक्के

टेमघर: ८३.६ टक्के

एकूण पाणीसाठा: ९५.२२ टक्के

Maharashtra News Live Update: केंद्रीय गृह मंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा बैठक

शहरातील सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली

या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील रस्ते स्वच्छता, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत होर्डिंग्ज तसेच अतिक्रमणे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला

मतदार यादी पुनरीक्षणाचे फक्त ५५ टक्के काम पूर्ण,  केवळ आठ दिवसांचा वेळ शिल्लक

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) हे नगरसेवकांच्या कार्यालयात बसून सुरू असले तरीही प्रशासनाला या कामाचा वेग वाढवता आलेला नाही

अनेक कर्मचारी संथ गतीने काम करत असल्याने पुण्यात केवळ ५५ टक्के काम पूर्ण

एका आठवड्यात तब्बल ४५ टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. दरम्यान, हे काम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, बचत गटांचे सहकार्य घ्या, अशा सूचना आज स्थायी समितीमध्ये देण्यात आल्या आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : रक्तदानाने माणसांचा, वृक्षसंवर्धनाने सृष्टीचा श्वास अखंड राहतो - रामानंदाचार्य नरेंद्रचार्य

Supreme Court : जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

श्रावणात बनवा अळूच्या पानांची कुरकुरीत वडी; एकदा खाल तर खातच राहाल

Cinnamon Water Benefits: सकाळची सुरुवात करा दालचिनीच्या पाण्याने; रिकाम्या पोटी प्यायल्यास शरीराला मिळतील हे ७ फायदे

Maharashtra News Live Update: धुळ्यात वाहन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग

SCROLL FOR NEXT