उदय सामंत
राजापूरमध्ये विकासकामे केलीय, त्यामुळे ही गर्दी जमलीय. महायुतीची सत्ता येणार
शिवसेना म्हणून आम्ही निलेश राणे यांच्या सोबत आहोत
वरिष्ठांनी हस्तक्षेप करून हे वेळीच थांबवलं पाहिजे
निलेश राणेंनी घेतलेली भूमिका आहे त्यांच्या अवतार संघामध्ये म्हणून योग्य आहे
निलेश राणेंवर झालेला गुन्हा कशामुळे झाला याची माहीती घेणार आहोत
जामखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात...
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा रिक्षातून प्रचार...
जामखेड शहरात रिक्षात बसून नागरिकांच्या गाठीभेटी घेत केला उमेदवारांचा प्रचार...
सुरक्षित जामखेड विकसित जामखेड घडवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आ.रोहित पवार यांचे मतदारांना आवाहन...
राहुल गांधींनी संविधानाचं पुस्तक हाती न घेता संविधानातील कलमं सांगून दाखवावी. मी राजकारण सोडेल : नवनीत राणा, भाजप नेत्या.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून प्रकरण
- मुलीच्या अत्याचार आणि खून प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती
- सरकारच्यावतीने उज्वल निकम डोंगराळे घटनेची केस लढणार
- डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आंदोलन
संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी परिसरातील पांढरीचा मळा येथे पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला
या हल्ल्यात ठकुबाई भाऊसाहेब पानसरे या गंभीर जखमी
त्यांच्यावर संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
इंदापूर नगरपरिषद निवडणूक प्रचाराचे तापमान चांगलेच वाढले असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रचाराला सुरुवातीपासूनच वेग दिला आहे. कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करत भरणे हे अक्षरशः दुचाकीवरून शहरभर फिरत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत... सध्या त्यांचे हे दुचाकी वरून फिरताना चे फोटो व व्हिडिओ व्हायरल होत आहे...
अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून विमान उडविण्यास वैमानिकाचा नकार. एकनाथ शिंदे फोनवरून सभेला संबोधित करतायत. अकोट, तेल्हारा, मुर्तिजापूर आणि हिवरखेड नगरपालिकेच्या उमेदवारांचा एकत्रित प्रचारासाठी हिवऱखेडमध्ये होती शिंदेंची सभा. सभेला एकनाथ शिंदे येणार नसल्याने लोकांचा हिरमोड. अंधार पडत असल्याने हेलिकॉप्टर लँड करण्यास पायलटची मनाई..
दुकानावरील मराठी पाट्यासंदर्भात पुण्यातील मुळशी तालुका मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मुळशी आणि हिंजवडी परिसरात दुकानावर इंग्लिश पाट्या असणाऱ्या दुकान मालकांना, मराठी पाट्या लावण्या संदर्भात मनसेने निवेदन दिलं आहे. दुकानदारांना मनसेकडून 15 दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आल आहे. पंधरा दिवसात दुकानावर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर, मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करण्यात येणारं आहे. मनसेचे मुळशी तालुका अध्यक्ष धनंजय टेमघरे यांच्या प्रमुख नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी, पुण्यातील हिंजवडी आणि मुळशी परिसरात दुकान दारांना हे निवेदन दिलं
कार डिव्हायडरवर पलटी, ज्येष्ठ नागरिक बचावले
पुणे–मुंबई जुन्या एक्सप्रेस वेवर भीषण अपघाताची घटना
कार पूर्णपणे डिव्हायडरवर पलटी
गाडीत असलेले ज्येष्ठ नागरिक सुखरूप बचावले आहेत
हा अपघात कामशेतजवळ झाल्याची माहिती समोर आली आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार दिवंगत संतोष देशमुखांच्या घरी दाखल
सेना - भाजप - राष्ट्रवादी लाडकी बहिणीच्या श्रेया वादावरून लढत आहेत,गोपीचंद पडळकर यांचा सुप्रिया सुळे यांच्यावरती निशाणा साधला...लाडकी बहीण योजना ही ताज मध्ये दीड हजाराची कॉपी घेणारी, दीड हजाराचा चहा पिणारी, दीड लाखाची पर्स, दोन हजाराचा गॉगल , दहा लाखाची साडी घालणारी नसून ती ती योजना मुलाने पाच रुपये मागितल्यावरती जी बहीण पाच रुपये मुलाला देऊ शकत नाही अशा बहिणीसाठी ही योजना आहे , असा निशाणा गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांनी दीड हजाराने काय होईल याचे उदाहरण देत आपला निशाणा डोळ्यांवर निशाणा साधला
विरारच्या नारंगी फाटकाजवळ टँकरच्या धडकेत
महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
हर्ष कदम 17 असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो महाविद्यालयातून घरी जात असताना पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा टँकर आणि चालकाला ताब्यात घेतले आहे
उदगीर मध्ये परिवर्तन घडवा हे मी सांगायला मी आलो ,
उदगीर मध्ये इतके वर्ष तुम्हाला विकासापासून वंचित ठेवल
तीन वर्षांपूर्वी राज्यात अनागोंदी झाली , एकनाथ शिंदे यांनी गोरगरिबासाठी सरकार आणले
दीड वर्षाच्या नील निखिल भालेरावने 2 मिनिट 53 सेकंदात जगातील सुमारे 45 कार ब्रँडची ओळख देत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद केली आहे.
नील भालेरावने केलेला विक्रम हा केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता भविष्यातील त्याच्या आणखीन प्रयत्नांकडे लक्ष वेधणारा आहे.
लहान वयात मोठ्या प्रमाणावर स्मरणशक्तीद्वारे नावे लक्षात ठेवत त्याला आत्मविश्वासाने सादर करणे ही बाब उल्लेखनीय असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणे ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे.पण एवढ्या लहान वयात नोंद झाली असून त्याचं महत्व अधिकच आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिकेची निवडणूक यंदा चुरशीची ठरणार आहे. राज्य आणि स्थानिक पातळीवरील बदलती राजकीय समीकरणे, पदाधिकाऱ्यांतील बदल आणि शिवसेना राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेला राजकिय वाद या पातळीवर निवडणुक प्रचाराची रंगत वाढत आहे. यामुळे महाड शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी भाजप युती आणि इतर पक्षीय उमेदवार आपापल्या मतदारसंघात जोरदार प्रचार करीत असून निवडणुक निकालाची महाडकरांची उत्सुकता शिगेला पोहोचत चालली आहे.
नाशिकच्या कुंभमेळयाचे टेंडर निघाण्या आधी पालकमंत्री नेमला जाईल, अशी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी महायुती सरकारला लगावला आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात प्रचंड पैसा खर्च होणार,त्यामध्ये कोणाचा पालकमंत्री असला पाहिजे यातून वाद असण्याची शक्यता आहे, अंतर्गत वाद मिटल्यावर,टेंडर निघण्याच्या आधी पालकमंत्री पद नेमला जाईल,असा टोला नाशिकच्या रिक्त असलेल्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांनी लगावला आहे,ते सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये बोलत होते.
निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती आक्रमक
शेकडो धरण विरोधक संघर्ष समितीचे समर्थन घटनास्थळी
निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद पडलं
बीडच्या माजलगाव मध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. यानंतर एका शेतकऱ्याने ऊसाला भाव मिळत नाही म्हणत जय जवान, जय किसान अशा घोषणा दिल्या. यानंतर तात्काळ पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
सध्या माजलगावमध्ये ऊस उत्पादकांचे आंदोलन पेटलेले आहे. ऊसाला चार हजार रुपयांचा भाव देण्यासाठी ऊस उत्पादकांनी आंदोलन सुरू केलेले आहे.
निम्न पैनगंगा प्रकल्प धरण विरोधी संघर्ष समितिची सकारात्मक चर्चा न झाल्याने पोलिस बंदोबस्त झुगारून समितीचे पदाधिकारी आता घुसले
पैनगंगा नदीवर तणावाची स्थिती
विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढला पळ
पोलिस बंदोबस्त वाढवला,तणावाची परस्थिती
विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी, भोर शहरातील प्रमुख बाजारपेठ मार्गांवरून आणि संवेदनशील भागातून काढला रूटमार्च
गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा वचक असावा तसेच परिसरात निवडणूकीच्या काळात काही अनुचित घटना घडू नये या करिता भोर पोलिसांकडून या रूटमार्चचे आयोजन
मतदार राजांनी कोणत्याही धमक्या तसेच कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, पोलिसांकडून नागरिकांना आवाहन..
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि तळोदा शहरांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महासंकल्प सभा आयोजित केली होती. तळोदा नगर परिषदेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी,आणि शहादा पालिकेत नगरपाध्यक्ष पदाचे उकेदवार मकरंद पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांनी ही सभा घेतली. विशेष म्हणजे, याच तळोदा शहरात, दोन दिवसांपूर्वी, भाजप उमेदवारीचा विरोध करणाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक जाहीर सभा घेतली होती. या पार्श्वभूमीवर, गिरीश महाजन यांच्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सासवड नगर परिषदेसाठी दोन तारखेला मतदान होत आहे. सासवड नगरपरिषद ही देशात स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकाने आलेली नगरपरिषद आहे. या ठिकाणच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. सासवड नगर परिषदेमध्ये गेली वीस वर्ष जगताप यांची एक हाती सत्ता राहिली आहे. जगताप काँग्रेसमध्ये होते ते आता भाजपमध्ये गेले आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत सासवडमध्ये पाहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदेंची जोडी म्हणजे फेविकॉलचा जोड,एक विचाराने काम करतात
सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन समजत होतो,चीफ मिनिस्टर म्हटल्यावर सोन्याची शिंगे येतात का एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याबाबत फडणवीसांवर रोख आहे का विचारलं असता भाष्य
तर ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात सुरूच आहे,परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शेवगाव मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आले होते यावेळी शेवगाव येथे झालेल्या जाहीर सभेत पुन्हा लाव रे तो फोन म्हणत पाणी पुरवठा गुलाबराव पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन लावला..शेवगाव मधील पाणी पुरवठा योजना आणि एमआयडीसीच्या प्रश्नाबाबत दोन्ही मंत्र्यांना फोन लावून शेवगाव मधील नागरिकांना दोन्ही काम मार्गी लागतील असे आश्वासन दिले
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती मधील पक्षा सोबतच
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी थोपटले महायुती मधील नेत्यांच्या विरोधात दंड
भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांना धमकावत असल्याने लेडी डॉन असल्याचे वक्तव्य केल
संतोष बांगर यांनी पोलिस घरी आल्याचे खोटे सांगत सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला
सांगली जिल्ह्यातील अरुण-ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत भाजप महायुतीच्या प्रचारार्थ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दुचाकीवरून प्रवास करुन घरोघरी संपर्क केला. यावेळी प्रत्येक भेटीत ना. पाटील यांचे ही उत्साहात स्वागत करण्यात आले.
- मका व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला..
- मका आणि कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी रोखला मुंबई आग्रा महामार्ग..
- मका आणि कांदा भावातील घसरणीमुळे शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला असल्याने शेतकऱ्यांचा संताप..
- शासकीय मका खरेदी करावे, कांद्याला हमी भाव द्यावा ही मागणी करीत शेतकऱ्यांनी रस्ता रोको करीत दिले शासनाला निवेदन..
- पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या मध्यस्थी सुरू..
-
भंडाऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या एका उमेदवारीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एकाच प्रभागात आणि ती ही पती-पत्नीला...भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने थेट नवरा - बायकोला एकाच प्रभागातून उमेदवारी दिल्यानं या निवडणुकीकडे भंडाराकरांच्या नजरा लागलेल्या आहेत. अरुण भेदे आणि त्यांची पत्नी अपर्णा भेदे या दोघांना राष्ट्रवादीने एकाच प्रभागातून उमेदवारी दिली आहे. दोघेही पती-पत्नी एकमेकांसोबत नगराध्यक्षपदाच्या सुषमा साखरकर यांच्यासाठी मत मागत डोअर टू डोअर प्रचार करत मतं मागत आहेत. पती - पत्नी नं निवडणूक प्रचारात चांगलच आघाडी घेतली असून विरोधकांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. नवरा बायकोच निवडणूक रिंगणात असल्यानं संपूर्ण भंडाराकरांचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.
बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या दोन महिलांना पैशांची पाकीट वाटताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रगेहात पकडल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ही घटना बदलापूर पश्चिम भागतील पनवेलकर संकुल परिसरात घडली. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केलाय. सीमा कबूल आणि सुनिता चौधरी असं गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. पैसे वाटपावरून प्रभाग क्रमांक 1चे शिवसेना उमेदवार तुकाराम म्हात्रे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली होती.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये दाखल.
संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त त्यांनी संतोष देशमुख यांच्या फोटोला पुष्पहार वाहत नतमस्तक झाले.
संतोष देशमुख यांना हत्या होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे.
बीड -
भाजप आमदार सुरेश धस यांच्या गळ्यात पडून धनंजय देशमुख धाय मोकलून रडले
संतोष देशमुख यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे
निमित्ताने भाजप आमदार सुरेश धस मस्सा जोग मध्ये दाखल झाले आहेत
आमदार सुरेश धस यांच्यासमोर धनंजय देशमुख धाय मोकलून रडले
दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनी परिसरात असलेल्या अर्थव संकुलातील गणेश मंदिरात असलेली दानपेटी तील पैसे चोरण्याचा प्रयत्न चोरट्याचा फसला.
देवाला साक्षी ठेवून चोरी करत होता.
दानपेटी वर उचलून देखील पैसे न आल्याने चोरट्याने दानपेटी तशीच ठेवून मंदिरातील गाभाऱ्यातून पलायन केले आहे.
मात्र मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात चोरट्या आपले कृत्य करताना दिसून आले आहे. प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
सयाजी शिंदे -
- नाशिककरांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा
- झाडं आपले आई वडील
- तपोवनातील एकही झाड तुटू देणार नाही
- जगात एकच सेलिब्रिटी ते म्हणजे झाड
- नाशिककरांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील सर्व पर्यावरणप्रेमींचा पाठिंबा
- तुम्ही आवाज द्या आम्ही नाशिकला येऊ
नागपूर -
- संक्रांतीच्या सणाला दीड महिना शिल्लक असला तरी नायलॉन मांजाच्या तस्करीला सुरुवात
- पोलीस कारवाईच्या भीतीने आधीच व्यापारी करत आहे मांजाची आयात
- जीवघेण्या नायलॉन मांजावर बंदी असताना देखील लपून होते शहरात नायलॉन मांजाची विक्री
- पोलीस कारवाई करत असताना देखील लाखो रुपयांच्या मांजाची होते शहरात विक्री....
- वेळ असतानाच पोलिसांनी कडक उपाय योजना करून तस्करांची मुस्के आवळण्याची गरज.
नाशिक -
- अभिनेते सयाजी शिंदे करणार नाशिकच्या तपोवनमधील वृक्षांची पाहणी
- कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारण्याकरता करण्यात येणार आहे 1800 झाडांची कत्तल
- झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला पर्यावरणप्रेमीसह काही नाशिककरांचा विरोध
- अभिनेते सयाजी शिंदे तपोवनातील वृक्षांची पाहणी करून पर्यावरण प्रेमीसोबत करणार चर्चा
- वृक्ष वाचवण्यासाठी पुढील दिशा ठरवली जाणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांची गडचिरोली येथे आज जाहीर प्रचार सभा
मुख्यमंत्र्यांची प्रचार तोफ आज गडचिरोली येथे धडाडणार
गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज येथील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार प्रचार सभा
मतदारांना देवेंद्र फडणवीस काय संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष
महायुती व महाविकास आघाडी यांनी एकला चलो चा नारा दिल्यामुळे फडणवीस मतदारांना काय आवाहन करणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा चोख बंदोबस्त
जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांकडे सर्वांचे लक्ष
पुणे
पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांची बैठक झाल्याची माहिती
स्थानिक पातळीवरील दोन नेत्यानी एकत्रित बसून चर्चा केल्याची माहिती
मात्र प्रशांत जगताप जे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत त्यांचा मात्र एकत्र येण्यास विरोध
दोन राष्ट्रवादी एकत्र फायदा होवू शकतो नेत्यांच मत
मात्र पवारांच्या राष्ट्रवादी पण दोन मत प्रवाह
एक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढा एस म्हणतोय तर दुसऱ्या गटाचा विरोध आहे
अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यास अनुकूल असल्याची माहिती
कोल्हापूर -
पन्हाळगडाच्या पायथ्याशी ढगांची मखमली दुलई; कोल्हापूरमध्ये स्वर्गच अवतरला
बांधिवडे गावावर ढगांची चादर; निसर्गाच्या नयनरम्य कलेचं मोहक दर्शन
थंडीची चाहूल… आणि डोंगरदऱ्यांवर ढगांचं अविस्मरणीय राज्य!
कोल्हापूरचं स्वर्गीय सकाळचं दृश्य; वनराई आणि ढगांचा अद्भुत मिलाफ
Saam TV कॅमेऱ्यात कैद झालं ढगांचं स्वर्गीय साम्राज्य!
धाराशिव-
दोन भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याच नुकसान
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर हल्लाबोल
एक पाण्यात उतरून रील बनवतो,तर दुसरा सोशल मीडियावर स्वतः स्वतः ची पाठ थापटून घेतो
उमरगा येथील शिवसेनेचे किरण गायकवाड यांच्या प्रचारसभेत बोलताना ओमराजे निंबाळकर आणि राणाजगजितसिंह पाटलांवर सरनाईक यांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड -
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे आज प्रथम पुण्यस्मरण
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.
प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानिमित्त समाधान महाराज शर्मा यांचा मस्साजोग मध्ये कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे.
मस्साजोग मध्ये आज मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके उपस्थित राहणार आहेत.
अमरावती-
मला एक जण म्हणाला तुम्ही हिंदुत्ववादी नेते आहे तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात बोलता
मात्र दर्यापूरमध्ये मुस्लिम उमेदवार दिला आहे
मी त्यांना सांगितलं भारतीय जनता पक्षाचा माणूस, भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता आणि मी स्वतः देखील मुस्लिमांच्या विरोधात नाही
पण जे जिहादी असतील त्यांच्या विरोधात मात्र निश्चितपणे आहे
अंजनगाव सुर्जी येथील प्रचार सभेत भाजप नेते अनिल बोंडे यांचं वक्तव्य
आम्ही कलामचे समर्थक आहे कसाबचे समर्थक नाही..
पुणे -
पुण्यात थंडीचा पारा घटला
मात्र १ डिसेंबर पासून राज्यात थंडी वाढणार
किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे
पुढील तीन दिवसात २ ते ३ अंश सेल्सियसने तापमानात घट होणार आहे
पुणे -
खारगे समितीचा अहवाल हा डिसेंबरमध्ये सादर होणार
६ डिसेंबर आधी हा अहवाल सादर होणार आहे अशी माहिती आहे
एक महिन्याची मुदत ही या समितीला देण्यात आली होती
आवश्यक असलेले संबंधित विभागाने अहवाल प्राप्त झालेले नाहीत
त्यामुळे अहवाल सादर होण्यासाठी थोडा अवधी आ
पुणे -
राज्यातील शाळांची एकच वेळी होणार पटपडताळणी
१५ डिसेंबरपर्यंत शिक्षण विभागाने दिली मुदतवाढ
अनियमितता आढळल्यास थेट कारवाई केली जाणार आहे
चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांची नोंद आढळल्यास थेट कारवाई करणार
एकच वेळेस राज्यात होणार विद्यार्थ्यांची पट पडताळणी
ठाण्यातील भाईंदर पाडा याठिकाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये आग
उभ्या करण्यात आलेल्या 3 दुचाकींना आग लागल्याची घटना
पहाटेच्या सुमारास लागली आग
सदरची आग आटोक्यात आणण्यात आली आहे
पण दुचाकी जळून पूर्णपणे खाक झाल्या आहेत
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.