Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : नाशिकला पुढील पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, फलटणमध्ये बीडच्या महिला डॉक्टराची आत्महत्या, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Nashik : नाशिकला पुढील पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट

- नाशिक शहरात पावसाला सुरुवात, नाशिकला पुढील पाच दिवस देण्यात आलाय पावसाचा यलो अलर्ट

- संध्याकाळनंतर अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ

- नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

- पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत

मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

कोकणात गेलेले पर्यटक, चाकरमानी परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीत आडकले.

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी

माणगाव आणि इंदापुर जवळ वाहतूक ठप्प

मागील दीड तासांपासून वाहने वाहतुक कोंडीत अडकली

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात कारचा अपघात

मावळ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुल्याने कारने रस्ता दुभाजकाला जोरदार धडक दिली. कारमधील दोघेही सुखरूप आहेत. कोणतीही जीवितहानी नाही. मात्र या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. 44 किलोमीटर मुंबई लेनला हा अपघात झाला. या घटनेनंतर महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बंजारा समाज आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरणार

येत्या नऊ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क बंजारा समाजाचा मेळावा आयोजित केला जाणार आहे बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी हा मेळावा बंजारा समाजाकडून करण्यात येणार आहे मुलुंड मध्ये बंजारा समाजाचे नेते यासाठी एकत्र आले होते आणि नऊ तारखेच्या मेळाव्याची रूपरेषा यावेळी ठरविण्यात आली. माझी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पुत्र निरंजन नाईक हेदेखील या आरक्षणाच्या लढ्यात आता उतरले आहेत.

मराठवाड्यातील कारखान्यांनी ऊसाला ३३०० रुपये भाव द्यावा, राजु शेट्टी यांची मागणी

यावर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम पूर्णतः गेलाय त्यामुळे शेतकऱ्यांना आता आशा आहे ती उसाकडून ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऊस लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांना मराठवाड्यातील कारखानदारांनी 3300 रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी परभणीत केली आहे

डॉक्टर हत्या प्रकरण; विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल

भरदिवसा युवकाची हत्या, शेगाव हादरले

बुलढाण्यातील शेगाव शहरातील चिंच परिसरात थोड्याच वेळापूर्वी युवकाची भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नितीन गायकवाड असं या हत्या करण्यात आलेल्या युवकाच नावं असून तो मूळचा वाशीम येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे,हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजा नुसार जिल्ह्यातील मनमाड,मालेगाव,दिंडोरी,भागात संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला,झालेल्या पावसाने कांद्याच्या शेतात मात्र चांगलेच पाणी साचले असून पाऊस असाच सुरू राहिल्यास नवीन लागवड केलेल्या कांद्याला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

अकोल्यात तब्बल 2 तास मुसळधार पाऊस

अकोल्यात दुपारीनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावलीय.. अकोला शहरासह ग्रामीण भागात तब्बल दीड तास मुसळधार पाऊस सुरू होता.. या पावसामुळे अकोलेकरांची मोठी धावपळ उडाली.. अकोल्यातील उमरी, जठारपेठ, टावर चौक रस्त्याला नदीचे स्वरूप आलंय.. या रस्त्यावर तब्बल दीड फूट पाणी वाहत असल्याने वाहन चालवण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे..

एक तारखेआधी जमीन व्यवहार रद्द करा; जैन मुनींची मागणी

मोहोळ यांच्यावर आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ जैन हॉस्लटमध्ये दाखल झालेत. मुरलीधर मोहोळ जैन गुरूंचं दर्शन घेतलं.

दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

मुख्याधिकारीच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठिय्या आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीरधवल जगदाळे आक्रमक

मतदारयादीतील नावे कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात टाकल्याने मुख्याधिऱ्यांना विचारला जाब

निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार दौंडचे मुख्याधिकारी कामकाज करीत नसल्याने विचारला जाब

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले आहे. "साराभाई व्हर्सेस साराभाई" या लोकप्रिय मालिकेतल्या इंद्रवदन साराभाई या त्यांच्या भूमिकेमुळे ते घराघरात परिचित झाले होते.

सतीश शाह यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत जाने भी दो यारो, मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, कल हो ना हो यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये विनोदी आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे हादरे

हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे हादरे

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा सिंदगी, बोल्डा पिंपळदरी परिसरात भूकंप

भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसल्याने ग्रामस्थ आदरले

प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

भरधाव कार ने पिकअप ला दिली धडक, दोन जण गंभीर जखमी..

सलग सुट्या असल्याने शेगाव ला जाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे त्यामुळे खामगाव वरून शेगाव ला जाणाऱ्या वाहणाची गर्दी वाढली असल्याने भर धावं वाहणे धावताना दिसत आहे , अशीच एक कार भर धावं वेगाने शेगाव कडे जात होती पुढे पिकअप वाहन जात होते स्पीड ब्रेकर वर वाहन हळू चालवणे आवश्यक असताना भर धाव कार ने पिकअप ला मागून जोरदार धडक दिली या अपघातात पिकअप वाहन पलटी झाले तर कार चे मोठे नुकसान झाले या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र दोन जण गांभीर जखमी झाले आहेत.. त्यांना उपजिल्हा सामान्य रुग्णाल्यात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे...

२८ ऑक्टोबरपर्यंत प्रशांत बनकरला पोलीस कोठडी

साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्याप्रकरणी प्रशांत बनकरला पोलिसांनी कोर्टात हजर केलंय. कोर्टानं आरोपी बनकरला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nanded: नांदेड जिल्ह्यात तुफान पाऊस

नांदेड जिल्ह्यात तुफान पाऊस.

नांदेडच्या देगलूर येथे राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश सोहळ्याला पावसाचा विघ्न.

अजित पवार यांच्या भाषणाला सुरुवात होतात पावसाची जोरदार हजेरी.

महिला आणि पुरुषांनी पावसापासून बचाव करण्यासाठी घेतल्या डोक्यावर खुर्च्या.

Washim: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि रिसोड तालुक्यात पाऊस बरसला

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि रिसोड तालुक्यात पाऊस बरसला

वाशिमच्या मालेगाव आणि रिसोड तालुक्यातील मेडशी, वाकद परिसरात पाऊस पडला आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळणार असला तरी, काही ठिकाणी राहिलेल्या खरिपातील सोयाबीन पिकाचं नुकसान होण्याची शक्यता तर तूर आणि हळद पिकांसाठी मात्र हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

Yavatmal: यवतमाळमध्ये परतीच्या पावसामुळे वेचणीस आलेला कापूस भिजला

यवतमाळ -

यवतमाळमध्ये परतीच्या पावसामुळे वेचणीस आलेला कापूस भिजला

यवतमाळच्या बाभुळगांव तालुक्यातील नांदुरा इथे पावसाची जोरदार हजेरी,हवामान विभागाने दिला होता पावसचा इशारा

बाभुळगांव तालुक्यातील नांदुरा परिसरात परतीच्या पावसाने लावली जोरदार हजेरी,पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला

Jalna: अखेर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

जालना -

अखेर शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

विजय चव्हाण यांच्या 13 मागण्यापैकी 3 मागण्या पंकजा मुंडेंकडून मान्य....

मंत्री संजय राठोड, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

मागील नऊ दिवसापासून सुरू होत आमरण उपोषण....

बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू होत उपोषण....

सोमवारी किंव्हा मंगळवारी मुख्यमंत्र्यासोबत बंजारा समाजाची बैठक होणार....

Buldhana: बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोयाबीन भिजले

बुलडाणा -

बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस

शेतात काढून ठेवलेली सोयाबीन भिजले

मेहेकर, चिखली, बुलढाण्यासह काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली .

आज बुलडाणा जिल्ह्याला येलो अलर्ट

Nashik: महानुभावांचा कुंभमेळा नाशिकमध्ये घ्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

नाशिक -

- महानुभावांचा कुंभमेळा नाशिकमध्ये घ्या

- नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यापूर्वी आमचा कुंभ पार पाडा

- महानुभाव पंथांच्या 38 व्या परिषद अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करण्यात आली मागणी

Solapur: सोलापुरात शरद पवार यांचे आमदार अजित पवार गटाच्या मंचावर उपस्थित

सोलापूर -

राष्ट्रवादी शरद पवार यांच्या आमदार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मंचावर उपस्थित..

विधानसभा विधिमंडळाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या कार्यक्रमाला हजेरी

शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची महायुतीतल्या नेत्यांची वाढती जवळीक

मोहोळची माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने हे भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मंचावर राजकीय चर्चेला उधाण..

Pune: निलेश घायवळची कार पोलिसांनी केली जप्त, खर्डा गावात ऊसाच्या शेतात लपवली होती

पुणे -

निलेश घायवळची कार पोलिसांनी केली जप्त

अहिल्यानगर येथील जामखेड भागातील असलेल्या खर्डा गावातून कार केली जप्त

ही कार घायवळ आणि त्याच्या सदस्यांनी उसाच्या शेतात लपवली असल्याची माहिती

याच कारवर निलेशने बॉस अशी नंबर प्लेट लावून वापरली होती

Pune: रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज, पक्षश्रेष्ठी यांच्याकडे तक्रार

पुणे -

रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज

कार्यकर्ते आणि मुख्य पदाधिकारी करणार पक्ष श्रेष्ठी यांच्याकडे तक्रार

पुण्याचे नाव खराब होत असल्याने तसेच महायुती मध्ये रवींद्र धंगेकर अडचणी चे ठरत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा छुपा सूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा पुणे शहर भाजप चे मुख्य पदाधिकारी करणार तक्रार

वरिष्ठ नेत्यांनी तात्काळ यात लक्ष घालण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी

Nashik: आमचे मार्गदर्शक भुजबळसाहेब, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे विधान 

नाशिक -

- भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप म्हणाले आमचे मार्गदर्शक भुजबळ साहेब

- गिरीश महाजनांचे नाव घेण्याऐवजी घेतले भुजबळांचं नाव, महाजन यांचं नाव घेत लागलीच केली सुधारणा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन व्यासपीठावर असतांना झाला गोंधळ

- अखिल भारतीय महानुभाव पंथाच्या अधिवेशनात बाळासाहेब सानप करत होते प्रास्ताविक

Raigad: मुंबई -गोवा महामार्गावर सलग 5 व्या दिवशी वाहतूक कोंडी, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

रायगड -

० मुंबई गोवा महामार्गावर सलग पाचव्या दिवशी वाहतूक कोंडी

० दिवाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याना वाहतूक कोंडीचा फटका

० मुंबई गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या मार्गीकेवर वाहतूक कोंडी

० माणगाव शहर ते तिलोरे फाटापर्यंत वाहनांच्या रांगा

० दिवाळी सुट्टीसाठी चाकरमानी आणि पर्यटक निघाले कोकणात

० वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने कोंडीचा फटका

० पुण्याहून येणाऱ्या रोडवर देखील 4 किलोमीटरच्या रांगा

दिवाळी संपली! भिडे पूल पुणेकरांसाठी बंद

दिवाळीपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खुला केलेला भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे

डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनला जोडल्या जाणाऱ्या पुलाचे काम सुरू केल्यामुळे भिडे पूल बंद

भिडे पूल बंद झाल्यामुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर ताण येण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: पीएसआय गोपाळ बदनेच शेवटचं लोकेशन सापडलं

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच शेवटचं मोबाईल लोकेशन पंढरपूर असल्याचे समोर आले आहे.

काल गोपाळ बंदने पंढरपुरात आल्याची माहिती आहे. पोलिसांना हि माहिती मिळताच बदनेचा शोध सुरू केला आहे.

पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी बदनेच्या शोधासाठी एक टीम तैनात केली आहे. अद्याप तरी गोपाळ बदने पोलिसांना सापडला नाही.

निंबाळकर काय म्हणाले?

फलटण मधील घटनेच्या आरोपींना फास्टट्रॅक कोर्टात उभं करावं आणि कठोर शिक्षा द्यावी तसेच याप्रकरणी चारी बाजूने म्हणजेच फोर डायमेन्शनल चौकशी सरकारने केली पाहिजे अशी भूमिका माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे

ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून विरोधातील पक्षांचा सहारा घेत सत्ताधारी पक्षांना डिवचण्याचा प्रयत्न..

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये वारंवार ठाकरे गटाकडून सत्ताधारी पक्षांना डिवचण्यात येत आहे... अशातच पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून विरोधी पक्षांचा सहारा घेत ठाण्यातील तीन हात नाका येथे एक बॅनर लावलेला आहे या बॅनर वर ही सर्व वक्तव्य सांगून जातात जिथे फायदा तिथे आम्ही युती करू जिथे फायदा नाही तिथे युती करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच एक विधान दर्शवण्यात आल आहे तर दुसरीकडे महा आघाडीतील विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडायचे काम चालू आहे असे खासदार नरेश मस्के यांचा एक विधान दाखवण्यात आले आहे तर त्याच्या खालच्या बाजूला अच्छा लगा ईडीसीबीआय चुनाव आयोग फौज तो तेरी सारी हे पर जंजीर मे जाखडा राजा मेरा अभी सबपे भारी है असा टोला ठाकरे कडून विरोधकांना लगावला आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने हा बॅनर लावला असून त्या बॅनरवर विरोधी पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांचा फोटो व ठाण्यातील देखील विरोधातील वरिष्ठ नेत्यांचा फोटो लावल्याचे दिसून येत आहे

दिवाळी संपली! भिडे पूल पुणेकरांसाठी बंद

दिवाळी पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खुला केलेला भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे

डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनला जोडल्या जाणाऱ्या पुलाचे काम सुरू केल्यामुळे भिडे पूल बंद

भिडे पूल बंद झाल्यामुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर ताण येण्याची शक्यता

धमकीचा व्हिडिओ व्हायरल, मुलुंडमध्ये दहशत!

सोशल मीडियावर सध्या मुलुंडचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बलबीर सिंग लांबा उर्फ गिन्नी हा व्यक्ती “मी पाच वेळा तडीपार झालो, माझ्यावर 307 चा केस आहे, तरी मी इथेच आहे” असे खुलेआम म्हणताना दिसतोय. या धमकीच्या व्हिडिओमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे चांदूर रेल्वे बाजार समिती भिजले सोयाबीनचे पोते

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती त एकच गोंधळ उडाला, खुल्या मैदानात ठेवलेले हजारो क्विंटल सोयाबीनचे पोते पावसात भिजल्याने शेतकरी व व्यापारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला, दिवाळीमुळे सोयाबीनची आवक मार्केटमध्ये वाढल्याने सोयाबीनचा लिलाव हा खुल्या मैदानात करावा लागला त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने सोयाबीनचे संपूर्ण पोते भिजल्याने शेतकर्यांचे व व्यापाऱ्याने नुकसान झाले आहे.

रविंद्र धंगेकर यांची मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा टीका

माध्यमासमोर बोलताना मोहोळ यांनी माझ्यावर एक ही गुन्हा दाखल नाही आणि धंगेकर यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत एस विधान केले होते. त्यावर आता रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर किती आणि कोणते गुन्हे दाखल आहेत हे समोर आणले आहेत. मोहोळ हे किती खोट बोलतात याच उदाहरण देत धंगेकर यांनी पुन्हा मोहोळ याना घेरले आहे….

अमरावतीत खासगी बाजारात कापसाला 7 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल भाव 

विदर्भात कापसाच देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतल्या जातं, सध्या बाजारात नवीन कापूस आला आहे, तर दुसरीकडे शासकीय सीसीआयची कापसाची खरेदी अद्याप सुरू झाली नाही, मात्र अमरावतीच्या महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंग मध्ये व्यापाऱ्याद्वारे कापसाला प्रतिक्विंटल 7 हजार 500 रुपये इतका भाव दिला, त्यामुळे आमदार रवी राणा यांनी महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंग मध्ये या कापूस खरेदीचा शुभारंभ केला, आज 15 शेतकऱ्यांनी आपला कापूस या महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंग प्रेसिंग मध्ये विक्रीसाठी आणला. यावेळी रवी राणा यांनी शेतकऱ्यांची संवाद साधत इतर ठिकाणी कमी भाव कापसाला मिळत असल्याने सध्या इतर ठिकाणी खाजगी बाजारात कापूस विक्री करू नका, लवकरच शासकीय सीसीआयची कापसाची खरेदी चालू होईल अशी माहिती रवी राणा यांनी दिली

दिवाळी सुट्ट्यांमुळे पंढरपुरात गर्दी

दिवाळी सुट्ट्यांमुळे पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी वाढली आहे. विठ्ठल रूक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर गेली आहे. संत नामदेव पायरी,महाद्वार परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मुख दर्शनासाठी ही भाविकांनी रांगा लावल्या आहेत.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. कारण अस्पष्ट असले तरी राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. बीएमसी जागावाटपासाठी शिंदे दिल्लीवारीसाठी गेल्याचे बोलले जातेय.

बछड्याच्या विरहात वाघीण चवताळली धावत्या दुचाकीस्वारावर घातली झडप

चंद्रपूर - मुल महामार्गावरील केसलाघाट परिसरात चार दिवसांपासून एक वाघीण बछड्यासह मुख्य मार्ग ओलांडताना धुमाकूळ घालत आहे. एका दुचाकीवर धाव घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काल सायंकाळच्या सुमारास त्याच वाघिणीने धावत्या दुचाकीवर झडप घातल्याने एक जण जखमी झाला. नागेश चंद्रशेखर गायकी (५२) असे जखमीचे नाव आहे. या घटनेने नागरिकांत प्रचंड दहशत पसरली असून, वनविभागाने वाघिणीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. वाघिणीने त्याच्यावर हल्ला केल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

ऐन दिवाळीत प्रकार जळगावात पोलिस मल्टीपर्पज हॉलमध्ये धिंगाणा

काही दिवसांपूर्वीच ज्या पीयूष मणियारच्या कृत्यांमुळे शस्त्रपरवाना रद्द करण्याची शिफारस पोलिसांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे केली आहे, त्याच पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्याने पोलिसांच्याच मल्टीपर्पज हॉलमध्ये ऐन दिवाळीत कमरेला पिस्तूल लावून एका सुफी गायकावर नोटा उधळल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर मात्र, तो जळगावातून पसार झाला आहे.शहरातील तीन यू-ट्यूब न्यूज चॅनलतर्फे पोलिस मुख्यालय येथील पद्मालय हॉलमध्ये 'दिवाली सुफी नाईट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रतलामचे कव्वाली गायक शफीक मस्तान याच्यावर पीयूष मणियार याने पैशांची उधळण केली. या वेळी मात्र पीयुषच्या कमरेला पिस्तुल लटकलेले दिसते. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर जळगाव येथील जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी शस्त्र अधिनियम १९५९चे कलम ३० तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

JALNA -राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज घेणार बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची भेट...

राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची भेट घेणार आहे. सकाळी 11 वाजता हे शिष्टमंडळ चव्हाण यांची भेट घेईल. या शिष्टमंडळात मंत्री संजय राठोड, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे. राज्याच्या वतीने हे सर्वजण उपोषणकर्त्यांशी चर्चा करतील. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी विजय चव्हाण जालन्यात आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. दरम्यान, आज होणाऱ्या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघून आमरण उपोषण मागे घेतले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले

यवतमाळ जिल्ह्यात 48 हजार लाडक्या बहिणींना क्लीन चिट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 52 हजार अपात्र महिलांचा समावेश असल्याचा संशय होता या प्रकरणात महिला व बालकल्याण विभागाने चौकशी सुरू केली होती,या चौकाशीत 3 हजार 700 महिला अपात्र आढळल्या तर 48 हजार लाडक्या बहिणींना यात क्लीन चीट मिळाली आहे यामुळे या लाडक्या बहिणी मदतीला पात्र ठरल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात एक हप्ता वळता करण्यात आला आहे.

परळीमध्ये मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक मधील पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे मार्गदर्शन करणार आहेत बीडच्या परळी मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि दीपावली स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे

पाच दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर शनिवार व रविवार असे दोन दिवस पावसाचा अंदाज असतानाच हवामानातील बदलामुळे काही भागातही पावसाची शक्यता आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

या जिल्ह्यात यलो अलर्ट

२५ ऑक्टोबर : नाशिक, जळगाव,

अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर

२६ ऑक्टोबर : मुंबई, नाशिक, खान्देश,

अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड

२७ ऑक्टोबर : धुळे, मुंबई, नाशिक,

खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर

२८ ऑक्टोबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि नांदेड

YAVATMAL | शहर पोलिसांची कारवाई

घरफोडी प्रकरणातील सराईत चोरटा तसेच एका अल्पवयीन मुलाला यवतमाळ शहर पोलिसांनी ताब्यात घेतले,ताब्यात घेतलेल्या दोघांनी दोन घरफोडीची कबुली पोलिसांसमोर दिली त्यांच्याकडून जवळपास चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. साहिल घरत असे त्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

Maharashtra Live News Update: सोलापूर शहरात पुन्हा एका अतिवृष्टी

सोलापूर शहरात पुन्हा एका अतिवृष्टी सदृश पाऊस 

- शहरातील सकल भागात पाणी साचायला सुरुवात 

- शहरातील अवंती नगर, पूर्व भाग, नई जिंदगी, आसरा, जुळे सोलापूर, तुळजापूर रोड या भागात नागरी वस्तीत पाणी साचायला सुरुवात 

- महिन्याभरापूर्वी सोलापूर शहरात अश्याच पद्धतीने पाऊस झाल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले होते

- त्यानंतर पुन्हा एकदा सोलापूर शहरात मुसळधार पावसाने नागरिकांची दैना झाली 

- रात्रभर असाच पाऊस सुरू राहिला तर पुन्हा एकदा नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्याची भीती

KOLHAPUR | कागल ऊरूसात जायंट व्हील पाळणा अचानक पडला बंद, 5 तास नागरिक अडकले

कागल शहरातील श्री गहिनीनाथ गैबीपीर ऊरूसात शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकाराने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ऊरूसातील बापूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या एका जायंट व्हील पाळण्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पाळणा बंद पडला आणि त्यात बसलेले १८ नागरिक तब्बल 5 तास अडकून राहिले. कोल्हापूर महानगर पालिकेच्या अग्निशामन दलाच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नाने त्यांना सुखरूप खाली उतरले.

 भाजपात इनकमिंग, गडकरींनी कान टोचले

सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इंकमिंग सुरू आहे.. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कान टोचले..

- जुना कार्यकर्ता हा घरकी मुर्गी दाल बराबर तर बाहेरून आलेले सावजी चिकम मसाला असं म्हणत नागपुरी भाषेत पक्षाचा परिस्थितीवर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भाष्य केले... कळमेश्वर सावनेर भागात डॉ. राजीव पोतदार यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची आठवण करून देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष द्या असेही गडकरी यावेळी बोलताना म्हणालेत.

NAVI MUMBAI | आवक घटल्याने भाजीपाला तेजीत

दिवाळीच्या सुट्टीनंतर मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाला महागला आहे. Boo किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा २८० रुपये तर शेवगा शेंग १६० रुपयांवर पोहोचली असून, पालेभाजीच्या एक जुडीसाठीही २५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत.

मुंबई, नवी मुंबईकरांना पुरेसा भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी अपवाद वगळता, वर्षभर बाजार समितीमधील भाजीपाला मार्केट सुरू राहते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यवहार बंद ठेवल्यामुळे त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर झाला होता. रविवारी अनेक किरकोळ विक्रेत्यांकडे भाजीपालाच उपलब्ध नव्हता. शुक्रवारीही फक्त ५७८ वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी आला.

होलसेल आणि किरकोळ मार्केटमध्येही भाववाढ

आवक कमी झाल्यामुळे होलसेल आणि किरकोळ मार्केटमध्येही भाववाढ झाली. बीट, दुधी भोपळा, फरसबी, फ्लॉवर, गाजर, ढोबळी मिर्ची, वाटाणा यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. पालेभाज्यांच्या दरामध्येही वाढ झाली आहे. कोथिंबीर जुडी ३५ ते ४० रुपये, मेथी ३५ ते ४० रुपये, पालक २० ते ३० रुपये, शेपू २० ते २५ रुपये प्रति जुडी विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: दिवाळीचा फराळ महागात पडणार? 'या' राशींच्या व्यक्तींना आजारांचा सामना करावा लागणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Satara Doctor Case : मोगलाई व्यवस्थेनं घेतला डॉक्टरचा बळी? प्रशांत बनकरला बेड्या, गोपाळ बदने कधी होणार गजाआड? VIDEO

SRK Film Festival: 'देवदास' ते 'जवान', शाहरुख खानचे 'हे' चित्रपट पुन्हा होणार थिएटरमध्ये प्रदर्शित

Nitin Gadkari: ‘घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरच्यांना सावजी चिकन, भाजपमधील इनकमिंगवर गडकरींचा टोला

Prajakta mali Photos: प्राजक्ताचं सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

SCROLL FOR NEXT