Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२५, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स,   आजच्या ताज्या बातम्या, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यात थंडीची लाट, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

बुलढाण्यात 11 नगर परिषदांसाठी अध्यक्ष पदासाठी 85 तर सदस्य पदासाठी 1016 उमेदवार रिंगणात.

माघार घेतल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांसाठी अध्यक्ष पदासाठी 85 तर सदस्य पदासाठी 1016 उमेदवार अंतिमतः विविध पक्षांकडून रिंगणात उतरले आहेत. यात बुलढाण्यात अध्यक्षपदासाठी सात तर सदस्य पदासाठी 124, चिखली शहरात अध्यक्षपदासाठी 13 तर सदस्य पदासाठी 113, देऊळगाव राजा येथे अध्यक्षपदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 77, जळगाव जामोद येथे अध्यक्ष पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 85,खामगाव येथे अध्यक्ष पदासाठी सहा तर सदस्य पदासाठी 139,लोणार येथे अध्यक्ष पदासाठी आठ तर सदस्य पदासाठी सुद्धा आठ उमेदवार आहेत, मलकापूर नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी 10 सदस्य पदासाठी 125, मेहकर येथे अध्यक्ष पदासाठी सात तर सदस्य पदासाठी 131, नांदुरा येथे अध्यक्ष पदासाठी नऊ तर सदस्य पदासाठी 94, शेगाव येथे सदस्य पदासाठी 118 तर अध्यक्षपदासाठी तेरा तर सिंदखेड राजा नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी सहा तर सदस्य पदासाठी वीस उमेदवार रिंगणात आहेत. यावेळेस विविध राजकीय पक्षांकडून बंडखोरी टाळण्यासाठी अनेक अपक्षांच्या अर्ज भरण्यात आले होते . मात्र माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता चुरस वाढली आहे.

बिनविरोध विजयाचा झणझणीत जल्लोष — सुप्रिया पिंगळे यांचा मैत्रिणीं सोबत मिसळ पार्टीत हटके सेलिब्रेशन!

एकीकडे विजयाचा स्वाद मिसळीतही तितकाच झणझणीत असल्याचे अनुभवत गेल्या काही दिवसांपासून प्रचार, चर्चा, बैठका अशा राजकीय गोंधळातुन बिनविरोध निवडीनंतर पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये दिसल्या.स्थानिक मिसळ सेंटरवर झालेल्या या छोट्याशा सेलिब्रेशनमध्ये हास्य-विनोद, गप्पा आणि मिसळचा तिखट तडका सगळंच परफेक्ट होतं पण बिनविरोध निवडीनंतर अजुनच जबाबदारी वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय

धाराशिव नगरपरिषदेत शिवसेना-भाजपमध्ये तणाव

धाराशिव नगर परिषदेत युती होणार ही चर्चा सुरू होती मात्र शेवटच्या क्षणी या युतीत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. भाजपने पाठीत खंजीर खुपसला खुपसला असा आरोप शिवसेनिकांनी केला. त्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी रात्री शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत सोलापुरात बैठक घेतली. आज पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव येथे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. उमरगातही शिवसेना आणि भाजप समोरासमोर आहे. त्यामुळे पालकमंत्री सरनाईक कार्यकर्त्यांना काय संदेश देणाऱ्या कडे लक्ष लागले.

लांजा नगर पंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली

भाजप बंडखोर उमेदवारांची माघार नाहीच

जागावाटपात न्याय न मिळाल्यामुळे नगराध्यक्ष पदासह सर्वच जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात

महायुतीत शिवसेनेला नगराध्यक्षपदासह 15 जागा, राष्ट्रवादीला 1 तर भाजपच्या वाट्याला 1 जागा

भाजपला एकच जागा मिळाने भाजप कार्यकर्त्यांची नाराजी वाढली

भाजपची ताकद असतानाही शिवसेनेने आम्हाला फक्त 1 जागा दिली, विद्यमान 3 नगरसेवकांनाही विचारात घेतलं नाही.. अन्याय झाल्यामुळेच आम्ही रिंगणात.. आता माघार नाहीच

भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि माजी गटनेते संजय यादव यांनी स्पष्ट केली भूमिका

भाजप बंडखोर प्रियांका यादव नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

पुण्यात ज़ंगली महाराज रस्ता, गोखले रस्त्यावर अतिक्रमण कारवाई

महापालिकेने आज अचानक जंगली महाराज रस्ता आणि गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर अचानक कारवाई करून ५० पेक्षा दुकाने, हॉटेलचे शेड, पथारीवर कारवाई केली.

महापालिकेने काल संध्याकाळी या कारवाईची कोणालाही कुणकुण लागू न देता कारवाई केल्याने व्यावसायिकांची चांगलीच गडबड झाली. जंगली महाराज रस्ता, गोखले रस्त्यावर अर्बन स्ट्रीट प्रकल्पांतर्गत नव्याने पदपथ तयार करण्यात आले आहेत.

अनेक व्यावसायिकांनी पदपथांवर, साइड मार्जिनमध्ये आणि फ्रंट मार्जिनमध्ये शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे कठीण बनले होते आणि यासंदर्भात तक्रारी सातत्याने येत होत्या. महापालिकेच्या पथकाकडून या दोन्ही रस्त्यांवर अनेकदा कारवाई केली जाते.

AMBERNATH | अंबरनाथमध्ये भीषण अपघात; शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे जखमी

अंबरनाथ – बुवापाडा परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात शिवसेना शिंदे गटाच्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या उमेदवार किरण चौबे यांच्या गाडीचा गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत चौबे यांचे ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महानगरपालिकेचे दोन कर्मचारी आणि एका पादचारी नागरिकाचा मृत्यू झाला. किरण चौबे गंभीर जखमी असून त्यांच्यावर कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

राज्यातील तापमानात सध्या चढ – उतार सुरू आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या विस्तारीत अंदाजानुसार महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात ४ डिसेंबरपर्यंत तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. धुळे येथे शुक्रवारी राज्यातील सर्वात कमी ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली 

YAVATMAL | घाटंजी येथील त्या देशी दारूचा परवाना होणार रद्द

 यवतमाळच्या घाटंजी शहरातील मध्यवस्तीतील दुर्गा माता वॉर्ड परिसरात देशी दारू दुकानाची परवानगी रद्द करण्यात यावी यासाठी महिलांनी पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन परवाना रद्द करण्याची मागणी केली.दरम्यान पालकमंत्री राठोड यांनी सखोल चौकाशी करून संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

नगराध्यक्षपदासाठी 86 जण तर नगरसेवकांसाठी 1430 उमेदवार

यवतमाळ जिल्ह्यात चार वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर 10 नगरपरिषद व एका नगरपंचायतीसाठी निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झालीये, सत्ता आपल्याच पक्षाची यावी यासाठी नेते मंडळींकडून जोरकस प्रयत्न केले जात आहेत. अकरा नगराध्यक्षांसाठी 86 तर 293 नगरसेवकांसाठी 1 हजार 430 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम आहेत.आता खऱ्या अर्थाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा आखाडा तापमान आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहे.परतूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शांताबाई हिवाळे यांच्या प्रचारासाठी परतुर येथे अजित पवार यांची जाहीर सभा घेणार आहे.जालन्यातील परतूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट,ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या उमेदवार शांताबाई हिवाळे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सकाळी 11 वाजता परतुर येथे जाहीर सभा होणार आहे. अजित पवार जालन्यातून काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar: 12 महिन्यांनंतर ग्रहांचा राजा गुरुच्या घरात प्रवेश; 'या' राशींची तिजोरी संपत्तीने भरणार

Ladki Bahin Yojana: वडील-पती हयात नाही, त्या लाडक्या बहि‍णींनी e-KYC कशी करायची? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Makki Ki Roti Recipe : थंडीत घ्या गरमागरम 'मक्याच्या भाकरी'चा आस्वाद, 'ही' आहे पंजाब स्पेशल रेसिपी

राज्यात थंडीची लाट, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली|VIDEO

Mukta Barve : "शाळा सोडून किती वर्ष झाली..."; मुक्ताला कोणती स्वप्ने पडतात? काय दिसतं?

SCROLL FOR NEXT