पुणे -
२०२५ मधील नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लातूरमध्ये पोहोचल्याचा तपास यंत्रणांना संशय?
नीट पेपरफुटी प्रकरणात आर सी सी कोचिंग क्लासेसच्या मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या १९ विद्यार्थ्यांची चौकशी होणार?
नीट २०२५ मध्ये आर सी सी मधील 19 विद्यार्थ्यांना देशभरातील AIIMS संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्याचे आले समोर
“वन-ऑन-वन मेंटरिंग”च्या नावाखाली विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या होत्या का?
मागील वर्षीच्या मॉक टेस्ट आणि नीट प्रश्नपत्रिकेची तुलना करून पेपर फुटीबाबत तपास केला जाणार
तपास यंत्रणांना पेपर फुटीचे रॅकेटचे धागेदोरे मोटेगावकर यांच्याशी संबंधित असल्याचा दाट संशय
किल्ले रायगडावरील पायरी मार्ग 30 आणि 31 मे असे दोन दिवस बंद रहाणार
रायगड जिल्हाधिकारी यांची अधिसूचना जारी
पायरी मार्गावर दरडींचा धोका निर्माण होऊ नये म्हणून उपाय योजन
सैल झालेले दगड काढण्याचे काम केले जाणार
पुणे -
नसरापूर अत्याचार प्रकरण
आरोपीची मानसिकदृष्ट्या वैद्यकीय चाचणी करण्यास न्यायालयाची परवानगी
नसरापूर अत्याचार प्रकरणाची सुनावणी आज पार पडली
आरोपीच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर आज पहिल्यांदाच सुनावणी
आरोपी भीमराव कांबळे ला वकील देण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत
या प्रकरणाची नियमित सुनावणी २८ मे पासून होणार
हिंगोली -
डिझेलच्या रांगेत असलेल्या शेतकऱ्याने गळफास घेण्याचा दिला इशारा
शेतकऱ्यांनी हातात दोरी घेत खदखद बोलून दाखवली
हिंगोलीच्या कळमनुरी मधील प्रकार
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
अंधेरी पश्चिमेतील जुहू-वर्सोवा लिंक रोड परिसरात गुरुवारी एका बसने अचानक नियंत्रण गमावल्याने अनेक वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली.
या अपघातानंतर परिसरात काही काळ अफरातफर आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही
मात्र अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे विभागाने मोठी कारवाई करत पुणे रेल्वे स्थानकाजवळ प्रतिबंधित वन्यजीव प्रजातींची तस्करी उघडकीस आणली आहे.
या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून दुर्मिळ प्रजाती जिवंत अवस्थेत सापडल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आधी विद्यार्थी मग, प्राध्यापक म्हणून ज्या विद्यापीठात कार्यरत राहिले त्याच शिवाजी विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू होण्याचा सन्मान आज प्रा. डॉ. आर. के. तथा रजनीश कमलाकर कामत यांना लाभला. राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी डॉ. कामत यांची पुढील पाच वर्षांसाठी कुलगुरुपदावर नियुक्ती केली.
वाशिमच्या रिसोड इथ युवक काँग्रेसकडून सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं असून NEET पेपर फुटी प्रकरणी NTA वर कायमस्वरूपी बंदी घालावी, शेतकऱ्यांना पेट्रोल -डिझेल पुरवठा सुरळीत करावा आणि शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.
धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात
गेला अर्ध्या तासापासून वादळी वाऱ्यासह बरसल्या पावसाच्या सरी
उकाड्याने त्रस्त असलेल्या धाराशिवकरांना पावसामुळे दिलासा
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ
पावसामुळे अनेक भागातील विज पुरवठा खंडित
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता एक नवे आणि खळबळजनक वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जरांगे यांचे माजी सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांचे निकटवर्तीय पांडुरंग वसंतराव तारक यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय (ED) आणि आयकर विभागाकडे थेट लेखी तक्रार दाखल केली आहे.
आंदेकर टोळीतील ६ आरोपींना २७ मे पर्यंत पोलीस कोठडी
आरोपींचा आंदेकर टोळीशी संबंध नसल्याचा आरोपीच्या वकिलांचा दावा
काल कात्रज बालाजीनगर येथे अक्षय मस्के यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाला होता
याप्रकरणी गुन्हे शाखेने सहा रोकींना ताब्यात घेतले होते त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं
टिटवाळा येथील मांडा 90 फूट रोड परिसरात चाळ माफियांकडून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप फैयाज काबाडी या वयोवृद्ध जागामालकाने केला आहे. संबंधित जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही काही जणांकडून बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर येथील डॉक्टर मनोज शिरुरे याला काल सीबीआय ने पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर, आज पुन्हा त्याच्या औसा रोड येथील घराची सीबीआयच्या पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे, दरम्यान डॉक्टर शिरुरे यांच्या संपर्कात असलेल्या अंबाजोगाई येथील दोन विद्यार्थ्यांची डॉक्टर शिरूर यांच्या घरी सीबीआयच्या पथकाकडून चौकशी आहे
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात “लाडकी बहीण” योजनेचा लाभ शेकडो महिलांना मिळाला नसल्याने आज संतप्त महिलांनी तिवसा तालुका काँग्रेसच्या नेतृत्वात महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला.यावेळी महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रखडलेल्या अर्जांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी केली. “फॉर्म भरूनही खात्यात पैसे जमा झाले नाहीत,” अशी नाराजी लाभार्थी महिलांनी व्यक्त केली.
24 तासानंतर तिघांचेही मृतदेह सापडले
कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी शोध मोहीम राबवत तिघांचेही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले
कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे 21 वर्षीय प्रेम बागडी या तरुणाचा भोगावती नदीपात्रात पोहायला गेल्यानंतर झाला होता बुडून मृत्यू
करवीर तालुक्यातील वाकरे येथे 42 वर्षीय रमेश चौगुले याचा पाण्याचा प्रवाहातून वाहून गेल्याने झाला होता बुडून मृत्यू
सर राधानगरी तालुक्यातील काळमावाडी कॅनॉलच्या पाण्यामध्ये सनद वराटे या 30 वर्षीय युवकाचा झाला होता बुडून मृत्यू
या तिघांचेही मृतदेह बोटीच्या सहाय्याने गाळाचा वापर करून पाण्याबाहेर काढून उत्तरे तपासणीसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले.
परभणीत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने SIR आणि BLA नियुक्ती संदर्भात पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.आगामी हिंगोली-परभणी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात संघटनात्मक बांधणीसह निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी परभणीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना हिंगोली-परभणी विधानपरिषद मतदारसंघाची जागा ही शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याचा दावा केला. आगामी विधानपरिषद निवडणूक शिवसेनाच लढणार असून ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेलाच मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे महापालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने बेरोजगार दोनशे ते अडीचशे युवकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामध्ये महापालिकेच्या नावाने बनावट भरती प्रक्रिया राबवून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
नीटची परिक्षा होणार असल्याने क्लास पुन्हा सुरू
बुलढाणा जिल्ह्यात यंदा उष्णतेने विक्रमी पातळी गाठली असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्याचे घाटाखाली आणि घाटावर असे दोन भाग पडतात. घाटावरील भागात तापमान 43 ते 44 अंशांपर्यंत पोहोचले असून घाटाखालील भागात तापमान 45 ते 46 अंशांपर्यंत गेले आहे.
प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे लहान मुले, वृद्ध आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाशिम जिल्ह्यात सातव्या दिवशीही अनेक पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा कायम आहे. तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा 42,43 अंशावर पोहोचला असताना भर उन्हात शेतकरी डिझेलच्या मागणीसाठी पेट्रोल पंपा बाहेर रांगा करून उभे आहेत.
परभणी जिल्ह्यातील डिझेल टंचाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. परभणीच्या सेलू मध्ये पेट्रोल पंपावरही शेतकरी सकाळपासून रांगेत उभे असून, तासन्तास प्रतीक्षा करूनही डिझेल मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी पंपावर मोठी गर्दी असल्याने पंपावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
बुलढाणा जिल्ह्यात अभूतपूर्व अशी इंधन टंचाई निर्माण झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांना मशागतीसाठी ट्रॅक्टर मध्ये डिझेल मिळत नसल्याने भर उन्हात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन व इतरही वाहन चालक रांगा लावून उभे आहेत मात्र देशाचे पंतप्रधान विदेशात मेलोडी चॉकलेट वाटप करत आहेत... असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाने मलकापूर येथील पेट्रोल पंपावर रांगेत उभे असलेल्या वाहन चालकांना व ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना मेलोडी चॉकलेटचा वाटप करत उपरोधिक आंदोलन केल आहे.
संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचे १३ वे वंशज ह.भ.प. विठ्ठल महाराज देहुकर यांच्या अंतविधीचा कार्यक्रम पंढरपूर येथील चंद्रभागा नदी तीरावर अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी राज्यभरातून आलेल्या हजारो वैष्णव भक्तांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
- डारा जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअस.....
- वाढत्या उष्णतेने जनजीवन विस्कळीत...रस्त्यांवर शुकशुकाट..
- काल आणि आज पारा तब्बल ४५ अंशापर्यंत पोहोचल्याने वाढत्या उष्णतेचा मोठा फटका नागरिकांना बसला.
- विष्णू चाटेने कोर्टाकडे केलेल्या जीपीए (जनरल पावर ऑफ ॲटर्नी) संदर्भात सरकारी पक्षाकडून म्हणणे सादर.
- आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाच्या वतीने लेखी म्हणणे कोर्टात सादर.
- लॅपटॉपची क्लोन कॉफी मागितल्यानंतर आम्हाला दिलेल्या पेन ड्राइव्ह मध्ये जे पुरावे आहेत तेच लॅपटॉप मध्ये आहेत का हे कोर्टाने पाहावे असे तोंडी म्हणणे आरोग्य पक्षाने मांडले.
नगर जिल्ह्यात पाणी टंचाईच सकट गडद जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार लोकांची तहान भागतेयं टँकरच्या पाण्यावर ९२ गावे आणि ५०० वाड्यांना ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा
देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET (वैद्यकीय पात्रता परीक्षा) पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीड शहरासह अंबाजोगाईत पोहोचले आहेत. या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आज अंबाजोगाईत धडक कारवाई केली. सीबीआयच्या पथकाने शहरातील दोन मोबाईल संशयित विद्यार्थ्यांची तब्बल दोन तास कसून चौकशी केल्याने संपूर्ण जिल्ह्यात आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात रोजच्या रोज सुनावणी घेऊन जलदगतीने हे प्रकरण चालविण्यात येणार आहे.
सुनावणीसाठी आरोपीला कडेकोट पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले जाणार आहे.सुनावणी ‘इन-कॅमेरा’ पद्धतीने होणार असून मुलीच्या कुटुंबाची गोपनीयता आणि संवेदनशील बाबींचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाकडून आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे.
धाराशिव मध्ये आठवडाभरात दुसऱ्यांदा डिझेल टंचाई
डिझेल टंचाईचा ग्रामीण दळणवळण आणि शेतीच्या मशागतीला मोठा फटका
डिझेल नसल्याने शेतातल्या मशागतीची काम करता येईना, डिझेल साठी कॅन घेऊन शेतकरी पंपावर
तर ग्रामीण भागातील वाहतुकीलाही फटका,
मुंबई गोवा महामार्गावरील टोल वसूलीच्या विरोधात रायगडमधील पत्रकार रस्त्यावर उतरले
खारपाडा येथे सुरु झालेल्या टोल नाक्यावर पत्रकारांची निदर्शन
रायगड प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली रायगडमधील पत्रकार टोल विरोधात रस्त्यावर उतरले
अर्धवट असलेले महामार्गाचे काम पुर्ण करा, अनधिकृत टोल बंद करा अशी मागणी यावेळी पत्रकारांनी केली
२००८ साली रेल्वे भरती दरम्यान झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता
सरकारी पक्षाने गुन्हा सिध्द होईल आणि आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे मांडले नसल्याचा निर्वाळा.
पुराव्यानभावी राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने केले निर्दोष मुक्त.
राज ठाकरे यांना कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.
NEET पेपर फुटी प्रकरणी आजही काही विद्यार्थ्यांची CBI करणार चौकशी
विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची देखील CBI चौकशी करणार
गेल्या ३ दिवसांपासून CBI कडून राज्यातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांची चौकशी सुरू
पुणे, लातूर ,नांदेड, संभाजीनगर नाशिक या सगळ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केले
असल्याचे CBI ला संशय
तर CBI कडून मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोघींची समोरासमोर होणार चौकशी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी जिल्हा कृती समिती आक्रमक.
धर्माबाद ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची मोटारसायकल रॅली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा ठाणे कोर्टात होणार हजर..
रेल्वे भरती प्रकरणामध्ये झालेल्या घटनेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे 10 जणांसमवेत अकरावे दोशी होते
यापूर्वी दोन वेळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणे कोर्टात हजर राहिले होते
मला गुन्हा मान्य नाही ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मी नाशिकला होतो अशी माहिती राज ठाकरेंनी कोर्टासमोर दिली होती
आज पुन्हा एकदा सुनावणी करिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अकरा वाजता ठाणे कोर्टात हजर राहणार आहेत
नांदेडच्या रेल्वे चालक परिसरात , रिकाम्या रेल्वे डब्याला अचानक आग लागली.आज सकाळी ही घटना घडली.रेल्वे प्रशासनाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.रेल्वे स्थानक परिसरातील साईड ट्रकवर रिकामे रेल्वे डबे लावले जातात. या ट्रकला स्टेबल लाईन असे म्हणतात.या ट्रॅकवर लावण्यात आलेल्या रिकाम्या कोचला आग लागली होती.
पंतप्रधानांच्या आवाहनाला श्रीकांत शिंदे यांचा प्रतिसाद
खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर
खासदार श्रीकांत शिंदे यांनी वंदे भारत ट्रेनने केला ठाणे ते नाशिक प्रवास
श्रीकांत शिंदे आज चांदवड,मनमाड,येवला, नांदगाव आणि मालेगाव मतदार संघांची आढावा बैठक घेणार
बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी राहणार उपस्थित
आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे घेणार आढावा ..
सांगलीच्या शिराळा तालुक्यात खरीप हंगामातील भात पिकाच्या पेरणीस जागोजागी सुरुवात झाली आहे. ही पेरणी यावर्षी रोहिणी नक्षत्राच्या काहीशी लवकरच होत आहे. या पेरणीसाठी कृषी दुकानातून मिळणाऱ्या भाताच्या संकरित बियाण्यांनाच शेतकऱ्यांची पसंती अधिक मिळत आहे .
बुलढाणा जिल्ह्यात इंधन तूटवडा भासत आहे.. अशातच जिल्ह्यातील अनेक पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ट्रॅक्टर ला डिझेल मिळत नसल्याने शेती मशागतीचे कामे खोळंबली आहे .दरम्यान ट्रॅक्टर चालक, शेतकरी आक्रमक झाले असून मध्यरात्री पुणे ते नागपूर हा महामार्ग ट्रॅक्टर चालक, शेतकऱ्यांनी रोखून धरला होता .. तब्बल एका तासाच्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांची समजूत काढली, त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली... आंदोलन कर्ते ट्रॅक्टर चालक , शेतकरी काल दुपारपासून हे ट्रॅक्टर चालक शेतकरी चिखली जवळील मेहकर फाटा इथल्या पेट्रोल पंप वरती आपली वाहन घेऊन रांगेत उभे होते .. मात्र ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळत नसल्याने ते मध्यरात्री आक्रमक झाले होते ..आणि त्यांनी पुणे ते नागपूर हा महामार्ग मध्यरात्रीच रोखून धरत आक्रमक झाले होते
कांद्याचे दर घसरल्याने केंद्राचे पथक कालपासून नाशिक दौऱ्यावर
विविध बाजार समित्या आणि नाफेड खरेदी केंद्रांना भेट देत परिस्थितीचा घेणार आढावा
आज जिल्हाधिकारी कार्यलयात केंद्रीय पथक आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक
भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
अवघ्या ३०० ते ४०० रुपये क्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत
तर नाफेडकडून १२३५ रुपये क्विंटल दराने खरेदी सुरू
मात्र ग्रेडिंगमुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका
शेतकऱ्यांनी घाईत कांदा विक्री करू नये, बाजारभावांचा आढावा घेत टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
सोलापुरात मध्यरात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा चार जणांची सराई टोळी शहर पोलिसांनी केली जेरबंद..
सोलापूर शहर गुन्हे शाखेने केली कारवाई
सोलापुरातील दोन घरफोडी प्रकरणातील तपासात चार जणांची टोळी आली उघडीस
सोलापूर शहर गुन्हे शाखेने रोख रक्कम, सोन्याचे दागिने, कार असा मुद्देमाल केला जप्त..
अंतरजिल्ह्यातील चार चोरट्याने जवळपास 95 हजार रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त
याप्रकरणी सोलापूर शहर गुन्हे शाखेचे पथक तपास करत आहे.
6 जून रोजी साजरा होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये ही साजरा करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे 6 जून रोजी तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चांदीच्या मूर्तीस अभिषेक घालून दिवसभर श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजा वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची मंदिरात असलेली मूर्तीसह भवानी तलवार अलंकार पूजा घालावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटला आग
पहाटे ३ च्या सुमारास लागली आग
धुराचे लोट अन् बरंच नुकसान झाल्याची माहिती
उल्हासनगर स्कॅन क्रमांक पाच परिसरातील स्वामी शांती प्रकाश स्कूलजवळ जीन्स पार्सल व्यवसाय करणाऱ्या दोन भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपिल पारवाणी आणि मनीष पारवाणी हे दोघे भाऊ जीन्स फॅक्टरीमध्ये पार्सल डिलिव्हरीचे काम करत असून माल उचलण्याच्या पैशांच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी मुस्ताक, हरदीप आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी लाकडी दांडक्याने दोघांवर बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मनीष पारवाणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.