Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक १९ जून २०२५, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, विधानभवन हाणामारी, गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाड, राज ठाकरे, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Dhanshri Shintre

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये एका हॉटेलमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे.

Pune News: बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये छापा, ५ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमधील बुधवार पेठ पुणे येथील रेड लाईट एरिया मधील मालाबाईचा वाडा बुधवार पेठ येथे अवैद्यरित्या बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करुन, मालाबाईचा वाडा, बुधवारपेठ पुणे येथील रेड लाईट एरीयामध्ये छापा टाकला असता त्यामध्ये ५ बांगलादेशी महिला मिळून आल्या.

महिलाना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी केली असता अवैद्यरित्या विनापरवाना भारतात येऊन, स्वखुशीने वेश्याव्यवसाय करत होत्या.

फोटो न छापल्याने पालकमंत्र्याच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले

उमरग्यामध्ये पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनर वर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती आहे.

करमाळा जातेगाव रस्त्यावर वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडीचा अपघात

वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा तसेच स्थानिक गाडीतून माशांसाठी खाद्य घेऊन जाणाऱ्या पीकअपचा समोरासमोर अपघात झाल्याने आठ ते दहा वारकरी जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना करमाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे

 छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत चेअरमन पदी शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड यांची तर व्हाईस चेअरमनपदी शिवसेनेच्या शिंदेचे रंगनाथ रामदास वराडे यांची निवड झाली.

पुण्यात गुंडाचा राडा सुरूच

पुण्यातील गोखले नगर भागात पुन्हा गाड्यांची तोडफोड

गोखले नगर परिसरात 3 आरोपींकडून दुचाकी गाड्यांची तोडफोड

परिसरात दहशत माजवण्यासाठी आरोपींकडून वाहनांची तोडफोड

हातात पालघन घेत केलं वाहनांचं मोठं नुकसान

अधिक तपास चतुर्श्रुंगी पोलीस करत आहेत

सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत परभणी पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बाबद चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत परभणीत निराधार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आ राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे, सूरज चव्हाण आदी उपस्थितीत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती मध्ये लढू असे सुनील तटकरे म्हणाले आहेत

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चितळ हरणे क्वारंटाईन

16 हरणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग

प्राणिसंग्रहालय प्रशासनाने इतर प्राण्यांशी होणारा संपर्क रोखला

चितळांसाठी स्वतंत्र अॅनिमल कीपरची नेमणूक

सॅनिटायझर, जंतुनाशकाच्या वापराशिवाय खंदकात प्रवेश बंद

खंदक परिसरात ब्लीचिंग पावडरने निर्जंतुकीकरण

साथीच्या भीतीने प्रशासन सतर्क

मालेगाव जन्म दाखला घोटाळा प्रकरण,नायब तहसीलदार व त्यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ.

नाशिकच्या मालेगावातील बहुचर्चित जन्म दाखला घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले नायब तहसीलदार संदीप धारणकर व त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्या पोलिस कोठडीमध्ये न्यायालयाने सोमवारपर्यंत वाढ केली आहे.धारणकर व त्यांच्या पत्नीच्या नावावर ऑनलाइन सेंटर धारकांनी पैसे पाठविल्याचे निष्पन्न झाले असून मोठ्या प्रमाणावर जन्म दाखला घोटाळा प्रकरणी त्यांच्या नावे पैसे जमा झाले आहे.त्यातून त्यांनी अचल मालमत्ता खरेदी केली असून याचा तपास करण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड.शिरीष हिरे यांनी न्यायालयापुढे युक्तिवाद केला.त्यामुळे धारणकर दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे...

कल्याण डीसीपी स्कॉडची कारवाई! दोन एमडी तस्करांना बेड्या, 22 लाखांचे एमडी ड्रग्स जप्त

कल्याण डीसीपी स्कॉडने गस्ती दरम्यान कल्याण मधील एपीएमसी मार्केट परिसरातील रस्त्यावर कारवाई करत 22 लाख रुपये किमतीचे ११० ग्राम मॅफेड्रोनल म्हणजेच एमडी ड्रग्स जप्त केलेत. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद कैफ मन्सूर शेख आणि फरदिन आसिफ शेख या दोन ड्रग्स तस्करांना बेड्या ठोकल्यात.यादोघांनी एमडी ड्रग्स कुठून आणले आणि कुणाला विकले याचा तपास कल्याण डीसीपी स्कॉड आणि बाजारपेठ पोलीस करत आहेत.

गणेश नाईकांचा पुन्हा एकदा अप्रत्यक्ष्यरित्या एकनाथ शिंदेंवर थेट गंभीर आरोप

वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षरित्या थेट टारगेट केलाय.. नवी मुंबईच्या पाण्यासोबत कोविड काळात नवी मुंबईकरांचे औषधे, ऑक्सीजन चोरून आता १४ गावांचा भार नवी मुंबईकरांवर लादलाय.. यासर्वांचा हिशोब निवडणुकीत घेतला जाईल असा इशाराच गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना दिलाय..

कल्याण जवळील आंबिवलीत बिबट्याच दर्शन

कल्याण जवळील आंबिवलीत बिबट्याच दर्शन

बिबट्या मोबाईल कॅमेरासह सीसीटीव्ही कॅमेरात कैद

विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीच वातावरण

विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आणलेल्या छत्र्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांचा डल्ला

विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आणलेल्या छत्र्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांचा डल्ला

धाराशिव येथील वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आणल्या होत्या छत्र्या

छत्र्या मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड, विद्यार्थ्यांचा हिरमोड

पालकमंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत घडला प्रकार

प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांसोबत फोटो सेशन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पळविल्या छत्र्या

युवासेनेकडूनच करण्यात आले होते छत्री वाटपाचे नियोजन

पोलादपुर-महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाटात दरड कोसळली

० पोलादपुर महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाटात दरड कोसळली

० पोलादपुर तालुका हद्दीतील चिरेखिंड परिसरात कोसळली मोठी दरड

० दरडीचे वेळी माती आणि मोठमोठ्या दगडी संपूर्ण रस्त्यावर मुळे काही काळ वाहतुक बंद

० पोलादपुरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने लागलीच JCB च्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरु केले

० केवळ एक गाडी जाईल एवढाच रस्ता मोकळा करून दरडीच्या दोन्ही बाजूला आडकलेली वाहन बाहेर काढण्याचे काम सुरु

० दरडीमध्ये कोणतीही हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती

राज्यात हिंदी सक्ती नको, मराठी अभिनेता स्वप्निल जोशी याचं परखड मत

ज्याला हिंदी शिकायची त्याला हिंदी शिकू द्यावी पण हिंदीची सक्ती नको मराठी म्हणून माझं वैयक्तिक मत

मराठी हिंदीच्या वादावर अभिनेता स्वप्नील जोशी यांनी हिंदी सक्तीला केला विरोध

पाच वर्षांपूर्वी मी या जाहिराती करत होतो पण मला काही संघटना व्यक्तींनी निवेदन दिल्यानंतर त्या जाहिराती थांबवल्या

तर मी आयुष्यात ऑनलाईन जाहीरात करणार नसल्याचा घेतला निर्णय

व यापुढे त्या ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती मी करणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचं अभिनेता स्वप्नील जोशी यांनी सांगितला आहे

अभिनेता स्वप्नील जोशी धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या वन मोहिमेसाठी धाराशिव जिल्ह्यात आला होता

Neelam Gorhe : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार का? नीलम गोऱ्हे म्हणाल्या?

नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार का हे मी ज्योतिषीला जाऊन विचारणार आहे.

गडचिरोलीत जिल्ह्यातील खाणी प्राधिकरणातून येणारा निधी तिथल्या आदिवासी लोकांना वापरण्यात यावा हे मला चांगले वाटलं.

Nagpur : नागपुरात चोरट्याकडून तब्बल २७ दुचाकी जप्त

नागपूर शहरात अनेक ठिकाणी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली. या सराईत चोरट्याकडून तब्बल २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Pune News : राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चितळ हरणे 'क्वारंटाईन'

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चितळ हरणे 'क्वारंटाईन' करण्यात आलं आहे.

16 हरणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग

प्राणिसंग्रहालय प्रशासनाने इतर प्राण्यांशी होणारा संपर्क रोखला

चितळांसाठी स्वतंत्र अॅनिमल कीपरची नेमणूक

सॅनिटायझर, जंतुनाशकाच्या वापराशिवाय खंदकात प्रवेश बंद

खंदक परिसरात ब्लीचिंग पावडरने निर्जंतुकीकरण

साथीच्या भीतीने प्रशासन सतर्क

दिव्यांग बांधवांचं मानधन १००० रुपयांनी वाढवलं

१००० मानधन वाढ झाल्याने दिव्यांगाने केला जल्लोष.

दिव्यांगांच्या जल्लोषात दिव्यांग कल्याण आयुक्त सहभागी

राज्य सरकारने दिव्यांगांना महिना एक हजार रुपये पेन्शन वाढ केले

दिव्यांग बांधवांसाठी १५०० रुपये वरून २५०० एवढे मानधन करण्यात आले.

याचा आनंद पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे समोर धर्मेंद्र सातव यांचे नेतृत्वाखाली ढोल ताशा वाजवत नाचत आनंद व्यक्त केला

दिव्यांगांच्या या आनंदात दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी ही केबिन बाहेर येऊन दिव्यांगांसोबत दिव्यांगांच्या आनंदात नाचत ढोल ताशा वाजवत सहभागी झाले.

latur : दीड महिन्यापासून लातूरात पावसाची दडी, रोपे जगवण्यासाठी टँकरच्याने पाणी देण्याची वेळ

लातूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. तर पाऊस नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर दुसरीकडे लातूरच्या अखरवाई शिवारात 75 एकर क्षेत्रावर नवीन जंगल निर्मितीचा प्रकल्प वनविभागाने हाती घेतलाय. मात्र पाऊस नसल्याने नुकतेच लावलेले झाडांची रोपे जगवण्यासाठी टँकरच्याने पाणी देण्याची वेळ आली आहे.

अकोला राडा प्रकरण : पोलिसांकडून ६ जणांना अटक 

अकोल्यातल्या कृषी नगरातल्या गॅंगवॉर प्रकरणात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत सहा लोकांना अटक केलीय.. तर त्यांच्याकडून धारदार शस्त्रासह एक देशी बनावट पिस्टल जप्त केली आहे.. शेगाव परिसरातून एका आरोपीकडून ही देशी पिस्टल करण्यात आली आहे. हातात लाठी काठ्या, लोखंडी पाईप, तलवार तसेच बंदुकीचा वापर या गॅंगवॉरमध्ये झाला होता.

अकोला पोलिसांकडून आरोपींच्या 2 ठिकाणी 'रोड शो'

गुन्हेगारांवर वचक निर्माणकरण्यासाठी अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढायला सुरुवात केलीय.. गेल्या 2 दिवसात अकोला पोलिसांनी दोन ठिकाणी टोळीने गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचा 'रोड शो' केलाय.

सोनसाखळी चोरणाऱ्या दोन महिलांना चांदवड पोलिसांकडून अटक

नाशिकच्या चांदवड तालूक्यातील सोमवार आठवडे बाजारत भाजीपाला खरेदी साठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीची घटना घडली होती,या बाबत चांदवड पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी च्रक फिरवत संशियत महिलांचा शोध सुरु केला असता या दोघां महिलांना पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले असता त्यांच्या कडून चोरलेली सोनसाखळी जप्त केली आहे.या दोघा महिला मध्यप्रदेशच्या रामनगर येथिल असून त्यांनी आणखी काही चो-या केल्या का याचा चांदवड पोलिस शोध घेत आहे.

Murlidhar Mohol: राज्य सहकारी बँकेने थेट मदत करावी अशा बँकांना सूचना दिल्या आहेत- मुरलीधर मोहोळ

राज्यातील जिल्हा सहकारी बँका अडचणी मध्ये आहेत

अनेक सोसायट्या आज अडचणी मध्ये आहेत

राज्य सहकारी बँकेने थेट मदत करावी अशा बँकांना सूचना दिल्या आहेत

यावर काम आता सुरू झालं आहे

राज्य सहकारी बँक मदत करेल

सहकाराची चळवळ कशी पुढ जाईल यावर आम्ही काम करत आहोत- मुरलीधर मोहोळ

लातूरमधील ग्रामस्थांचं पावसासाठी ग्रामदैवताला साकडं

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथे शेतकरी , ग्रामस्थांच्या वतीने वेळेवर,पाऊस पडावा याकरिता गावातील ग्रामदैवत असलेल्या महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात केला आहे. मागच्या दीड महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यात पाऊस आणि दडी मारली त्यामुळे पीक सध्या कोमेजू लागलेत.. तर शेतकरी उदास झालाय, त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामदैवताला जलाभिषेक केला आहे..

Shikrapur: मलठण फाट्यावर टेम्पो आणि अज्ञात वाहनाची धडक

पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर येथील मलठण फाट्यानजीक अज्ञात वाहन आणि टेम्पोमध्ये धडक झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र धडक झाल्यानंतर टेम्पो चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला.

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅफिक नियंत्रणात आणले. तसेच क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन हटवण्यात आले.

Jalna: जालन्यात चहा विक्रेत्याला पाच ते सहा जणांची लाठ्या काठ्याने अमानुष मारहाण...

हॉटेल बंद कर म्हणून जालन्यात एका चहा विक्रेत्याला पाच ते सहा जणांनी लाठ्या काठीने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. जालना शहराजवळील नागेवाडी शिवारातील काल रात्री ही घटना घडली आहे. मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गंभीर मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीमध्ये चहा विक्रेता रामेश्वर घुंगरड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे भव्य उद्घाटन..!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या येत्या २२ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे उद्घाटन पुण्याच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या शनिवारवाडा येथून झेंडा दाखवून करण्यात आले.

या भव्य सोहळ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू मनोहर चासकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव शसंदीप कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष सौ. रूपालीताई ठोंबरे व प्रदीप देशमुख, आयएएस अधिकारी विजय देशमुख, पक्षाचे विविध पदाधिकारी तसेच प्रचंड मोठ्या संख्येने स्पर्धक उपस्थित होते.

झुमकार या सेल्फ ड्राईव्ह मोबाईल ॲपद्वारे कार बुक करून कार मालकाची फसवणूक

आरोपीने अँप द्वारे कार बुक केल्यानंतर, 6 महिन्यांपासून कार घेऊन झाला होता पसार

या प्रकरणात तपास करत पोलिसांनी १८ लाख रुपये किमतीची कार केली हस्तगत

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नांदेडसिटी पोलीस स्टेशनच्या पथकाची कारवाई

आरोपी विरोधात नांदेड सिटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाऊन घेणार भेट

उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाऊन घेणार भेट घेणार असल्याचे समजत आहे. संजय राऊत यांच्या आईला भेटण्यासाठी उद्धव ठाकरे येणार असल्याचे सांगितले जात आहे.

संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबियांना भेटायला उद्धव ठाकरे आले होते

त्यानंतर आज उद्धव ठाकरे पुन्हा संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी येत आहेत

आजची भेट ही देखील खासगी भेट सांगितली जात असून संजय राऊत यांच्या मातोश्रींना भेटायला उद्धव ठाकरे येत असल्याचे सांगितले जात आहे,

उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाऊन घेणार भेटPune PMP: पुणे महानगरपालिकेत 18 वर्षांत 22 अध्यक्षांच्या नियुक्त्या

पीएमपीमध्ये कार्यकाळ संपायच्या आतच सातत्याने आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या होत आहेत.

पीएमपीच्या विकासाला मोठी खीळ बसली असून, यामुळे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपीचा विकास कसा होणार असा प्रश्न विचारला जात आहे?

पदभार घेतल्यानंतर अवघ्या 1 वर्ष 4 दिवसांत पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांची बदली झाली. त्यामुळे पीएमपीचा विकास कसा होणार? असे

धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 2017 साली पदभार घेतला, त्यांचीही बदली वर्षाच्या आतच झाली. झाली.पीएमपीएमएलची स्थापना झाल्यापासून अवघ्या 18 वर्षांत 22 अध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. परिणामी,पीएमपीचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नसून, त्यामुळे पीएमपीच्या वर्तुळात नाराजीचे वातावरण आहे.

Pune: पुण्याच्या राजगड तालुक्यातल्या करंजावणे गावात शेतात रुतले १० ट्रॅक्टर

भात लावणीसाठी चिखलणी करत असताना एक ट्रॅक्टर चिखलात रूतल्यानं , त्याला काढण्यासाठी आलेले एका पाठोपाठ एक असे 10 ट्रॅक्टर रूतल्याची घटना

रावसाहेब कांबळे यांच्या शेतामध्ये भात लावणी करण्यासाठी चिखल करण्याचे काम चालू असताना एक ट्रॅक्टर चिखलात अडकला.. त्याला काढण्यासाठी आलेला दुसरा अडकला.. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी आलेला तिसरा अडकला.. असे एका मगोमाग एक 10 ट्रॅक्टर अडकले..

त्यानंतर 5 तास प्रयत्न केल्यानंतर भात शेतीच्या बाहेर एकाचं वेळेस अजून चार ट्रॅक्टर उभे करुन साँल जोडून एक एक टँक्टर बाहेर काढण्यात चालकांना आले यश..

Ratnagiri: रत्नागिरीतील वाटद प्रस्तावित एमआयडीसी विरोधात शेतकरी आक्रमक

वाटद खंडाळा मध्ये निघाला शेतक-यांचा मोर्चा

संरक्षण शस्त्र सामग्री तयार करणा-या प्रकल्पाविरोधात शेतकरी रस्त्यावर

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याच मतदार संघात प्रकल्पाची घोषणा

प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करावी यासाठी मोर्चा

मोर्चा झाल्यानंतर असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा

अधिसुचना रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार..

Wkt

Bacchu Kadu: कर्जमुक्ती साठी सरकारने जी समिती काल नेमली त्यातून काही अर्थ बोध होत नाही- बच्चू कडू

त्यामुळे येत्या 24 तारखेला चक्काजाम हा होणारच आहे सपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम होईल..

नेमलेली समिती कर्जमाफीसाठी आहे की उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही.हे सर्व उत्तर थातुर मातुर आहे

जोपर्यंत कर्ज माफी संदर्भात ठोस भूमिका घेतली जात नाही कर्जमाफीची तारीख सांगितली जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन हे सुरूच राहणार

Pandharpur: पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रात तीन महिला भाविक बुडाल्या

संगीता सपकाळ व सुनिता सपकाळ या दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू...

एका अनोळखी महिलेचा शोध सुरू...

चंद्रभागेत स्नानासाठी गेलेल्या महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू....

नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडवून मृत्यू...

भक्त पुंडलिक मंदिराजवळची आज सकाळची घटना....

पोलिस घटनास्थळी दाखल...

बारामतीत अजित पवारांचा जनता दरबार...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बारामती शहरातील सहयोग सोसायटी मधील अजित पवारांच्या निवासस्थानी अजित पवारांनी जनता दरबार घेतला या जनता दरबाराला नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचा पाहायला मिळालं. जनता दरबार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला आग

राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी येथील घटना

गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता टँकर

टँकरच्या चाकांनीही घेतलाय पेट

आग विझवण्यासाठी अजूनही यंत्रणा दाखल नाही

स्थानिक लोकांकडून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक थांबवली

Ajit Pawar: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मधील विविध ठिकाणच्या विकास कामांची पाहणी केली आहे.

बारामती शहरातील सिद्धेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीच दर्शन घेत अजित पवार यांनी विकास कामाच्या पाहणीची सुरुवात केली आहे मंदिर परिसरातील विकास कामांबद्दल ही अजित पवार यांनी वेळी काही सूचना केल्या आहेत. आज अजित पवार शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे

Purandar: पुरंदर विमानतळाला बाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम

पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण जमिनीच्या १० टक्के विकसित भूखंड आणि बाजारभावाच्या चारपट दराने मोबदला देण्याचा राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांनी तीव्रपणे फेटाळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत हा निर्णय घेण्यात आला असला तरी, विमानतळ बाधित शेतकऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी, स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना चारपट आर्थिक मोबदला आणि १० टक्के विकसित भूखंड मिळेल, तर संमती न देणाऱ्यांना केवळ आर्थिक मोबदला मिळेल, असे जाहीर केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील तिघांना चिरडले

छत्रपती संभाजी नगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरामध्ये एका ट्रकने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेऊन एकाच कुटुंबातील तिघांना चिरडल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) चार वाजेच्या सुमारास घडली आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. गोपालसिंग मंगलसिंग चंदनशे वय ३५, ऋदय गोपाल चंदनशे वय ८ वर्ष, अवनी गोपाल चंदनशे वय ९ वर्ष असे अपघातात ठार झालेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत. तर मीना गोपालसिंग चंदनशे सदरील महिला गंभीर जखमी आहे.

बुलढाण्यात ज्यादा दराने खताची विक्री, शेतकऱ्यांना आर्थिक फटका...

जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रावर युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांना एका बॅग वर शंभर ते दीडशे रुपये जादा दराने खतांची विक्री केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधित कृषी केंद्र संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे..

जन्मदर कमी होणे चिंताजनक बाब, शासनाने लग्नाळू मुलांना आर्थिक मदत करावी, सुबोध सावजी

राज्याचा जन्मदर कमी झाला असून ही चिंताजनक बाब आहे. जन्मदर कमी होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे लग्नाळू मुलांना मुली न मिळणे. बेरोजगारीमुळे मुलांची लग्न होत नाही आणि त्यामुळे अशा लग्नाळू मुलांना शासनाने 11 लाख रुपये आर्थिक मदत करून मुलांची लग्न लावून द्यावीत अशी अजब मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.

हातोला येथील बबन फुलवरे यांचे चार दिवसापासून आमरण उपोषण

धाराशिवच्या वाशी तालुक्यातील हातोला येथील वडार समाजाचे बबन फुलवरे यांनी वडार जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केल आहे.

प्रमाणपञ नसल्याने मुलांना शिक्षणामध्ये फायदा होत नाही तसेच वडार समाजाकडे शेती नाही त्यामुळे महसुल पुरावा नाही,तीन पिढ्या कोणी शिकलेले नसल्याने शैक्षणिक पुरावा नाही.

त्यामुळे अशा परिस्थितीत गृह चौकशी करुन जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी फुलवरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

भरदिवसा बदलापूर रेल्वे स्थानकात चोरी, गटारावरील लोखंडी जाळी चोरून लोकलमधून काढला पळ

बदलापूर रेल्वे स्थानकात भरदिवसा चोरीचा प्रकार घडलाय. एका चोरट्यानं चक्क रेल्वे ट्रॅकमधल्या गटारावरची लोखंडी जाळी चोरून लोकल मधूनच पळ काढलाय.

चोरट्याचा कारनामा सोशल मीडियात व्हायरल होतोय.

बदलापूर रेल्वे स्थानकात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडलाय. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर मुंबईकडे जाणारी लोकल आलेली असतानाच एका चोरट्यानं गटारावरील संरक्षक जाळी लोकलमध्ये टाकली आणि तिथून पळ काढला.

यापूर्वीही बदलापूर रेल्वे स्थानकात असे गैरप्रकार घडले आहेत.

त्यामुळे स्टेशनवरील रेल्वे पोलीस आणि सुरक्षा जवान नेमकं करतात तरी काय? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जातोय.

उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांचा खासदार नारायण राणेंवर प्रहार

लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, पण मेरिटवर आपला पराभव झाला का तर अजिबात नाही

नोट घ्या मतदान करा, नोटा घ्या मतदान करा असं करत १२० कोटी रुपेय वाटले आणि साडेचार लाख मते मिळवली

आम्ही आर्शिवाद मागितले आणि मतदारांनी चार लाख मते दिली

पुन्हा निवडणुका येतील पुन्हा उभे राहू पुन्हा जिंकू

कारण इथला खासदार कोण आहे हे कुणाला माहितीच नाही, लांजा इथल्या उद्धव ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात विनायक राऊतांचा नारायण राणेंवर टिकास्त्र

लातूरच्या देवणी आणि उदगीर तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत

लातूरच्या उदगीर तालुक्यातील मोघा गावात रायगड क्लब येथे तिरट, जुगार, कसिनो, तसेच मद्यपानासारखे अवैद्य धंदे सुरू आहेत, त्यामुळे देवणी आणि उदगीर तालुक्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी तसेच,पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे, तर तात्काळ रायगड क्लब वरील अवैध्य व्यवसाय बंद करण्याची मागणी केलीय. दरम्यान या अवैद्य व्यवसायामुळे परिसरातील तरुणांन व्यसनाधीन झाले आहेत,कौटुंबिक हिंसाचार देखील वाढली आहे..

तेली समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळावा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे लावणार हजेरी

आज राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्हा दौऱ्यावर असून सांस्कृतिक भवन अमरावती येथे राज्यस्तरीय तेली समाज गुणवंत विद्यार्थी सोहळा व उद्योजक मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे तर तेली समाजाने देखील उद्योगात भरारी घ्यावी यासाठी नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी सुप्रसिद्ध ट्रेनर कडून नव उद्योजकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील चोरटा मुद्देमालासह गजाआड, चार दिवसाची पोलिस कोठडी

मोबाईल दुकान फोडुन मोबाईल चोरी केल्याच्या चोरीचा 24 तासांच्या आत छडा लावत चोरट्याला संपुर्ण मुद्देमालासह गजाआड करण्यात तुळजापूर पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणी अजित कबीर तुलसे याला ताब्यात घेण्यात आले असुन त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तुळजापुरातील धाराशिव रोडवरील मोबाईल दुकान फोडुन चोरट्याने दुकानातील 23 महागडे मोबाईल 13 लाख 33 हजार रुपये किंमतीचे चोरी केले होते ही घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला ताब्यात घेतले असुन ही कारवाई तुळजापूर पोलिसांनी केली आहे.

२२ जुलैपासून ‘वृक्ष लागवड पंधरवडा’; एक कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचा पहिला टप्पा

गडचिरोली “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्य शासनाने एक कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट दिले असून, या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या २२ जुलै रोजी गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात ‘वृक्ष लागवड पंधरवडा’ सुरू करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात ४० लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात डीएपी- युरिया खताची मोठी टंचाई

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डीएपी- युरिया खताची मोठी टंचाई भासत आहे.

यामुळे ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांवर संकट ओढविले आहे. याशिवाय खत बी बियाणे यांच्यामध्ये भेसळ, लिंकिंग औषधे घेण्याची बळजबरी व ताज्या अतिवृष्टीचे पंचनामे व नुकसान भरपाई चा प्रश्न या सर्वांसंदर्भात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली.

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामुळे काँग्रेसने आज घंटानाद आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने दूर करा अन्यथा या पुढच्या काळात गुराढोरांसह कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करू असा इशाराही काँग्रेसने दिला.

आयात तुरीमुळे दरात तीन हजारांची घसरण

यवतमाळ जिल्ह्यात गतवर्षी खुल्या बाजारात जुलै महिन्यात तुरीला अकरा हजार रुपये क्विंटलचे दर मिळाले यावर्षी देखील तुरीच्या दरात वाढ होईल अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

यातून शेतकऱ्यांनी तूर राखून ठेवले जुलै महिन्यात तूर विकायला काढली याचवेळी तुरीची आयात झाली बाजारात तुरीचे दर पडले

याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला असून तुरीचे दर आठ हजारांवर आले आहे.

त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Yavatmal: वाळूची उचल करताना लाभार्थ्यांचे प्रचंड हाल

यवतमाळ जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 48 हजार 790 ब्रास वाळू राखीव ठेवण्यात आली असून त्यानुसार लाभार्थ्यांना थेट वाळू वाहतूक परवाना देण्यात येत आहे.

घाटातून वाळू काढून वाहनाच्या माध्यमातून आणण्यासाठी लाभार्थ्यांना प्रचंड यातना सहन करण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ 12 हजार ब्रास वाळूची उचल लाभार्थ्यांनी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतक-यांची जनआक्रोश सभा

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील प्रस्तावित एमआयडीसी विरोधात शेतकरी एकवटलेत.

या एमआयडीसीविरोधात आज जनआक्रोश सभा आज घेण्यात येणार आहे.

वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने खंडाळा येथे सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि मानवाधिकार विश्लेषक अँड. असीम सरोदे यांच्या उपस्थितीत ही जनआक्रोश सभा होणार आहे.

तत्पुर्वी या परिसरात रँली देखील काढली जाणार आहे. या सभेच्या माध्यमातून एमआयडीसीची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, ही प्रमुख मागणी केली जाणार आहे.

नवी मुंबईत पहिल्यांदाच मायक्रोपेनिसची समस्या असलेल्या २६ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मायक्रोपेनिस ही एक दुर्मिळ जन्मजात स्थिती आहे जी सुमारे २% पुरुषांना प्रभावित करते, जी अंदाजे १०,००,००० पैकी १ मध्ये दिसून येते.

हार्मोनल किंवा विकासात्मक समस्यांमुळे, लिंग सामान्य आकारात वाढू शकत नाही, त्याची ताठरता लांबी ३ इंचांपेक्षा कमी असते.

नवी मुंबईतील अशाच एका प्रकरणात मेडिकव्हर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट डॉ. सनीश श्रृंगारपुरे तसेच प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. आशिष सांगवीकर यांच्या नेतृत्वाखाली टिमने मायक्रोपेनिस हा जन्मजात आजार असलेल्या २६ वर्षीय पुरूषावर लिंगाची लांबी वाढविण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

Tourists Boat capsized: मोठी बातमी ! पर्यटकांनी भरलेली बोट उलटली, ३४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT